नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर संचलनाद्वारे कृषी कायद्यांविरोधात शक्तीप्रदर्शनावर
बातम्या
द्राक्ष उत्पादकांची दोन कोटींची फसवणूक
नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा परिसरातील शेतकऱ्यांची राजकोट (गुजरात) येथील वर्षा सावलिया यांच्या क्राऊन इंटरनॅशनल एक्स्पोर्ट इम्पोर्ट कंपनीने दोन कोटींची फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.
नाशिक: दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा परिसरातील शेतकऱ्यांची राजकोट (गुजरात) येथील वर्षा सावलिया यांच्या क्राऊन इंटरनॅशनल एक्स्पोर्ट इम्पोर्ट कंपनीने दोन कोटींची फसवणूक केल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला.
याबाबत सविस्तर माहिती अशी, की या परिसरात ५ वर्षांपासून सुनील राठोड नामक निर्यातदाराने सुविन एंटरप्रायझेस या नावाने या भागात द्राक्ष सौदे करून माल निर्यात केला होता. त्याच्याच माध्यमातून पुढे गुजरात राज्यातील राजकोट येथील क्राऊन इंटरनॅशनल एक्स्पोर्ट इम्पोर्टच्या संचालिका वर्षा जस्मिन साविलया यांच्याशी शेतकऱ्यांनी राठोड यांच्या सांगण्यावरून व्यवहार केले.
नंतर वर्षा सावलिया यांनी द्राक्ष उत्पादकांचा विश्वास संपादन केला. वेळोवळी सुरुवातीला पैसे अदा केले. त्यानुसार द्राक्ष निर्यातदार वर्षा सावलिया यांनी अनेक बागायतदारांच्या भेटी घेऊन द्राक्षांची निर्यात केली. मात्र बी. के. एक्स्पोर्टच्या माध्यमातून शीतकरण केलेली प्रक्रिया ज्यामध्ये वाहतूक, मजुरी, हाताळणी व प्रतवारी याचे ३९ लाख ९४ हजार ७६० रुपये व शेतकऱ्यांच्या द्राक्षाचे असे एकूण एक कोटी ९८ लाख ७४ हजार ८६० रुपये थकले. मात्र नंतर खरेदीपोटी द्राक्ष उत्पादकांना पैसे तर मिळालेच नाहीत.
पैसे मागण्यासाठी वेळोवेळी संपर्क साधला असता, वर्षा यांनी शेतकऱ्यांना धमकी दिली. द्राक्ष उत्पादकांना पैसे न मिळाल्याने अणि निर्यातदाराकडून धमक्या येत असल्याने द्राक्ष उत्पादकांची फसवणूक झाल्याचे समोर आले. द्राक्ष उत्पादक सुनील गायकवाड यांच्यासह शेतकऱ्यांनी दिंडोरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
- 1 of 1502
- ››