agriculture news in Marathi, Green chili, guar and ladies finger rates up in solapur, Maharashtra | Agrowon

सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी तेजीतच
सुदर्शन सुतार
मंगळवार, 3 एप्रिल 2018

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, भेंडीला मागणी चांगली राहिली. त्यांची आवकही स्थिर होती. पण त्यांचे दर या सप्ताहातही पुन्हा तेजीतच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, भेंडीला मागणी चांगली राहिली. त्यांची आवकही स्थिर होती. पण त्यांचे दर या सप्ताहातही पुन्हा तेजीतच राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरचीची रोज ३० क्विंटल, गवारची २० क्विंटल आणि भेंडीची १५ क्विंटल आवक राहिली. या सर्व भाज्यांची आवक उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, मोहोळ, बार्शी या स्थानिक भागातूनच झाली. गेल्या दीड-दोन महिन्यांपासून त्यांच्या दरात आणि आवकेत सातत्याने चढ-उतार होताना, तेजीचे वातावरण आहे, या सप्ताहातही ते जैसे थेच राहिले. त्यात मागणी असल्याने तेजी वरचेवर वाढतच राहिली.

हिरव्या मिरचीला प्रतिदहा किलोसाठी २०० ते ४०० रुपये, गवारला २५० ते ३५० रुपये आणि भेंडीला २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. त्याशिवाय वांगी, बटाटा, ढोबळी मिरची यांचे दर काहीसे स्थिर राहिले. बटाट्याला प्रतिदहा किलोसाठी १०० ते १५० रुपये, ढोबळी मिरचीला १२० ते १८० रुपये असा दर मिळाला. वांगी, टोमॅटोच्या दरात मात्र अद्यापही सुधारणा झालेली नाही. त्यांचे दरही काहीसे स्थिर राहिले. वांग्याला प्रतिदहा किलोसाठी ७० ते १२० रुपये आणि टोमॅटोला ३० ते ६० रुपये असा दर मिळाला. भाजीपाल्याच्या दरात मात्र या सप्ताहात काहीशी सुधारणा झाली. भाज्यांची आवक प्रत्येकी १० हजार पेंढ्यांपर्यंत झाली. भाज्यांची आवक ही स्थानिक भागातूनच सर्वाधिक झाली. कोथिंबिरीला शंभर पेंढ्यासाठी २५० ते ४०० रुपये, शेपूला ३०० ते ३५० रुपये आणि मेथीला २०० ते ४५० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याचे दर स्थिर
कांद्याच्या आवकेत या सप्ताहात काहीशी घट झाली. पण दरात मात्र फारशी सुधारणा झाली नाही, कांद्याची आवक प्रत्येकी ७० ते ८० गाड्या आवक झाली.गेल्या दोन आठवड्यांपासून कांद्याचे दर काहीसे स्थिरच आहेत. या सप्ताहातही ते तसेच राहिले. कांद्याला प्रतिक्विंटल २०० ते ८०० व सरासरी ४०० रुपये असा दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादेत फ्लॉवर १८०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...
मराठवाड्यात ४१ हजार हेक्टरवरील मक्यावर...औरंगाबाद : अमेरिकन लष्करी अळीने औरंगाबाद व जालना...
सांगली जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीने...सांगली ः जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी अळीचा...
लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने नगर...नगर   ः गेल्या वर्षभरात दुष्काळाशी...
मोताळा, देऊळगावराजा तालुक्यात शंभर...बुलडाणा : खरिपात विदर्भात मका उत्पादनात...
साताऱ्यात अकराशे हेक्टरवरील मका पिकावर...सातारा : जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाची...
इंदापूर तालुक्यात अडीचशे हेक्टरवर...पुणे   ः गेल्या काही दिवसांपासून...
गुलटेकडीत टोमॅटोचे आवकेसह दरही वाढलेपुणे ः गेल्या आठ दिवसांत पावसाने दिलेल्या...