agriculture news in marathi Green chilies rates between 2000 to 5000 rupees per quintal in Nashik | Agrowon

नाशिकमध्ये हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये क्विंटल

मुकुंद पिंगळे
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची ३१७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २०००ते ५००० रुपये क्विंटल असे दर मिळाले.

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत सप्ताहात हिरवी मिरचीची ३१७ क्विंटल आवक झाली. हिरव्या मिरचीला २०००ते ५००० रुपये क्विंटल असे दर मिळाले. परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने हिरव्या मिरचीचे दर स्थिर होते. लवंगी मिरचीला २००० ते ५००० रुपये तर ज्वाला मिरचीला २५०० ते ४००० रुपये क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

गत सप्ताहात उन्हाळ कांद्याची ९४७१ क्विंटल आवक झाली. मात्र आवकेत घट झाल्याचे दिसून आले. उन्हाळ कांद्यास ६५० ते ३२०० क्विंटल असे दर होते. बटाट्याची ४४४१ क्विंटल आवक झाली. बटाट्यास १९०० ते २८०० क्विंटल दर होते. लसणाची आवक १६६ क्विंटल झाली. लसणाला ५६०० ते १०,५०० रुपये क्विंटल असा दर मिळाला. आल्याची (अद्रक) १७२ क्विंटल आवक झाली. त्यास ८००० ते १०,००० रुपये क्विंटल दर मिळाला. गत सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने दरावर देखील परिणाम दिसून आले. वालपापडी, घेवड्याची ३४३० क्विंटल आवक झाली. वालपापडीला १५०० ते ६२०० रुपये क्विंटल दर मिळाला. घेवड्याला ३००० ते ६७०० रुपये क्विंटल दर मिळाला. वाटाण्याची आवक २४ क्विंटल झाली. त्यास  १९,००० ते २०,००० रुपये क्विंटल दर मिळाला. गाजराची १७२२ क्विंटल आवक झाली. त्यास २५०० ते ४००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. 
 

पालेभाज्यांचे दर (रुपये, प्रति १०० जुडी)
पालेभाजी किमान दर कमाल दर
कोथिंबीर २०० १२२००
मेथी २०० ४३००
शेपू १००० ३०००
कांदापात २००० ४६००
पालक १००० १४००
पुदिना ११० १९०

फळभाज्यांमध्ये टोमॅटोला २०० ते ४००, वांग्यास २०० ते ५००,  फ्लॉवरला ८५ ते ४९१ रुपये प्रति १४ किलो असे दर मिळाले. कोबीला ५० ते २२० रुपये प्रति २० किलो दर मिळाला. ढोबळी मिरचीला ३०० ते ५५० रुपये प्रति ९ किलो दर मिळाला. भोपळ्याला २०० ते ४०० रुपये, कारल्यास ३०० ते ४५०, गिलक्याला ३०० ते ६००, काकडीला ३०० ते ५०० तर दोडक्याला ५०० ते ७०० रुपये प्रति १४ किलो असा दर मिळाला. फळांमध्ये गत सप्ताहात केळीची २७६ क्विंटल आवक झाली. केळीला ४०० ते १००० रुपये क्विंटल असा दर मिळाला. मोसंबीची आवक ११२२ क्विंटल झाली. मोसंबीला १८०० ते ३५०० रुपये क्विंटल दर मिळाला. डाळिंबाची ७८७५ क्विंटल आवक झाली. आरक्ता वाणास ३००० ते ५००० रुपये, मृदुला वाणास ३०० ते १०,००० रुपये क्विंटल दर मिळाला. पपईची आवक १७० क्विंटल झाली. पपईला ९०० ते १९०० रुपये क्विंटल दर मिळाला.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
सांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...
उत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...
नाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
सोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...
राज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...
कोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर :  येथील बाजार समितीत या सप्ताहात...
सोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...
पुणे बाजारात कांदा दरात सुधारणापुणे ः राज्यात सर्वदूर झालेल्या पावसाचा फटका...
नवरात्रोत्सवामुळे फूल बाजाराला `रंग`पुणे: कोरोना संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
परभणीत आवळ्यांना सरासरी ११०० रुपये दरपरभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...