Agriculture news in Marathi, Green chilli per quintal 3000 to 3500 rupees in Satara | Page 2 ||| Agrowon

साताऱ्यात हिरवी मिरची प्रतिक्विंटल ३००० ते ३५००

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ३१) हिरवी मिरची, गवारी तेजीत असून टोमॅटो, फ्लॅावर, कोबीच्या आवकेत वाढ झाली आहे. हिरव्या मिरचीची दहा क्विंटल आवक झाली असून मिरचीस दहा किलोस ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला आहे. गुरुवार (ता. २५) तुलनेत मिरचीस दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सातारा ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. ३१) हिरवी मिरची, गवारी तेजीत असून टोमॅटो, फ्लॅावर, कोबीच्या आवकेत वाढ झाली आहे. हिरव्या मिरचीची दहा क्विंटल आवक झाली असून मिरचीस दहा किलोस ३०० ते ३५० रुपये असा दर मिळाला आहे. गुरुवार (ता. २५) तुलनेत मिरचीस दहा किलो मागे ५० रुपयांची दरवाढ झाली असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

संततधार पावसामुळे बाजार समितीत भाज्याच्या आवकेत घट झाली आहे. गवारीची एक क्विंटल आवक झाली असून दहा किलोस ३५० ते ४५० असा दर मिळाला आहे. काकडीची तीन क्विंटल आवक होऊन दहा किलो काकडीस २०० ते २५० असा दर मिळाला आहे. शेवग्याची एक क्विंटल आवक होऊन दहा किलो शेवग्यास ३०० ते ४०० असा दर मिळाला आहे. 

भेंडीची चार क्विंटल आवक झाली असून भेंडीस दहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला आहे. ढोबळी मिरचीची पाच क्विंटल आवक झाली असून दहा किलो मिरचीस २५० ते ३०० असा दर मिळाला आहे. वांग्याची पाच क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १०० ते १६० असा दर मिळाला आहे. कारल्याची ११ क्विंटल आवक झाली असून दहा किलोस २०० ते २५० असा दर मिळाला आहे. 

टोमॅटो, फ्लॅावर, कोबीच्या आवकेत वाढ झाली आहे. टोमॅटोची २५ क्विंटल आवक झाली असून दहा किलो १०० ते १८० असा दर मिळाला आहे. कोबीची सहा क्विंटल आवक होऊन कोबीस दहा किलोस २०० ते २५० असा दर मिळाला आहे. फ्लॅावरची तीन क्विंटल आवक झाली असून दहा किलोस १५० ते २०० असा दर मिळाला आहे. 

पालेभाज्याचे  दर गेल्या सप्ताहापासून स्थिर आहेत. पालेभाज्यात मेथीची एक हजार जुड्याची आवक होऊन शेकड्यास ६०० ते ९०० असा दर मिळाला आहे. कोथिंबिरीची १५०० जुड्याची आवक होऊन शेकड्यास ४०० त ७०० असा दर मिळाला आहे.


इतर बाजारभाव बातम्या
कांदा दरांवर खानदेशात दबावजळगाव  ः खानदेशात प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
लिंबाला राज्यात प्रतिक्विंटल २०० ते...पुणे  ः  गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न...
पुणे बाजार समितीत कांद्याची आवक... पुणे : ‘‘गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
जळगावात भरताची वांगी ९०० ते १५०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.४...
हापूस आंबा पुण्यात दाखलपुणे: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात पालेभाज्यांच्या तुलनेत फळभाज्या...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये द्राक्षे २५०० ते ४३००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत ढोबळी मिरची १५०० ते २५०० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात घेवडा ५०० ते ४२०० रूपये...पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
नाशिकमध्ये गवार ४००० ते ६००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पूर्णा येथे रेशीम कोषास प्रतिकिलोस ५१५...परभणी : पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष...
जळगावात आले २६०० ते ५००० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता.२८...
नगरमध्ये गवार, लसणाच्या दरांत सुधारणा...नगर ः नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसूण,...
सोलापुरात हिरवी मिरची, वांगी,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
राज्यात तूर ४१०० ते ५५०० रुपये...नांदेडमध्ये प्रतिक्विंटल४५५० ते ४७०० रुपये...
खानदेशात कांदा आवक स्थिर; दरात चढउतारजळगाव  ः खानदेशातील प्रमुख बाजार...
हापूस आंब्याची पहिली पेटी कोल्हापूरला...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील कुंभारमाठ (ता. मालवण)...