नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये क्विंटल

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची ३१७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २०००ते ५००० रुपये क्विंटल असे दर मिळाले.
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये क्विंटल
नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये क्विंटल

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची ३१७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २०००ते ५००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने हिरव्या मिरचीचे दर स्थिर होते. लवंगी मिरचीला २००० ते ५००० रुपये तर ज्वाला मिरचीला २५०० ते ४००० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली. गत सप्ताहात उन्हाळ कांद्याची ९४७१ क्विंटल आवक झाली. मात्र आवकेत घट झाल्याचे दिसून आले. उन्हाळ कांद्यास ६५० ते ३२०० क्विंटल असे दर होते. बटाट्याची ४४४१ क्विंटल आवक झाली. बटाट्यास १९०० ते २८०० क्विंटल दर होते. लसणाची आवक १६६ क्विंटल झाली. लसणाला ५६०० ते १०,५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. आल्याची (अद्रक) १७२ क्विंटल आवक झाली. त्यास ८००० ते १०,००० रुपये क्विंटल दर मिळाला. गत सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने दरावर देखील परिणाम दिसून आले. वालपापडी, घेवड्याची ३४३० क्विंटल आवक झाली. वालपापडीला १५०० ते ६२०० रुपये क्विंटल दर मिळाला. घेवड्याला ३००० ते ६७०० रुपये क्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक २४ क्विंटल झाली. त्यास  १९,००० ते २०,००० रुपये क्विंटल दर मिळाला. गाजराची १७२२ क्विंटल आवक झाली. त्यास २५०० ते ४००० रुपये क्विंटल असा दर मिळाला.   

पालेभाज्यांचे दर (रुपये, प्रति १०० जुडी)
पालेभाजी किमान दर कमाल दर
कोथिंबीर २०० १२२००
मेथी २०० ४३००
शेपू १००० ३०००
कांदापात २००० ४६००
पालक १००० १४००
पुदिना ११० १९०

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते ४००, वांग्यास २०० ते ५००,  फ्लॉवरला ८५ ते ४९१ रुपये प्रति १४ किलो असे दर मिळाले. कोबीला ५० ते २२० रुपये प्रति २० किलो दर मिळाला. ढोबळी मिरचीला ३०० ते ५५० रुपये प्रति ९ किलो दर मिळाला. भोपळ्याला २०० ते ४०० रुपये, कारल्यास ३०० ते ४५०, गिलक्याला ३०० ते ६००, काकडीला ३०० ते ५०० तर दोडक्याला ५०० ते ७०० रुपये प्रति १४ किलो असा दर मिळाला. फळांमध्ये गत सप्ताहात केळीची २७६ क्विंटल आवक झाली. केळीला ४०० ते १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मोसंबीची आवक ११२२ क्विंटल झाली. मोसंबीला १८०० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाला. डाळिंबाची ७८७५ क्विंटल आवक झाली. आरक्ता वाणास ३००० ते ५००० रुपये, मृदुला वाणास ३०० ते १०,००० रुपये क्विंटल दर मिळाला. पपईची आवक १७० क्विंटल झाली. पपईला ९०० ते १९०० रुपये क्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com