agriculture news in Marathi grapes producers not get benefit of loan waive and crop loan Maharashtra | Agrowon

द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि कर्जही मिळेना

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज दोन लाखाच्या पुढे अडीच किंवा तीन लाखापर्यंत जात असल्यान राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत त्याचा समावेश न झाल्यामुळे बागायतदार अत्यंत अडचणीत आले आहेत.

नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  दोन लाखाच्या पुढे अडीच किंवा तीन लाखापर्यंत जात असल्यान राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेत त्याचा समावेश न झाल्यामुळे बागायतदार अत्यंत अडचणीत आले आहेत. 

गेल्या काही वर्षांत नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष बागायतदारां चा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे.  गेल्या तीन वर्षांपासून तर मोठा खर्च करुन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत द्राक्ष उत्पादन घेतांना मोठे नुकसान झाले. लॉकडाउनमुळे ८० रूपयांचा दर ७ ते १० रुपयांवर आले.  एकीकडे उत्पन्न नाही. त्यातच कर्जमाफीचा लाभ मिळत नसल्याने, अन् समझोता योजनेत पैसे भरूनही बँका आता कर्ज देत नाहीत. त्यामुळे हंगामाच्या तोंडी भांडवल नसल्याने शेतकरी बँकांमध्ये चकरा मारत आहेत, मात्र काही बँका प्रतिसाद देत नसल्याने त्यांची कोंडी होत असल्याची स्थिती आहे.

राज्य सरकारने महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंत कर्ज माफ केले आहे. त्यामुळे यामध्ये नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी द्राक्ष उत्पादकांना याचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे द्राक्ष पिकापोटी १.१० लाख एकरी कर्ज मिळत असताना, उत्पादकांना प्रतिएकर २ लाखांवर उत्पादन खर्च करावा लागतो. त्यातच लॉकडाउनमुळे मागणी पुरवठा साखळी बिघडल्याने दरात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे प्रतिष्ठा मिळवून देणारे खर्चीक पीक अडचणीच्या फेऱ्यात सापडले आहे.  

अजूनही द्राक्ष उत्पादकांचा माल विकुनही कोट्यवधी रुपये द्राक्ष व बेदाणा व्यापारी, निर्यातदार यांच्याकडे पैसे अटकून आहेत, त्यामुळे त्यातच पीककर्ज मिळत नसल्याने त्यांची अडचण वाढत असून हंगामाची सुरुवात समस्यांमध्ये अडकल्याने जिल्ह्यात चित्र आहे. त्यातच नेहमी द्राक्ष उत्पादक कर्जमाफीत बसत नसल्याने व आता बँकाही भांडवलासाठी पीककर्ज नसल्याने अडचणी वाढत्या आहेत.

 अशी आहे स्थिती
राज्यात २ लाखांपर्यंत कर्जमाफी झाली. मात्र नाशिक जिल्ह्यात २.५ ते ३ लाखांवर द्राक्षासाठीच्या पीककर्जांचे २८२ कोटी थकीत आहेत. एकूण २ लाखांपर्यंत थकीत असलेली रक्कम ७१२ कोटी आहे. ही रक्कम जवळपास ४५ हजार खात्यांवर आहे. त्यात दोन लाखांवर थकीत असलेले शेकडो द्राक्ष उत्पादक आहेत. पीककर्ज आणि नुकसान मोठे असल्याने कर्जमाफी योजनेत २ लाखांवर कर्जाचा समावेश करण्याची, मागणी द्राक्ष बागायतदार करत आहे.

प्रतिक्रिया
२०१९ एकवेळ समझोता योजनेत सहभागी झालो. ठरल्याप्रमाणे पैसे भरले, मात्र त्यात शेरा मारल्याने दुसरी बँक कर्ज देत नाही. त्यात कर्जमाफीचा लाभ मिळलेला नाही. त्यामुळे आता कर्ज नसूनसुद्धा बँका भांडवल देत नसल्याने काय करावे हा प्रश्न आहे.
- श्याम देवकर, द्राक्ष उत्पादक, राजापूर, ता. दिंडोरी

शासन नेहमी प्रमुख शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करते. द्राक्षात लाखो रुपये गुंतवून परतावा नाही. त्यातच मोजक्या शेतकऱ्यांना लाभ मिळला. अनेकजण वंचित आहोत. शासनाने अटी, शर्ती कमी करून दोन लाखांवर योजना आणावी, अन् द्राक्ष उत्पादकांना दिलासा द्यावा.
- बापू साळुंके, द्राक्ष उत्पादक, वडनेर भैरव, ता. चांदवड


इतर अॅग्रो विशेष
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...