agriculture news in Marathi grapes traders registration pending this year Maharashtra | Agrowon

द्राक्ष व्यापारी नोंदणीला यंदाही मुहूर्त नाहीच 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 मार्च 2021

हंगामात द्राक्षाची खरेदी करण्यासाठी देशभरातील व्यापारी सांगली जिल्ह्यात दाखल होतात. द्राक्षाची खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूकही झालेली आहे. 

सांगली ः हंगामात द्राक्षाची खरेदी करण्यासाठी देशभरातील व्यापारी सांगली जिल्ह्यात दाखल होतात. द्राक्षाची खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूकही झालेली आहे. फसवणुकीला आळा घालण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बॅंकेचे पासबुक या कागदपत्रांची पूर्तता करून व्यापाऱ्यांची नोंदणी करावी, अशी मागणी दरवर्षी होते. यंदाही व्यापारी नोंदणीचा विषय बाजूला पडला आहे. 

द्राक्ष खरेदी करताना व्यापाऱ्यांकडून होणारी फसवणूकही नवी नाही. गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होते. हंगाम संपला, की जिल्ह्यातील किती कोटींची फसवणूक झाली आहे, याची आकडेवारी समोर येते. त्यानंतर शेतकरी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतात. त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी आटापिटा करतात.

परंतु व्यापाऱ्यांची कोणतीही माहिती नसल्याने काहीच करता येत नाही. फसवणूक करणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे दरवर्षी कोट्यवधीचे नुकसान होते. त्यावर शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी मोर्चे देखील काढले होते.

जिल्ह्यात द्राक्ष हंगाम सुरू होताच जिल्हा प्रशासन, बाजार समिती, द्राक्ष उत्पादक शेतकरी, पोलिस प्रशासन, शेतकरी संघटना अशी एकत्र बैठक होते. यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून उपाययोजना आखल्या जातात. बाजार समितीच्या माध्यमातून प्रसिद्धिपत्रके देखील गावा गावात वाटले जातात. ग्रामपंचायतीच्या फलकावर व्यापाऱ्यांकडून कोणती कागदपत्रे घेऊन त्याची नोंदणी कशी करायची, याचा देखील उल्लेख केला जातो. हे केवळ हंगाम सुरू झाला की आठ ते दहा दिवस चालते. पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी स्थिती निर्माण होते. मात्र व्यापाऱ्यांनी नोंदणी कुणी करायची, त्यांची कागदपत्रे कोणी घ्यायची, त्यांची संपूर्ण माहिती कोणाकडे द्यायची यासाठी ना बाजार समिती पुढे येते, ना जिल्हा प्रशासन पुढे येते. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन तरीही... 
जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दोनच दिवसांपूर्वी लॉकडाउनची अफवा पसरवून द्राक्ष मालाचे दर पाडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतरही जिल्ह्यात द्राक्ष दरात फार सुधारणा झालेली नाही. पक्क माल सध्या २५ टक्के काढणीला आल्यामुळेही दरावर परिणाम झाला आहे. 

खर्चाची तोंडमिळवणी... 
एप्रिल छाटणीपासून हंगामावर कोरोना संकट आहे. अतिवृष्टी, अवकाळीमुळे खर्चात वाढ झाली. सध्या मिळणाऱ्या खर्चातून तोंडमिळवणी नव्हे तर घातलेली रक्कम तरी निघेल का याची चिंता शेतकऱ्यांना सध्या सतावतेय. 


इतर अॅग्रो विशेष
खतांची दरवाढ नाहीपुणे : रासायनिक खतांच्या किमतींमध्ये कोणत्याही...
खरिपाचे गावनिहाय नियोजन ः कृषिमंत्रीकोल्हापूर ः खरिपाचे नियोजन गावातच करण्यासाठी...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...
राज्यात कृषिपंपधारकांकडून १,१६० कोटींचा...कोल्हापूर : कृषिपंप वीज धोरण योजनेअंतर्गत ११ लाख...
‘रोहयो’ शेततळ्यात प्लॅस्टिक...पुणे : रोजगार हमी योजनेतून शेततळे खोदण्यासाठी...
जोरदार पावसाची शक्यतापुणे : ढगाळ वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. तसेच...
प्राधान्यक्रम एका बाबीला, निवड दुसऱ्याच... नगर : कृषी विभागाच्या राष्ट्रीय कृषी...
म्यानमारी शेतकऱ्याची जीवनदायिनी : इरावडीइरावडी ही म्यानमारमधील सर्वांत मोठी आणि देशातील...
फुलशेतीतून सुखाचा बहर जिद्द, चिकाटी, मेहनत, ज्ञान व व्यावसायिक...
तळलेले गरे, फणसाची फ्रोझन भाजी, फणसाचे...फणस हे कोकणातील महत्त्वाचे मात्र दुर्लक्षित पीक...
अवकाळीचा आजपासून अंदाजपुणे : दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत ढगाळ...
लातूर, अकोल्यात तुरीने ओलांडला सात...लातूर/अकोला ः राज्यात काही दिवसांपासून तूर, हरभरा...
गावरानपेक्षा ब्रॉयलर चिकनला अधिक दरनगर ः राज्यात पहिल्यांदाच गावरान कोंबडीपेक्षा...
पशू बाजार बंद; शेतकरी बैल खरेदीसाठी...जळगाव ः खानदेशात गेल्या काही दिवसांपासून पशुधनाचे...
‘इफ्को’कडून खतांच्या किमतीत वाढपुणे : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या मालाच्या...
खरीप, रब्बी पिकांसाठी पीककर्ज निश्चितीअमरावती : यंदाच्या खरीप व रब्बी हंगामासाठी...
बाजार समित्या टाकणार ‘कात’पुणे : पणन सुधारणांमुळे होणाऱ्या संपूर्ण...
ओल्या काजूगरासाठी प्रसिद्ध कुणकवणसिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकवण (ता. देवगड) हे गाव...
‘बोअरवेल’ संकटाच्या खाईत नेणारी ः...पुणे : श्रीमंतीच्या हव्यासाने आपण जमिनीवरचे पाणी...
बीड जिल्हा बँकेवर अखेर पाच जणांचे...बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर बुधवारी...