Agriculture news in Marathi The grass that came to hand and mouth was destroyed by the rain | Agrowon

हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावला

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे.

अकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम, बुलडाणा या तीनही जिल्ह्यांमध्ये झालेल्या जोरदार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. सोंगलेले सोयाबीन पावसात भिजले तर काहींचे वाळवण्यासाठी टाकलेले सोयाबीन ओले झाले. अनेकांच्या सोयाबीन सुडीखाली पाणी शिरल्याने आता मळणीचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. दुसरीकडे यंदा या तीनही जिल्ह्यांत पावसाने सरासरीच्या १०० टक्क्यांवर झेप घेतली आहे. आगामी रब्बीसाठी फायदा होणार आहे.

शनिवार (ता. १६) व रविवारी (ता. १७) या भागात जोरदार पाऊस झाला. पावसाचे पाणी सोयाबीनच्या सुड्यांमध्ये शिरले. कापशीचेही अतोनात नुकसान झाले. शासनाने याची दखल घेत तातडीने ओल्या दुष्काळाची घोषणा करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

अकोला जिल्ह्यात अकोट, तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी, अकोला, मूर्तीजापूर, पातूर या तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार तडाखा दिला. खरीप हंगामात सुरुवातीला मूग, उडदाचे पीक शेतकऱ्यांच्या हातातून गेले. त्यानंतर सोयाबीनवर शेतकऱ्यांची आशा टिकून होती. सोयाबीनची बहुतांश ठिकाणी काढणी सुरू झाली होती. अनेकांच्या शेतांमध्ये सोयाबीनची सोंगणी करून सुडी लावण्यात आली होती. दोन तीन दिवसात या सोयाबीनची मळणी शेतकरी करणार होते. अशातच पावसाने ठाण मांडले. 

सोयाबीनच्या पिकाचे मातेरे झाले. अनेक शेतकऱ्यांना पीक झाकण्यासही वेळ मिळाला नाही.  दोन दिवस संततधार पाऊस झाला. सोमवारी (ता. १८) सुद्धा पावसाचे वातावरण होते.  प्री-मॉन्सून कापूस क्षेत्रातील पीक वेचणीला आले होते. कापूस वेचणीची लगबग सुरु झालेली असतानाच पावसामुळे काम ठप्प झाले. सततच्या पावसाने कपाशीच्या बोंड्या कुजल्या. काळ्या पडल्या आहेत. गेल्या ४८ तासांतील पावसामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्याचा अंदाज यंत्रणांकडून सोमवारी घ्यायला सुरुवात झाली
 होती.

पावसाने सरासरी ओलांडली
यंदाच्या हंगामात सुरुवातीपासून जोरदार पाऊस झालेला आहे. पावसाच्या चारही महिन्यांत पिकांचे नुकसान झाले. आता मॉन्सून परतला असताना ही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. यंदा अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे.
 

जिल्हा सरासरी पाऊस प्रत्यक्षातील पाऊस टक्केवारी
बुलडाणा ६९५.४ ७९० ११९.९
अकोला ६९३.७ ७८० ११४.५
वाशीम ७८९ १०२५ १३०.०

 


इतर बातम्या
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
वीज पुरवठा सुरळीत न केल्यास  ढोरा...शेवगाव, जि. नगर : महावितरणने थकीत वीज बिलासाठी...
सहा हजार शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१-२२) रब्बी...
मॉन्सूनोत्तर पावसाचा सांगलीत  १२ हजार...सांगली : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील द्राक्ष,...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
उचंगी प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के...   कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उचंगी...
श्रीरामपुरात बिबट्याचे चार तास...श्रीरामपूर, जि. नगर ः श्रीरामपूर शहरातील मोरगे...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करू :...सांगली ः गेल्या काही दिवसापांसून संपूर्ण राज्यात...
क्षारपड जमीन सुधारण्यासाठी  केंद्राचे...कोल्हापूर : क्षारपड जमीन सुधारणा योजनेस केंद्र...
पावसामुळे द्राक्ष बागांचे  दोन हजार...पुणे ः जिल्‍ह्यात गेल्या आठवड्यात १ आणि २ डिसेंबर...
खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण...
चाळीसगाव (जि.जळगाव) : अवकाळी पावसामुळे...चाळीसगाव, जि.जळगाव : चाळीसगाव, पाचोरा, भडगाव आदी...
जळगावः अॅग्रोवन व आयसीएल कंपनीतर्फे...जळगाव ः ॲग्रोवन आणि आयसीएल कंपनीच्या संयुक्त...