agriculture news in marathi Grapes, pomegranates in Solapur Rate steady, fenugreek, cilantro rise | Agrowon

सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर, मेथी, कोथिंबीर तेजीत

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 एप्रिल 2021

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्ष, डाळिंबाचे दर काहीसे स्थिर राहिले. तर मेथी, कोथिंबिरीच्या दरातील तेजी मात्र पुन्हा कायम राहिली.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्ष, डाळिंबाचे दर काहीसे स्थिर राहिले. तर मेथी, कोथिंबिरीच्या दरातील तेजी मात्र पुन्हा कायम राहिली, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॅाकडाऊन सुरु आहे. या परिस्थितीत सगळे व्यवहार सुरळीत सुरु आहेत. पण भाजीपाल्यासह अन्य फळभाज्यांना तुलनेने फारसा उठाव नसल्याचे चित्र आहे. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात द्राक्षाची रोज २ ते ३ हजार पेट्यांपर्यंत आवक राहिली. तर, डाळिंबाची आवक रोज ५०० क्विंटल एक टनापर्यंत आवक राहिली.

द्राक्षाची आवक उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, पंढरपूर भागातून झाली. तर डाळिंबाची आवक मोहोळ, मंगळवेढा, सांगोला तालुक्यातून झाली. बाहेरील जिल्ह्यातील आवक तुलनेने कमीच राहिली. द्राक्षाला प्रति चार किलोच्या पेटीला किमान ७० रुपये, सरासरी १०० रुपये आणि सर्वाधिक १७० रुपये असा दर मिळाला. 

डाळिंबाला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी ३५०० रुपये आणि सर्वाधिक १२००० हजार रुपये, असा दर मिळाला. गेल्या पंधरवड्यापासून त्यांच्या आवकेत चढ-उतार होतो आहे. पण, मागणी असल्याने दर स्थिर आहेत. कोथिंबीर, मेथी या भाज्यांचे दर मात्र पुन्हा तेजीत राहिले. भाज्यांची आवक प्रत्येकी १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत राहिली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यांसाठी ८०० ते १००० रुपये आणि मेथीला ९०० ते १४०० रुपये असा दर मिळाला. 

पालक आणि चुक्यालाही बऱ्यापैकी उठाव मिळाला. त्यांच्या शंभर पेंढ्यांसाठी ३०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. वांगी, टोमॅटोला जेमतेमच उठाव मिळाला. वांग्यांना प्रतिक्विंटलला किमान ७०० रुपये, सरासरी १२०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये, तर टोमॅटोला किमान ९०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले. 

कांद्याचे दर स्थिरच

कांद्याची आवक पुन्हा जेमतेमच राहिली. रोज ५० ते १०० गाड्यांपर्यंत आवक राहिली. पण, कांद्याच्या खरेदीदारांची संख्या तुलनेने कमी आहे. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक १४०० रुपये असा दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
नगरमध्ये दोडका, वांगी, भेंडीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
नागपुरात सोयाबीन दरात तेजीनागपूर : सोयाबीन दरातील तेजी कायम असून कळमना...
चाकणच्या जनावरांच्या बाजारात ७० लाखांची...चाकण, जि. पुणे : येथील महात्मा फुले बाजार आवारात...
राज्यात जांभळांना ३००० ते १६००० रुपयेजळगावात क्विंटलला ६००० ते ९००० रुपये...
नाशिकमध्ये घेवड्याची आवक घटली; दरात...नाशिक : येथील बाजार समितीमध्ये गत सप्ताहात...
औरंगाबादमध्ये आंब्यांना सरासरी २४५० ते...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये आंब्यांचे...
पुण्यात भेंडी, गवारीच्या दरात सुधारणापुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लसूण ३५०० ते १२००० रुपयेपरभणीत क्विंटलला ५००० ते ६५०० रुपये परभणी...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक...नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक बाजार...
पुण्यात कांदा, बटाटा, घेवड्याच्या दरात...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात लिंबू ६०० ते ३००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते २००० रुपये...
नागपुरात सोयाबीनला ७४०० रुपयांचा दरनागपूर : कळमना बाजार समितीत सोयाबीनमधील तेजी कायम...
पुण्यात भाजीपाल्याच्या दरात १० ते २०...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी...
राज्यात हिरवी मिरची १००० ते ३००० रुपयेजळगावात क्विंटलला १८०० ते २८०० रुपये...
सोलापुरात डाळिंबाच्या दरात तेजी टिकूनसोलापूर ः सोलापूर बाजार समितीच्या आवारात...
पुण्यात भाजीपाल्याचा पुरवठा, मागणी...पुणे ः पुणे बाजार समितीमध्ये सोमवारी (ता.१७)...
राज्यात कांदा १०० ते १५०० रुपयेसोलापुरात क्विंटलला १०० ते १००० रुपये सोलापूर...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...