हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला

मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.
The grass that came to hand and mouth was destroyed by the rain
The grass that came to hand and mouth was destroyed by the rain

अकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सोंगलेले सोयाबीन पावसात भिजले तर काहींचे वाळवण्यासाठी टाकलेले सोयाबीन ओले झाले. अनेकांच्या सोयाबीन सुडीखाली पाणी शिरल्याने आता मळणीचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुसरीकडे यंदा या तीनही जिल्ह्यांत पावसाने सरासरीच्या १०० टक्क्यांवर झेप घेतली आहे. आगामी रब्बीसाठी फायदा होणार आहे.

शनिवार (ता. १६) व रविवारी (ता. १७) या भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचे पाणी सोयाबीनच्या सुड्यांमध्ये शिरले. कापशीचेही अतोनात नुकसान झाले. शासनाने याची दखल घेत तातडीने ओल्या दुष्काळाची घोषणा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, अकोला, मूर्तीजापूर, पातूर या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार तडाखा दिला. खरीप हंगामात सुरुवातीला मूग, उडदाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यानंतर सोयाबीनवर शेतकऱ्यांची आशा टिकून होती. सोयाबीनची बहुतांश ठिकाणी काढणी सुरू झाली होती. अनेकांच्या शेतांमध्ये सोयाबीनची सोंगणी करून सुडी लावण्यात आली होती. दोन तीन दिवसात या सोयाबीनची मळणी शेतकरी करणार होते. अशातच पावसाने ठाण मांडले. 

सोयाबीनच्या पिकाचे मातेरे झाले. अनेक शेतकऱ्यांना पीक झाकण्यासही वेळ मिळाला नाही.  दोन दिवस संततधार पाऊस झाला. सोमवारी (ता. १८) सुद्धा पावसाचे वातावरण होते.  प्री-मॉन्सून कापूस क्षेत्रातील पीक वेचणीला आले होते. कापूस वेचणीची लगबग सुरु झालेली असतानाच पावसामुळे काम ठप्प झाले. सततच्या पावसाने कपाशीच्या बोंड्या कुजल्या. काळ्या पडल्या आहेत. गेल्या ४८ तासांतील पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्याचा अंदाज यंत्रणांकडून सोमवारी घ्यायला सुरुवात झाली  होती.

पावसाने सरासरी ओलांडली यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून जोरदार पाऊस झालेला आहे. पावसाच्या चारही महिन्यांत पिकांचे नुकसान झाले. आता मॉन्सून परतला असताना ही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यंदा अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.  

जिल्हा सरासरी पाऊस प्रत्यक्षातील पाऊस टक्केवारी
बुलडाणा ६९५.४ ७९० ११९.९
अकोला ६९३.७ ७८० ११४.५
वाशीम ७८९ १०२५ १३०.०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com