वराहपालन उत्कृष्ट शेतीपूरक व्यवसाय : उपजिल्हाधिकारी अमानकर

वराहपालन उत्कृष्ट शेतीपूरक व्यवसाय : उपजिल्हाधिकारी अमानकर
वराहपालन उत्कृष्ट शेतीपूरक व्यवसाय : उपजिल्हाधिकारी अमानकर

अकोला : वराहपालन हा चाकोरीबाहेरचा व्यवसाय आहे; परंतु शेतीपूरक व्यवसाय व बाजारपेठेचा विचार करता या व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. मांसाहार करणाऱ्यांच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे वराहपालनाकडे वळावे, असा सल्ला उपजिल्हाधिकारी अशोक अमानकर यांनी दिला. 

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित शेतीपूरक व्यवसाय वराहपालन या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. भारत सरकारच्या नव्याने अस्तित्वात आलेल्या ॲग्रिकल्चर मार्केटिंग इफ्रास्ट्रक्‍चर स्कीम, कृषी विपणन क्षेत्रातील पायाभूत सुविधा योजना, नाबार्डच्या योजना व अर्थसाह्य, याबाबत नाबार्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी अमरावती जिल्हा पुनर्वसन अधिकारी अजय लहाने, स्नातकोत्तर पशुविज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉ. हेमंत बिराडे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक शरद वाळके, जिल्हा अग्रणी बॅंकेचे प्रमुख आलोक ताराणीया आदी उपस्थित होते. 

लहाने म्हणाले, वराहपालन हा उत्कृष्ट शेतीपूरक व्यवसाय आहे. मात्र तो प्रतिष्ठेशी जोडून पाहण्यात येत असल्याने दुर्लक्षित राहला आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय करताना खाद्यावर जास्त खर्च होतो. परंतु वराहांचे खाद्य हॉटेल्स, धाबे, उपाहारगृह, वसतिगृहात शिल्लक असलेल्या अन्नाचा, भाजी मंडईतील टाकाऊ भाजीपाल्याचा उपयोग करता येतो. यामुळे खाद्यावरील खर्चात बचत होते.’’

‘‘या व्यवसायामुळे टाकाऊ पदार्थांच्या विल्हेवाटीचादेखील प्रश्‍न निकाली निघतो. वराहांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे जागतिक बाजारपेठेत त्यांच्या मासाला मोठी मागणी आहे. त्याची एक मादी एका वेळेस आठ ते १० पिले देते. वर्षातून दोन वेळा पिलांना जन्म देते. साधारणतः १८० दिवसांमध्ये त्याचे वजन ८० ते ९० किलोपर्यंत होते,’’ असेही लहाने म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com