agriculture news in Marathi grapes producers from Pune district got 100 crore loss Maharashtra | Agrowon

पुणे जिल्हयात द्राक्षाचे १०० कोटींचे नुकसान 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

पुणे जिल्ह्यात जवळपास पाच ते सहा हजार एकर द्राक्षांचे क्षेत्र आहे. यामध्ये जुन्नर, आंबेगामध्ये तीन ते चार हजार एकर क्षेत्र आहे. या भागातून निर्यात होणाऱ्या द्राक्षांचे क्षेत्र अधिक आहे. यंदा शेवटच्या टप्यात निर्यात करणाऱ्या द्राक्ष उत्पादकांना कोरोनाचा जिल्ह्यात जवळपास १०० कोटी रूपयांचा फटका बसला आहे. 
- जितेंद्र बिडवई, अध्यक्ष, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ, जुन्नर 

पुणे ः लॉकडाऊनमुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. कमी मागणीमुळे गेल्या एक ते सव्वा महिन्यात द्राक्ष उत्पादकांना अत्यंत कमी दरात विक्री करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रति किलोमागे साधारणपणे ४० ते ५० रूपयापर्यंत नुकसान झाले असून सुमारे १०० कोटींचा फटका बसल्याचे चित्र आहे. 

पुणे जिल्ह्यात द्राक्षाचे सुमारे पाच ते सहा हजार एकर क्षेत्र आहे. यामध्ये जुन्नर आणि आंबेगाव ही तालुके अग्रेसर आहे. याशिवाय इंदापूर, बारामती, दौमड आणि शिरूर तालुक्यातही द्राक्ष उत्पादन घेणारे अनेक शेतकरी आहेत. द्राक्ष उत्पादकांनी उत्पादित केलेल्या द्राक्षाला परदेशासह, स्थानिक बाजारपेठेतही मोठी मागणी होती. यंदा साधारपणपणे दहा ऑक्टोबर ते २० मार्चपर्यमत द्राक्षाचा हंगाम सुरळीत सुरू होता. 

परंतु, त्यानंतर करोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन केल्यामुळे द्राक्ष उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या विक्रीक्षम बागांवर परिणाम झाला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, इंदापूर, दौंड आणि बारामती या भागातील सुमारे दोन ते तीन हजार एकर बागेतील द्राक्षांची बांगलादेश, श्रीलंका, रशिया, ऑस्ट्रेलिया, युरोप, इंग्लड अशा विविध देशात निर्यात केली जात होती. शेतकऱ्यांना एकरी सरासरी ८ ते १२ टन उत्पादन मिळते. या द्राक्षांना प्रतवारीनुसार सरासरी 
१२० ते १३० रुपये दर मिळत होता. तर स्थानिक बाजारात ८० ते १२० रूपये दर मिळत होता. 

मात्र, लॉकडाऊन आणि अवकाळी पाऊस यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचा बाजार थंडावला आहे. सध्या द्राक्षाची प्रति किलो ३० ते ४० रूपये दराने विक्री करण्याची वेळ आली असून प्रति किलोस ४० ते ५० रूपयांचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे. या शेतकऱ्यांचे साधारणपणे १०० कोटीचे नुकसान झाले आहे. 

मनुक्याच्या दराची शाश्वती नाही 
पुणे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी द्राक्षांच्या विक्रीअभावी मनुक्याच्या निर्मितीवर भर देण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, या मनुक्याला बाजारात प्रत्यक्षात किती दर मिळेल याची शाश्वती नसल्याने अनेक शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...