Agriculture news in Marathi Great response to the ‘Letter to Dairy Minister’ campaign | Page 2 ||| Agrowon

‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ मोहिमेला मोठा प्रतिसाद

टीम अॅग्रोवन
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ या पत्र पाठविण्याच्या मोहिमेला राज्यभर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दूध उत्पादक पट्ट्यातून हजारो पत्र दुग्धविकास मंत्र्यांना पाठविण्यात आली. 

नगर : दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने झालेल्या ‘लेटर टू डेअरी मिनिस्टर’ या पत्र पाठविण्याच्या मोहिमेला राज्यभर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. दूध उत्पादक पट्ट्यातून हजारो पत्र दुग्धविकास मंत्र्यांना पाठविण्यात आली.

काही भागांतून मुख्यमंत्र्यांनाही पत्र पाठविली गेली. त्यामुळे दूध उत्पादकांच्या तीव्र भावना शासनाला पाठविल्या गेल्या असून, दूध उत्पादकांचे प्रश्‍न तातडीने सुटावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. किसान सभेच्या वतीने राज्यातील विधान सभा व विधान परिषदेच्या सर्व आमदारांना पत्र पाठवून दूध उत्पादकांच्या मागण्या कळविण्यात आल्या. मंत्रालयात दुग्धविकास मंत्र्यांच्या कार्यालयात व दुग्धविकास विभागाच्या सचिवांच्या कार्यालयात जाऊन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. दुधाला एफआरपी व इतर ८ मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर काय कार्यवाही सुरू आहे याचा पाठपुरावा करण्यात येत आहे. 

आंदोलनाचा परिणाम तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे दुधाचे खरेदीदर आता काही प्रमाणात सुधारत आहेत. मात्र असे असले तरी दूध व्यवसायातील अस्थिरता दूध व्यावसायिकांना पुन्हा अडचणीत आणू शकते. दूध व्यवसायातील ही अस्थिरता लक्षात घेता संघर्ष समितीने आपला धोरणात्मक मागण्यांसाठीचा संघर्ष नेटाने सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच संघर्ष समितीच्या राज्य समन्वय समितीची बैठक घेऊन याबाबत पुढील संघर्षाची दिशा जाहीर केली जाणार आहे, असे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक व किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी सांगितले.
 


इतर अॅग्रो विशेष
दहा वर्षांवरील हरभरा वाणांना अनुदान नाहीपुणे ः राज्यात रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना हरभरा...
प्रक्रिया उद्योगातून शेती झाली किफायतशीरमानकरवाडी (ता. जावळी, जि. सातारा) येथील संगीता...
यंदा कापूस तेजीतच राहणारपुणे : महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशात...
पावसाने वाढली सोयाबीनची आवक नागपूर ः मध्य प्रदेशात पावसाच्या शक्‍यतेमुळे...
ड्रायपोर्टमुळे संत्रा निर्यातीला चालनानागपूर : वर्धा जिल्ह्यातील सिंधी रेल्वे येथे...
शेतीमाल साठवणूक, तारण कर्ज, ब्लॉकचेनची... पुणे : राज्य वखार महामंडळाच्या शेतीमाल...
मतदार नोंदणीसाठी राज्यभरात...नागपूर : राज्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये १६...
अकोल्यातील सिंचन प्रकल्पांच्या...अकोला ः जिल्ह्यातील सर्व सिंचन प्रकल्पांची देखभाल...
अन्नधान्य भाववाढीच्या चर्चा निराधारपुणे : सध्या अन्नधान्य महागाईच्या चर्चांना ऊत आला...
राज्यात थंडीची चाहूलपुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून)...
इंधन दरवाढ, महागाई दिसत नाही, कांद्याची...नाशिक : एकीकडे इंधन खर्च, निविष्ठांचे वाढते दर,...
पावसामुळे द्राक्ष हंगामात अडचणी वाढल्यानाशिक : सप्टेंबर महिन्यापासून द्राक्ष उत्पादक...
सरासरी ते सरासरीपेक्षा कमी तापमानाचा...पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) १४...
महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा...संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी...
सांगली जिल्ह्यात ५० टक्के द्राक्ष...सांगली : जिल्ह्यात द्राक्ष पिकाच्या फळछाटणीची गती...
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...