agriculture news in Marathi grapes traders got setback due to server down Maharashtra | Agrowon

सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष व्यापाऱ्यांना फटका

मुकुंद पिंगळे
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

सर्व्हरचा खोळंबा असल्यास बांगलादेश सीमेवर माल न थांबवता कागदपत्रे स्वीकारून पुढे पाठविला जावा. सर्व्हर चालू झाल्यानंतर नोंदी करण्यात याव्यात. माल खराब होत असल्याने तो थांबविण्यात येऊ नये. अगोदरच द्राक्ष उत्पादक अडचणीत आहेत. त्यामुळे याकामी संघ पाठपुरावा करणार आहे. सरकारने सहकार्य करणे गरजेचे आहे.
-कैलास भोसले, कोषाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ 

नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे सर्व्हर चार दिवस बंद पडल्याने भारत-बांगलादेश सीमेवर मेहंदीपूर मालदा, गोजाडांगा व हिल्ली या चेक पोस्टवर जवळपास १५० ट्रक थांबवून ठेवण्यात आले होते. त्यातील ५० ते ७० टक्के मालाची नासाडी झाली. बाजार भावानुसार अंदाजे १५ कोटी नुकसान झाले आहे. 

दरम्यान, सर्व्हर डाउनच्या संदर्भात द्राक्ष बागायतदार संघाने खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सर्व्हर आता सुरळीत झाले आहे. आता जरी निर्यातप्रक्रिया सुरळीत झाली असली तरी झालेल्या नुकसानीला सरकारी यंत्रणा जबाबदार असल्याची ओरड द्राक्ष व्यापारी व निर्यातदार करत आहेत. त्यामुळे सरकारच्या या हलगर्जीपणामुळे अप्रत्यक्ष शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. 

बांगलादेशसाठी निर्यातीचे कामकाज यापूर्वी कागदोपत्री होत असे. मात्र, अलीकडे हे सर्व कामकाज ऑनलाइन होऊ लागले आहे. यामध्ये सर्व्हर डाउन झाल्यानंतर व्यापाऱ्यांना पूर्वकल्पना देणे अपेक्षित असते. तसेच तांत्रिक अडचण असताना न टिकणारा माल कागदपत्रे स्वीकारून पुढे पाठविणे गरजेचे आहे.

मात्र, सर्व्हर डाउन झाल्यानंतर सरकारी यंत्रणेचे या कालावधीत सहकार्य झाले नाही. त्यामुळे २५ ते ३० व्यापाऱ्यांनी पाठवलेला ७० टक्के माल खराब झाला. त्यामुळे काहींना तो फेकून द्यावा लागला तर काहींना तोकड्या भावात पश्चिम बंगाल राज्यात स्थानिक बाजारात विकावा लागल्याची माहिती आहे. त्यामुळे बांगलादेशसाठी काम करणारे व्यापारी संकटात सापडले आहेत.

प्रतिक्रिया
आम्ही गेल्या २० वर्षांपासून द्राक्ष खरेदी करून बांगलादेशमध्ये निर्यात करतो. शेतकरी विश्‍वासाने आम्हाला माल देतात. आमचे नुकसान झाले, त्यास सरकारी यंत्रणा अन् सरकारचे धोरण जबाबदार आहे. 
- मोहम्मद निझाम, द्राक्ष व्यापारी, कोलकाताशेतकऱ्याचा मला

खरेदी करून पाठवतो. मात्र, आता नुकसान झाल्याने पैसे कसे द्यायचे. सरकारला आम्ही कर देतो तसेच शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देतो. मात्र सरकारच्या या चुकीच्या कामामुळे आम्ही रस्त्यावर आलो. आता हिम्मत तुटली आहे, सरकारने यात लक्ष द्यावे.
- सरफराज मणियार, द्राक्ष व्यापारी, वडणेर भैरव, ता. चांदवड

 


इतर बातम्या
...शेतकरी मात्र 'फार्म क्वाॅरंटाइन' !सांगली : कोरोनाने सर्वांची झोप उडाली आहे. संपूर्ण...
केसरची चव यंदा दुर्मिळ; संकटांमुळे आंबा...औरंगाबाद: यंदा बहुतांश आंबा बागांना मोजकाच मोहर...
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या...मुंबई : राज्यात कोरोनाबाधित १४५ नवीन रुग्णांची आज...
'राज्यातील पोलीस पाटील, ग्रामसेवकांनाही...बुलडाणा : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव...
उद्धव ठाकरे परिषदेवर जाणार विधानसभेतून...मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव...
मुद्रित माध्यमेच सर्वाधिक विश्‍वसनीय :...नागपूर: कोरोनाविषयी विविध माध्यमे आणि सोशल...
परभणीत पहिल्या दिवशी १७५ किलो...परभणी : कृषी विभागाच्या महाराष्ट्र...
‘कोरोना’च्या सावटातही पैसे काढण्यासाठी...अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटात मदत...
पणन हेल्पलाईनला फोन केला.. अन्‌ ढोबळी...पुणे : पणन मंडळाच्या आंतरराज्य शेतमाल वाहतूक...
बीसीजी लस घेतलेल्यांना कोरोनाचा धोका...पुणे : क्षयरोगाचा (ट्यूबरक्यूलोसिस-टीबी) प्रतिबंध...
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या...मुंबई: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे...
पुणे विभागात यंदा कमी पाणीटंचाईपुणे : मॉन्सून कालावधीतील दमदार पाऊस,...
कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील...नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या...
दूध भुकटी योजनेसाठी १८७ कोटी मंजूर मुंबई: कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या विपरीत...
फळे, भाजीपाला थेट विक्रीसाठी ...नगर : फळे, भाजीपाला विक्रीसाठी नगर जिल्ह्यामधील...
पुणे विभागात धान्याचा साडेसतरा हजार...पुणे : ‘‘पुणे विभागाात दोन एप्रिल रोजी...
पहिल्याच दिवशी २६० किलो मोसंबी वाजवी...औरंगाबाद : आधी बागवानाने मागितली तेव्हा दिली नाही...
लॉकडाऊनमुळे कृषी यांत्रिकीकरणाचे ९...पुणे: राज्याच्या कृषी यांत्रिकीकरण मोहिमेला...
सांगलीतील नागवेलीच्या पानांना मागणी...सांगली : कोरोना विषाणूमुळे परराज्यातून...
कराडमधील ग्राहकांच्या घरी १४० पेट्या...रत्नागिरी : ऐन हंगामात ‘कोरोना’च्या...