प्रक्रिया उद्योगातही मशरूमला मागणी

वाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि दरही मिळतो. वाळवलेले मशरूम हवाबंद करून ठेवल्यास टिकवणक्षमता वाढते.
oyster and turky tail mushroom
oyster and turky tail mushroom

वाळवलेल्या मशरूमला बाजारपेठेत चांगली मागणी आणि दरही मिळतो. वाळवलेले मशरूम हवाबंद करून ठेवल्यास टिकवणक्षमता वाढते.

विशिष्ट मोसमात आणि वर्षभर येणाऱ्या मशरूमला चांगली मागणी असते तसेच दरही चांगला मिळतो. मशरूमपासून लोणचे, पापड, सूप पावडर, हेल्थ पावडर, कॅप्सूल्स, हेल्थ ड्रिंक्स इत्यादी उत्पादने तयार करतात. मशरूमच्या दरामध्ये ऋतुमानानुसार थोडाफार फरक होतो. उन्हाळ्यात चांगला दर मिळतो. वाळवलेल्या मशरूमला ताज्या मशरूम पेक्षा जास्त मागणी आणि चांगला दरही मिळतो. जगभरात मशरूमच्या अंदाजे १४ हजार ते ते २२ हजार प्रजाती आहेत. त्यांपैकी अंदाजे २० ते ३० खाद्य प्रजाती लागवडीच्या आणि १५ वन्य प्रजाती वापरासाठी आहेत.

औषधी गुणधर्म

  • मशरूममध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शिअम असून ते हाडांच्या मजबुतीसाठी मदत करते. मशरूमचे नियमित सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिस, सांधेदुखी आणि हाडांच्या क्षीणतेशी संबंधित इतर आजार होण्याची शक्यता कमी होते.
  • मशरूममध्ये नैसर्गिक प्रतिजैविक आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. हे गुणधर्म आपल्याला विविध संक्रमणापासून दूर ठेवण्यास मदत करतात. मशरूममध्ये मुबलक प्रमाणात असणारे जीवनसत्त्व अ, ब आणि क रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतात.
  • मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी मशरूम सुपर फूड मानले जाते. यामध्ये कर्बोदकांचे आणि चरबीचे प्रमाण कमी असते. मशरूम क्रोमिअमचा चांगला स्रोत आहे. रक्तातील साखरेची पातळी राखण्यास क्रोमिअम मदत करते.
  • मशरूममध्ये विविध प्रकारचे लेक्टिन असतात. जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करतात.
  • जास्त प्रथिने व कमी ऊर्जा असते.
  • किडणीच्या आजारावर गुणकारी.
  • लठ्ठ व्यक्तींसाठी उत्तम आहार.पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी मदत.
  • तंतूपदार्थ, प्रथिने, सेलेनियम आणि पोटॅशिअम तसेच जीवनसत्त्वे ब-१, ब-२, ब-१२, क, ड आणि ई यांची उपलब्धता.
  • रोगजंतू विरोधी, मधुमेह विरोधी, बुरशीजन्य विरोधी, दाहक-विरोधी, अँटी-ऑक्सिडंट, परजीवीविरोधी, अँटी-ट्यूमर, अँटी-व्हायरल असे गुणधर्म.
  • मशरूमचा वापर 

  • औषधी मशरूम द्रव अर्क, पावडर आणि कॅप्सूल यासह अनेक स्वरूपात आहार पूरक.
  • विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये वापर. संपूर्ण ताजे किंवा वाळलेल्या मशरूमपासून चहा देखील बनविला जातो.
  • मशरूमचे विविध प्रकार

    चागा (आयनोटस ओबिलिकस)

  • यास बर्च मशरूम किंवा चागा कॉंक असेही म्हणतात. ही गडद तपकिरी आणि काळी बुरशी असून बहुधा झाडावर वाढते.
  • चागामध्ये आढळणारे घटक अँटी-ऑक्सिडंट, पॉलिफेनोल्स तसेच कॅन्सरविरोधी बेटुलिन आणि बेटुलिनिक ॲसिड यावर प्रभावी ठरू शकतात.
  • कॉर्डिसेप्स (ऑपिओयोकार्डिसेप्स सायनेन्सिस)

  • तांत्रिकदृष्ट्या मशरूम नसले तरी कॉर्डीसेप्स ही एक दुर्मीळ बुरशी आहे. ही केवळ ईशान्य भारतातील सिक्कीमच्या उंच प्रदेशात वाढते.
  • यामध्ये कर्करोगविरोगी गुणधर्म असतात. कोलेस्ट्रॉल आणि ह्रदयरोगावरील उपचारासाठी उपयोगी.
  • ऑयस्टर (प्लायरोटस)

  • ऑयस्टर मशरूम हा बुरशीचा एक प्रकार.
  • हे मशरूम जीवनसत्त्वे, खनिजे आणि ॲटींऑक्सीडंट ने परिपूर्ण.
  • फुप्फुस आणि स्तनाच्या कर्करोगावर फायदेशीर. यामध्ये अनेक दाहक-विरोधी आणि वेदनाशामक घटक.
  • शिताके (लेन्टिन्युला एडोड्स) कर्करोगापासून संरक्षण आणि कोलेस्ट्रेरॉल कमी करण्यास प्रभावी. यामधील लेन्टीनन नावाचा घटक कर्करोगविरोधी असून त्याचा वापर हिपॅटायटीस सी आणि एचपीव्ही सारख्या आजारांच्या उपचारासाठी करतात. टर्की टेल (कॉरिओलस व्हर्सीकलर)

  • - या मशरूमवर तपकिरी रंगाची रिंग असते. हे मशरूम वेगवेगळ्या आकारात आणि रंगात येते.
  • - संसर्गजन्य आजार, कर्करोग आणि एड्स सारख्या आजारांच्या उपचारासाठी वापर.
  • संपर्क -  सोमेश्‍वर खांडेकर, ८४५९५९०४८३ (आदित्य अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com