agriculture news in marathi, Grapes_pomogranate exhibitions starts in solapur from today, AGROWON | Agrowon

द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनास सोलापुरात आज प्रारंभ
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

सोलापूर : "सकाळ-ॲग्रोवन''च्या वतीने भरविण्यात येत असलेल्या द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे गुरुवारी (ता. ४) सोलापुरात उद्‌घाटन होत आहे.  तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात द्राक्ष-डाळिंब शेतीसंबंधीत नवीन माहिती, ज्ञानाबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार शेतकऱ्यांना अनुभवता येणार आहेच, पण द्राक्ष-डाळिंबातील विविध विषयांवरील चर्चासत्रांची भरगच्च मेजवानी यानिमित्ताने आयोजिण्यात आली आहे. 

सोलापूर : "सकाळ-ॲग्रोवन''च्या वतीने भरविण्यात येत असलेल्या द्राक्ष-डाळिंब प्रदर्शनाचे गुरुवारी (ता. ४) सोलापुरात उद्‌घाटन होत आहे.  तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात द्राक्ष-डाळिंब शेतीसंबंधीत नवीन माहिती, ज्ञानाबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा आविष्कार शेतकऱ्यांना अनुभवता येणार आहेच, पण द्राक्ष-डाळिंबातील विविध विषयांवरील चर्चासत्रांची भरगच्च मेजवानी यानिमित्ताने आयोजिण्यात आली आहे. 

सिव्हिल चौकातील पोलिस हेडक्वॉर्टरसमोरील ॲचिव्हर्स मल्टिपर्पज हॉलमध्ये गुरुवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन होईल. ‘चला, मिळून करूया संपन्नतेच्या प्रवासास सुरवात’, हे ब्रीदवाक्‍य घेऊन ‘सकाळ-ॲग्रोवन''ने हा उपक्रम आयोजिला आहे. राज्यातील अनेक नामवंत कंपन्यांची उत्पादने एकाच ठिकाणी, एकाच छताखाली शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत. गुरुवार (ता. ४), शुक्रवार (ता. ५) आणि शनिवार (ता. ६) असे तीन दिवस सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत हे प्रदर्शन पाहण्यासाठी खुले राहणार आहे. 

या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकरी ते व्यावसायिक असा थेट संवाद साधला जाणार आहे. तसेच शेतकरी ते शास्त्रज्ञ या माध्यमातूनही द्राक्ष-डाळिंबातील विविध प्रश्‍नांवर, व्यवस्थापनावर तज्ज्ञांच्या चर्चासत्रांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. या माध्यमातून नवीन ज्ञान मिळवताना, द्राक्ष आणि डाळिंब शेतीतील नवीन तंत्रज्ञानाचा अाविष्कार अनुभवण्याची संधी या निमित्ताने ‘ॲग्रोवन’ने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे. 

काय आहे प्रदर्शनात
द्राक्ष-डाळिंब शेतीतील विविध तंत्रज्ञान, आवश्‍यक विविध अवजारे, उपकरणे, मुख्यतः इन्फास्ट्रक्‍चर (वायर आणि अँगल), टिश्‍युकल्चर, ड्रीप-मायक्रोइरिगेशन, इक्विपमेंट, ब्लोअर, पॉवर टिलर, ट्रॅक्‍टर, शेततळे, शेडनेट व हेल ग्रीन नेट, फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्‌स, बायोफर्टिलायझर, एक्‍सपोर्ट कंपनी, पॅकिंग आणि कोल्ड स्टोरेज, बॅंक, द्राक्ष प्रक्रिया (बेदाणा), डाळिंब प्रक्रिया (ज्यूस, अनारदाना) आदी क्षेत्रातील नामवंत कंपन्यांची उत्पादने या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असतील.

चर्चासत्रांची मेजवानी
प्रदर्शनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना नवीन ज्ञान, तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, या अनुषंगाने नामवंत तज्ज्ञांच्या चर्चासत्रांची मेजवानीही आयोजिण्यात आली आहे. त्यात शुक्रवारी (ता. ५) दुपारी १२ वाजता संगमनेरचे डाळिंब अभ्यासक, विषयतज्ज्ञ बाबासाहेब गोरे हे ‘शाश्‍वत डाळिंब शेती तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तर दुपारच्या सत्रात तीन वाजता ‘ऑक्‍टोबर छाटणीनंतरचे द्राक्ष व्यवस्थापन’ या विषयावर प्रयोगशील शेतकरी मारुती चव्हाण (पलूस) हे आपले अनुभव सांगतील. शनिवारी (ता.६) दुपारी बारा वाजता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे डॉ. एस.डी.रामटेके ‘द्राक्षातील सुधारित तंत्रज्ञान व संजीवकांचा वापर’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तर दुपारच्या सत्रात तीन वाजता ‘निर्यातक्षम डाळिंब उत्पादन व गटशेती’ या विषयावर प्रयोगशील शेतकरी अंकुश पडवळे बोलतील.

इतर अॅग्रो विशेष
महाबळेश्वरात स्ट्रॉबेरी लागवडीस वेगसातारा  ः जिल्ह्यातील महाबळेश्वर, जावळी, वाई...
संत्र्याच्या आंबिया बहराला गळती; भाव...अकोला : संत्र्याच्या आंबिया बहाराला गळती...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यतापुणे ः परतीचा मॉन्सून देशातून परतल्यानंतर...
दुधाचे थकीत अनुदान देण्याच्या हालचालीपुणे: राज्यातील डेअरी उद्योगांचे अडकलेले...
अमरावती विभागात सोयाबीन उत्पादकता घटलीअमरावती  ः गेल्या काही वर्षांत कापसाला...
‘महाॲग्री ते महाॲग्रीटेक’ एक स्वप्नरंजन राज्यात शेतकऱ्यांची सर्व कामे ऑनलाईन होतील असे एक...
शेण पावडरपासून कलात्मक वस्तूंची...सुमारे ३८ देशी गायींचे संगोपन करीत नागपूर येथील...
शेततळ्यातील पाण्यावर फुलले शेडनेटमधील...पावसाचे कायम दुर्भिक्ष, त्यामुळे शेती अर्थकारणाला...
राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये...जळगावात ११०० ते १८०० रुपये दर जळगाव कृषी...
ऋतुचक्र बदलया वर्षीचा मॉन्सून अनेक बाबींनी वैशिष्ट्यपूर्ण...
प्रतिष्ठेचं वलय होतंय द्राक्ष...द्राक्ष शेतीने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय...
उडीद, मूग, सोयाबीन ऑनलाइन नोंदणीला...औरंगाबाद: हमीदराने उडीद, मूग, सोयाबीन...
सांगली जिल्ह्यात डाळिंबावर रसशोषक...सांगली : मृग हंगाम धरलेल्या बहाराच्या डाळिंबाच्या...
कडधान्य आयातीला मुदतवाढीचा प्रस्तावनवी दिल्लीः देशात यंदा खरिप काडधान्य पिकांची...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाजपुणे: वाढलेल्या उन्हामुळे राज्यात चटका वाढला आहे...
परतीचा मॉन्सून आठ दिवसात माघारीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
आदर्श वनसंवर्धनातून ग्रामविकास साधलेले...वनसंपत्तीचे संवर्धन, वनविकासासह शेतीतही दिशादर्शक...
येतो मी... मॉन्सूनने घेतला देशाचा निरोप...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी...
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...