हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये क्विंटल
हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये क्विंटल

राज्यात हिरवी मिरची २००० ते ५००० रुपये क्विंटल

राज्यात हिरवी मिरचीचे दर२००० ते ५००० रुपये प्रतिक्विंटल होते

पुण्यात २००० ते ३००० रुपये पुणे : पुणे बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१९) हिरव्या मिरचीची सुमारे ७ टेम्पो आवक झाली होती. यावेळी प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये दर होते. आणखी दोन तीन दिवसांनी भाजीपाला पुरवठा आणि मागणी सुरळीत होऊन, बाजारपेठ स्थिरावेल असा अंदाज बाजार समितीमधील आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी दिली. बाजारात हिरव्या मिरचीची आवक हि आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून झाली असून, स्थानिक मिरचीचे प्रमाण अत्यल्प आहे. सध्या मागणी नसल्याने दर नियंत्रणात असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

गेल्या चार दिवसांतील आवक आणि दर (रुपये/क्विंटल) 
तारीख   आवक  दर 
१८   ७१३   २००० ते ४००० 
१६   १७५   ४००० ते ७०००
१५   ५१०   २५०० ते ५०००

सांगलीत २५०० ते ३००० रुपये सांगली : येथील शिवाजी मंडईत गुरुवारी (ता. १९) हिरव्या मिरचीची १०० पोत्यांची (एक पोते ४० किलोचे) आवक झाली होती. मिरचीला प्रतिक्विंटल २५०० ते ३००० तर सरासरी २००० रुपये असा दर होता, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. शिवाजी मंडईत कर्नाटक आणि आंध्र प्रदेश राज्यासह सांगली जिल्ह्यातून मिरचीची आवक होते. बुधवारी (ता. १८) मिरचीची ११० पोत्यांची आवक झाली होती. मिरचीस प्रति दहा किलोस २०० ते २५० तर सरासरी २२० रुपये असा दर होता. मंगळवारी (ता. १७) मिरचीची ९० पोत्यांची आवक झाली असून त्यास प्रति दहा किलोस २७० ते ३०० रुपये तर  सरासरी  २३० असा दर मिळाला. सोमवारी (ता. १६) मिरचीची १०० पोत्यांची आवक झाली होती. मिरचीस त्यास प्रति दहा किलोस २५० ते ३०० तर सरासरी २०० रुपये असा दर होता. गतसप्ताहापेक्षा चालु सप्ताहात मिरचीच्या आवकीत वाढ झाली असली तरी दर स्थिर असल्याचे व्यापारी वर्गाने सांगितले. नगरमध्ये ३००० ते ३५०० रुपये नगर : नगर येथील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीत हिरव्या मिरचीची ३६ क्विंटल आवक झाली, प्रति क्विंटलला ३००० ते ३५०० व सरासरी ३२५० रूपये दर मिळाला आहे. दर दिवसाला बाजार समितीत ३० ते ४० क्विंटल आवक होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत अहमदनगरसह शेजारच्या जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची आवक होत असते. मंगळवारी (ता. १७) ३० क्विंटलची आवक होऊन ३००० ते ५००० व सरासरी ४००० रुपयांचा दर मिळाला. शनिवारी (ता.  १४)  रोजी २६ क्विंटल ची आवक होऊन २०००ते ३५०० व सरासरी २७५० रूपयांचा दर मिळाला. गुरुवारी (ता. १२)  ३२ क्विंटल आवक होऊन २५०० ते ३५०० व सरासरी ३००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, असे बाजार समितीतून सांगण्यात आले. नांदेडला २००० ते २५०० रुपये नांदेड :  नांदेड शहरातील इतवारा तसेच तरोडा नाका भागातील भाजीपाला मार्केटमध्ये सध्या स्थानिक शेतकऱ्यांसह कर्नाटक, तेलंगणासह राज्यातून हिरवी मिरचीची आवक होत आहे. गुरुवारी (ता. १९) ७ टन मिरचीची आवक झाली. यास प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये दर मिळाल्याची माहिती ठोक व्यापाऱ्यांनी दिली. मागील महिन्यात हिरव्या मिरचीची आवक घटल्याने दरात सुधारणा झाली होती. परंतु सध्या आवक वाढल्याने दर सर्वसाधारण आहेत. नांदेड जिल्ह्यात इतवारा तसेच तरोडा नाका भागात ठोक बाजार असल्याने याठिकाणी लिलाव होतो. गुरुवारी (ता. १९) बाजारात कर्नाटक, तेलंगणासह सोलापूर, नगर जिल्ह्यातून हिरव्या मिरचीची ७ टन आवक झाली. स्थानिक शेतकरीही बाजारात सध्या मिरची आणत आहेत. या मिरचीला प्रतिक्विंटल २००० ते २५०० दर मिळाल्याची माहिती ठोक व्यापारी महंमद जावेद यांनी दिली. अकोल्यात ३००० ते ३५०० रुपये अकोला : येथील जनता भाजी बाजारात हिरव्या मिरचीला गुरुवारी क्विंटलला सरासरी ३००० ते ३५०० रुपयांदरम्यान दर मिळाला. दिवाळीचे पर्व सुरु असून मालाचा उठाव कमी आहे. याचा परिणाम मिरचीच्या दरावर झाला असल्याचे व्यापारी सूत्राने सांगितले. अकोल्यातील जनता भाजी बाजारात यंदा मिरचीला चांगला दर मिळाला होता. सध्या आवकेत वाढ, ग्राहकांची घटलेली मागणी याचा परिणाम दरावर झाला आहे. गुरुवारी मिरची ३००० ते ४५०० दरम्यान विक्री झाली. सरासरी ३५०० दर होता. बाजारात २८ क्विंटल पर्यंत आवक झाली होती. बाजारात आवक जास्त व मागणी कमी अशी स्थिती आहे. यामुळे सध्याचे हेच दर आणखी काही दिवस टिकून राहण्याची शक्यता व्यापारी सूत्राने व्यक्त केली. औरंगाबादेत ३२५० रुपये औरंगाबाद :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता १९) हिरव्या मिरचीची ११३ क्विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला सरासरी ३२५० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली. औरंगाबाद बाजार समितीमध्ये १२ नोव्हेंबरला ३३ क्विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे सरासरी दर ३१०० रुपये प्रति क्विंटल राहिला. १४ नोव्हेंबरला १५ क्विंटल आवक तर सरासरी दर २७५० रुपये होता. १५ नोव्हेंबरला १८ क्विंटल आवक आणि दर ३२५० रुपये होता. १६ नोव्हेंबरला १७ क्विंटल तर दर ३७५० रुपये मिळाला. १७ नोव्हेंबरला २२ क्विंटल आवक आणि दर ३५०० रुपये राहिला. १८ नोव्हेंबरला ५८ क्विंटल आवक होऊन ३७५० रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्यावतीने देण्यात आली.

नाशिकमध्ये ४००० ते ५००० रुपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता.१८) हिरवी मिरचीची आवक ९ क्विंटल झाली. तिला ४००० ते ५००० व सरासरी ४५०० रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. चालू सप्ताहात आवक कमी जास्त होत आहेत. मंगळवारी (ता.१७) आवक २५ क्विंटल होऊन ५५०० ते ६००० व सरासरी ५७५० रूपये दर होता. सोमवारी (ता.१६) आवक ९ क्विंटल, तर दर ४००० ते ५००० व सरासरी ५३०० रुपये होता. रविवारी (ता.१५) आवक १६ क्विंटल होऊन ४५०० ते ७००० व सरासरी ५५०० रुपये दर होता. शनिवारी (ता.१४) आवक २५ क्विंटल तर दर ३५०० ते ६००० व सरासरी ५००० रुपये होता. शुक्रवारी (ता.१३) ३३ क्विंटल आवक होऊन २५०० ते ५५०० व सरासरी ४००० रुपये दर मिळाला. परभणीत २००० ते ४००० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी  (ता.१९) हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक होती. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटल किमान २००० ते कमाल ४००० रुपये तर सरासरी ३००० रुपये दर मिळाले अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली. येथील मार्केटमध्ये सध्या स्थानिक परिसरातील सिंगणापूर, बोरवंड तसेच कर्नाटकातील बेळगाव, तेलंगणातील सिध्दीपेठ आदी भागातून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी हिरव्या मिरचीची २५ ते ७० क्विंटल आवक झाली. त्यावेळी प्रतिक्विंटल सरासरी ३००० ते ६००० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.१९) हिरव्या मिरचीची ७० क्विंटल आवक झालेली असताना घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ४००० रुपये होते तर किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरु होती असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

मार्केटमधील आवक दर (क्विंटल-रुपये)
तारीख आवक किमान कमाल सरासरी
२२ ऑक्टोंबर ३० ४००० ६००० ५०००
२९ ऑक्टोंबर २५ ४००० ६००० ५०००
५ नोव्हेंबर ४० ३५०० ५००० ४२५०
१२ नोव्हेंबर ४५ ३००० ५००० ४०००
१९ नोव्हेंबर ७० २००० ४००० ३०००

जळगावात २००० ते ३००० रुपये  जळगाव :  कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता.१९) हिरव्या मिरचीची १९ क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल २००० ते  ३००० व सरासरी २८०० रुपये, असे होते. आवक जामनेर, पाचोरा, एरंडोल, जळगाव, औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव, जालना आदी भागातून होत आहे.

बाजार समितीतील आवक व दर (रुपये/प्रतिक्विंटल)
तारीख आवक किमान कमाल सरासरी
१९ नोव्हेंबर १९ नोव्हेंबर २००० ३००० २८००
१२ नोव्हेंबर १७ २१०० ३००० २८५०
५ नोव्हेंबर १९ २००० ३००० २८००
२९ ऑक्टोबर २१ १९०० २९०० २६००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com