राज्यात मागील तीन महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या घटत असताना आठ-पंधरा दिवसांपासून रुग्णसंख्येत म
ताज्या घडामोडी
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे कारभारी ठरविण्यासाठी शुक्रवारी (ता.१५) सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरवात झाली.
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे कारभारी ठरविण्यासाठी शुक्रवारी (ता.१५) सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला सुरवात झाली. सकाळच्या सत्रात मंद असलेली मतदानाची गती दुपारनंतर बऱ्यापैकी वाढली. मतदान करून घेण्यासाठी मोठी चुरस पहायला मिळाली.
मराठवाड्यात ४१३३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. ३८८ ग्रामपंचायती पूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ३५, लातूर २५, नांदेड १०६, परभणी ६६, हिंगोली ७३, जालना २६, बीड १८ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ३९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती पदाधिकाऱ्यांसह, मंत्री, आमदार, खासदारांच्या गावांमध्ये होत असलेल्या या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
आसपासच्या शहरांसह दूरवरच्या शहरातील मतदार कसे मतदानासाठी पोचतील व प्रत्यक्ष मतदानात सहभाग घेतील, यासाठी अनेकांची दमछाक झाली. ऐरवी मतदानासाठी अनुत्साही असणारे शहरातील लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गावाकडे धाव घेताना पाहायला मिळाले. किरकोळ अपवाद वगळता मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली.
औरंगाबाद जिल्हा ः जिल्ह्यातील ५७९ ग्रामपंचायतींसाठी २२६१ केंद्रांवर दुपारी १.३० वाजेपर्यंत ४९.१३ टक्के मतदान झाले होते. एकूण ११ लाख ५६ हजार ६२८ मतदारांपैकी तब्बल ५ लाख ६८ हजार ६२८ मतदारांनी मतदान केले. यामध्ये २ लाख ८७ हजार पुरुष, तर २ लाख ८० हजार ६४० महिला मतदारांचा समावेश होता. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६७ टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली.
लातूर जिल्हा ः जिल्ह्यातील ४०८ ग्रामपंचायतींपैकी २५ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील १३४९ केंद्रांवरून एकूण ६ लाख ३९ हजार २६ मतदारांपैकी ३ लाख ५ हजार ९०४ मतदारांनी मतदान केले. ४७.८७ टक्के झालेल्या मतदानात १ लाख ६५ हजार ९९० पुरुष, तर १ लाख ३९ हजार ९१४ महिला मतदारांचा समावेश होता.
उस्मानाबाद जिल्हा ः जिल्ह्यातील ३८२ ग्रामपंचायतींसाठी १२२९ केंद्रांवर एकूण ५ लाख ९१ हजार ८४ पैकी २ लाख ९० हजार १६६ मतदारांनी दुपारी दीड वाजेपर्यंत मतदान केले. त्यामध्ये १ लाख ५८ हजार ८८३ पुरुष, तर १ लाख ३१ हजार २८३ महिला मतदारांचा समावेश होता. दुपारी दीडपर्यंत ४९.०९ टक्के पोचले. जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६६.२४ टक्के मतदान झाले.
जालना जिल्हा ः जिल्ह्यातील ४४६ ग्रामपंचायतींसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत एकूण ७ लाख २० हजार ७५ मतदारांपैकी २८.१२ टक्के मतदारांनीच मतदान केले होते. त्यामध्ये १ लाख १३ हजार ११३ पुरुष तर ८९ हजार ३५७ महिला मतदारांचा समावेश होता.
- 1 of 1053
- ››