हिरंगी परिसरात किडींना कंटाळून पीक नांगरले

हिरंगी परिसरात किडींना कंटाळून पीक नांगरले
हिरंगी परिसरात किडींना कंटाळून पीक नांगरले

वाशीम : जिल्ह्यात पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला असून मंगरूळपीर तालुक्यातील हिरंगी येथील शेतकऱ्याने सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवला. लष्करी अळी व मोझॅक रोगाने या परिसरातील मोठ्या क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. कीडनाशकांच्या फवारण्या करूनही फायदा न झाल्याने पिकावर ट्रॅक्टर चालविण्याची पाळी या परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.  मंगरुळपीर तालुक्यातील हिरंगी, लाठी, शेलुबाजार हा भाग अडान नदीच्या गाळाने सुपीक म्हणून ओळखला जातो. या परिसरात सोयाबीन हेच मुख्य पीक झाले आहे. हिरंगी येथील शेतकऱ्यांनी पावसाळा उशिरा सुरू होऊनही पदरमोड करीत, कर्ज काढून सोयाबीन पेरले. पीक फुलोऱ्यावरही आले. मात्र, कळ्या धरण्याच्या अवस्थेत हिरंगी परिसरातील सोयाबीन किडींनी फस्त केले. शेतात विनाशेंगांची झाडे उभी आहेत. शेकडो एकरांमध्ये तर झाडाला एकही शेंग नाही. खरीप गेला, किमान रब्बीत तरी काही पेरावं, या आशेने ऐन पोळ्याच्या दिवशी येथील काही शेतकऱ्यांनी पिकावर ट्रॅक्टर चालविला. 

आमच्या हिरंगी गावात सोयाबीन हे मुख्य पीक आहे. तीन वर्षांपासून अवर्षणाने आधीच शेतकरी गलितगात्र झाला असताना, यावर्षी कीटकनाशकांच्या चार ते पाच फवारण्या करूनही अळीने संपूर्ण पीकच नष्ट केले आहे. त्यामुळे पीक नांगरण्याशिवाय पर्याय नव्हता. शेतकऱ्यांना शासनाने आतातरी मदत करावी.  - मोहन सावके, शेतकरी, रा. हिरंगी ता. मंगरुळपीर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com