agriculture news in marathi, Green chillies in Aurangabad have Rs 2000 to Rs 2800 perquintal | Page 2 ||| Agrowon

औरंगाबादेत हिरवी मिरची २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.३) हिरव्या मिरचीची २३४ क्‍विंटल आवक झाली. तिला २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.३) हिरव्या मिरचीची २३४ क्‍विंटल आवक झाली. तिला २००० ते २८०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्यांची ५३७ क्‍विंटल आवक झाली. हिरव्या कांद्याला ४०० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४७ क्‍विंटल आवक झालेल्या फ्लॉवरचा दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. टोमॅटोची आवक १८६ क्‍विंटल झाली. त्याला १४०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ३१ क्‍विंटल आवक झालेल्या वांग्याचे दर ८०० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. गवारीची आवक ७ क्‍विंटल, तर दर २५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ८ क्‍विंटल आवक झालेल्या काकडीला १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ८५ क्‍विंटल आवक झालेल्या भेंडीचे दर १००० ते १४०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ६७ क्‍विंटल आवक झालेल्या कोबीला १००० ते १६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १७ क्‍विंटल आवक झालेल्या लिंबाला १५०० ते ३००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ४ क्‍विंटल आवक झालेल्या शेवग्याचे दर ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले.

दुधी भोपळ्याची १४ क्‍विंटल आवक, तर दर ७०० ते ९०० रुपये,  ढोबळी मिरचीची २३ क्‍विंटल आवक, तर दर १००० ते १५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. कारल्याची आवक २७ क्‍विंटल झाली. त्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. ७३ क्‍विंटल आवक झालेल्या मक्याला ८०० ते १२०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. मोसंबीची आवक १५ क्‍विंटल, तर दर २००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. १३ क्‍विंटल आवक झालेल्या डाळिंबाला १५०० ते ५५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. खजुराची आवक २० क्‍विंटल, तर दर २५०० ते ४५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. 

काशी फळाची २८ क्‍विंटल आवक, तर दर ५०० ते ९०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ९०० क्‍विंटल आवक झालेल्या बटाट्याचे दर ९०० ते १००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. ८९०० जुड्यांची आवक झालेल्या मेथीला ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकड्याचा दर मिळाला. १० हजार जुड्यांची आवक झालेल्या पालकचे दर ५०० ते ७०० रुपये प्रतिशेकडा राहिले. कोथिंबिरीची १४ हजार जुड्यांची आवक झाली. त्यास ३०० ते ५०० रुपये प्रतिशेकडा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 


इतर बाजारभाव बातम्या
नांदेड बाजार समितीत नवीन हळदीची आवक नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
रत्नागिरी बाजार समितीत उद्यापासून आंबा...रत्नागिरी ः आंबा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी...
सांगलीत हळद, गूळाचे सौदे लांबणीवरसांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळद...
औरंगाबादमध्ये आठवड्यापासून मेथी, पालक,...औरंगाबाद : येथील बाजार समितीमध्ये जवळपास...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते १८०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बुलडाण्यात बाजार समित्यांमध्ये शेतमाल...बुलडाणा : जिल्ह्यात लॉकडाऊन कालावधीत सर्व कृषी...
सेनगाव, माकोडी कृषी बाजारात शेतमालाची...हिंगोली : ‘‘सेनगाव कृषी उत्पन्न बाजार समिती,...
मुंबईत हापूसची आवक वाढली; ५ डझन पेटीस...मुंबई : वाहतुकीतील अडथळे दूर केल्याने मुंबई कृषी...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
औरंगाबाद बाजार समितीत मिरचीची १३०...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
मुंबई बाजार समितीत फळांची आवक वाढली मुंबई : जीवनावश्यक वस्तूंचा योग्य पुरवठा व्हावा,...
सोलापुरात ५०० गाड्या कांद्याची आवक,...सोलापूर : कोरोना विषाणूमुळे सोलापूर बाजार...
जळगाव जिल्ह्यात केळीचे दर ३०० ते ४००...जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्तर भारतात...
पुणे बाजार समितीत १० हजार क्विंटल...पुणे : लॉकडाऊमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठाव...
लासलगाव बाजार समितीचे कामकाज पुन्हा बंद नाशिक : ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे लासलगाव...
पुण्यात पोलिस बंदोबस्तात बाजार समिती...पुणे : कोरोनामुळे शहरात लॉकडाऊन असतानाही...
खानदेशातील बाजार समित्यांत आवक सुरळीतजळगाव : खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार येथील...
सोलापुरात बाजार समितीत भाजीपाला...सोलापूर ः कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यभर...
कोल्हापूरमध्ये ‘कोरोना’चा...कोल्हापूर : कोरोनाच्या धसक्‍याने या सप्ताहात...
नागपुरात संत्रादरातील सुधारणा कायमनागपूर ः कोरोनामुळे ‘व्हिटॅमिन सी’ असलेल्या...