agriculture news in marathi, grapes plantation area increase, sangli, maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

जिल्ह्यातील द्राक्षाला देशांतर्गत तसेच परदेशातूनही मागणी वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील द्राक्षाचे एकूण क्षेत्र किती आहे, याबाबतचा सर्व्हे आम्ही करणार आहोत.
- सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ.

सांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी पुढाकार घेऊ लागले आहेत. गोड आणि रसाळ द्राक्षाला देशांतर्गत आणि परदेशात मागणी वाढली आहे. यामुळे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत द्राक्षाच्या क्षेत्रात सुमारे १० ते १५ हजार एकरांनी वाढ झाली असल्याची माहिती द्राक्ष बागायतदार संघाच्या सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात दोन वर्षांपूर्वी द्राक्षाचे क्षेत्र एक लाख ते एक लाख पाच हजार एकरांपर्यंत होते. दोन वर्षांत हे क्षेत्र सुमारे १ लाख ते एक लाख २५ हजार एकरपर्यंत पोचले आहे. गेल्या दोन वर्षांत द्राक्षाला चांगले दर मिळाले. येथील शेतकरी दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. व्यापारीदेखील येथील द्राक्षांना पसंती देत आहेत. द्राक्ष खरेदीसाठी बांगलादेशासह, उत्तर भारत, जम्मू काश्मीर, बिहार, पंजाब येथील व्यापारी सांगलीत येऊ लागले आहेत. खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या जास्त असल्याने दराबाबत स्पर्धा निर्माण होऊन अधिक दर मिळू लागला आहे. यामुळे शेतकरीदेखील द्राक्ष विक्रीस प्राधान्य देऊ लागले आहेत. परिणामी जिल्ह्यातील द्राक्षाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

आटपाडी तालुक्‍यात द्राक्ष पीक वाढू लागले
आटपाडी हा दुष्काळी तालुका आहे. पाणीटंचाईमुळे येथे कमी पाण्यावर डाळिंब पीक घेतले जाते. गेल्या दोन वर्षांपासून टेंभू उपसा सिंचन योजनेचे आवर्तन वेळेत मिळू लागले आहे. पाणी आल्याने डाळिंबाबरोबर द्राक्षाची लागवड करण्यासाठी शेतकरी प्राधान्य देऊ लागले आहेत. तालुक्‍यात सुमारे शंभर हेक्‍टरवर द्राक्षाची लागवड झाली आहे.

कृषी विभागाकडे जुनीच आकडेवारी
जिल्ह्यातील द्राक्षाचे एकूण क्षेत्र २१ हजार हेक्‍टर असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. द्राक्ष संघाकडे मात्र ही नोंद एक लाख एकर अशी आहे. कृषी विभागाकडील द्राक्षाची असणारी आकडेवारी जूनी असल्याचे दिसते आहे. मुळात द्राक्षाचे क्षेत्राची नोंद कृषी कार्यालय आणि तलाठी यांच्या मार्फत केली जाते. मात्र, दरवर्षी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून द्राक्षाच्या क्षेत्राच्या आकडेवारीत कोणतेच बदल होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कृषी विभागातील अधिकारी काय करतात, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

आटपाडी तालुक्‍यात टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी आले आहे. त्यामुळे शेतीला शाश्‍वत पाण्याची सोय झाली असल्याने नव्याने द्राक्ष लागवड केली असल्याचे आटपाडी येथील शेतकरी
 गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

 

इतर ताज्या घडामोडी
पेरणीपूर्व मशागतीय पद्धतीने करा...रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा, करडई व सूर्यफूल...
कांदा पिकासाठी संतुलित अन्नद्रव्य...कांदा उत्पादकता कमी होण्यासाठी असंतुलित खत...
जळगाव जिल्हा परिषदेत निधीवाटपावरून आरोप...जळगाव : जिल्हा परिषद सेस फंड, शिक्षण, महिला-...
वऱ्हाडला पीक नुकसानभरपाईचा २६५ कोटींचा...अकोला : ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिपावसाचा फटका...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख टन खते...पुणे : रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतांची अडचण येऊ...
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८...सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा...
नाशिक : भिजलेल्या पिकांमुळे चाऱ्याचा...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाने...
धक्कादायक, एकाच गावातल्या ६०० मेंढ्या...नगर  ः मागील महिन्यात अतिवृष्टीने पारनेर...
अधिक उपसा केला तर पाणी टंचाईची शक्यता...लातूर : जिल्ह्यात पावसाळ्याच्या चारही महिन्यांत...
नाशिक जिल्ह्यात नुकसानीपोटी १८१ कोटींची...नाशिक : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे...
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस...नागपूर : मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांना...
नाशिक जिल्ह्यात टोमॅटोला गेले तडे ! ५०...नाशिक  : मॉन्सूनोत्तर पावसाच्या तडाख्यामुळे...
...'या' सिंचन योजनेची पाणीपट्टी होणार...सांगली : ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीची...
किसान सभेकडून विमा कंपनीला २८...पुणे : पुण्यातील दि ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीकडून...
हैबतबाबांच्या पायरीपूजनाने आळंदीत...आळंदी, जि. पुणे  ः टाळ-मृदंगाचा निनाद आणि...
गूळ सौदे सुरू करण्यासाठी दोन्ही घटकांना...कोल्हापूर  : गेल्या दोन दिवसांपासून व्यापारी...
सांगली जिल्ह्यात ऊस दरासाठी ‘स्वाभिमानी...सांगली : जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होताच...
कोल्हापुरात कारखान्यांकडून ऊसतोड सुरू...कोल्हापूर  : गेल्या चार दिवसांपासून...
जळगावात भरताची वांगी १५०० ते २६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (...
बटाटा, टोमॅटोतील उशिरा येणाऱ्या करपा...बटाटा आणि टोमॅटो यांसारख्या पिकांमध्ये प्रचंड...