agriculture news in Marathi grapes producers in trouble Maharashtra | Agrowon

सांगली जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक अडचणीत 

टीम अॅग्रोवन
रविवार, 3 मे 2020

कोरोनाच्या संकटामुळे द्राक्षांचा दर कमी झाला आहे. मशागतीवर लाखो रुपये खर्च केले आहेत. दर परवडतही नाही. परंतु माल बागेत ठेवून काय करायचे. आलेला माल बागेतून जावा, यासाठी कमी दराने विक्री करीत आहे. 
- अमसिध्द कुंडला खरात, द्राक्ष बागायतदार, भिवर्गी 

सांगली  : लॉकडाऊनमुळे जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे. तालुक्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. द्राक्षाला प्रतिकिलो केवळ २० ते २५ रुपये दर मिळत आहे. गतवर्षीपेक्षा द्राक्षाला कमी दर मिळत असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. 

जत तालुक्याच्या पूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी, करेवाडी, कागनरी परिसरात दोनशे एकरावर द्राक्षाचे क्षेत्र आहे. या परिसरातील शेतकरी मागास म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात फळछाटणी घेतात. उशिरा फळ छाटणी घेतल्यामुळे बाजारात द्राक्षाला मागणी अधिक असल्याने दर चांगला मिळतो. या सर्व द्राक्षेबागांचे उत्पादन स्थानिक बाजारपेठेसाठी घेतले जाते. 

एप्रिल-मे महिन्यात विक्री केली जाते. बाजारात हंगाम संपत आलेला असतो, मागणी चांगली असते, दर चांगला मिळतो. गेल्यावर्षी मे महिन्यात ४० ते ५० रुपये किलो भाव मिळाला होता. एप्रिल-मे महिन्यात विक्री करण्यासाठी येणाºया बागांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. महागडी औषधे, रासायनिक खत, मजुरी, मशागतीसाठी लाखो रुपये खर्च करावे लागतात. यावर्षी अनुकूल हवामानामुळे उत्पादन चांगले आहे. 

परंतु कोरोनाच्या संकटामुळे बाजारात दर कमी झाला आहे. बाजारपेठा बंद असल्याने व्यापारीही आलेले नाहीत. संचारबंदीने विक्री होत नाही. त्यामुळे शेतकरी बेदाण्याकडे वळला आहे. परंतु सर्व बेदाणा शेड मिळत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. परिणामी कमी किमतीला बागा विकाव्या लागत आहेत. सध्या २० ते २५ रुपये किलो दराने द्राक्षांची विक्री होत आहे. हा आतापर्यंतचा नीचांकी दर आहे. 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...