Agriculture news in marathi Green chillies average Rs. 3000 per quintal | Page 2 ||| Agrowon

औरंगाबाद : हिरवी मिरची सरासरी ३००० रुपये प्रति क्विंटल

टीम अॅग्रोवन
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२१) हिरव्या मिरचीची ७५ क्विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवारी (ता.२१) हिरव्या मिरचीची ७५ क्विंटल आवक झाली. या हिरव्या मिरचीला सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये शनिवारी कांद्याची ३१८ क्‍विंटल आवक झाली. या कांद्याला सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. १७८ क्विंटल आवक झालेल्या टोमॅटोचे सरासरी दर एक हजार रुपये प्रति क्विंटल राहिले. वांग्याची आवक ५८ क्विंटल, तर सरासरी दर ७५० रुपये प्रति क्‍विंटल राहिला. ७ क्विंटल आवक झालेल्या गवारला सरासरी १७५० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. भेंडीची आवक २७ क्विंटल तर सरासरी दर ७०० रुपये प्रति क्विंटल राहिला.

६४ क्विंटल आवक झालेल्या मक्याला सरासरी ९०० रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. ३८ क्विंटल आवक झालेल्या काकडीचे सरासरी दर ५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. लिंबाची आवक १२ क्विंटल, तर सरासरी दर ७५० रुपये प्रति क्विंटल राहिला. ११ क्विंटल आवक झालेल्या कारल्याला सरासरी ९०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

अंजिराला तीन हजारांचा भाव
दुधी भोपळ्याचे आवक २२ क्विंटल, तर सरासरी दर ६०० रुपये प्रति क्विंटल राहिला. ७२ क्‍विंटल आवक झालेल्या पत्ताकोबीला सरासरी हजार रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला. फ्लॉवरची आवक ७९ क्विंटल तर सरासरी दर ५०० रुपये प्रति क्विंटल राहिला. ४८ क्विंटल आवक झालेल्या ढोबळी मिरचीला १ हजार १००  रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळाला. शेवग्याची आवक २० क्विंटल, तर सरासरी दर ४५०० रुपये प्रति क्विंटल राहिला. २५ क्विंटल आवक झालेल्या वाटाण्याला ४ हजार २५० रुपये प्रति क्विंटलचा  सरासरी दर मिळाला.

मोसंबीची आवक १३ क्विंटल तर सरासरी दर ३ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल राहिला. ६ क्विंटल आवक झालेल्या डाळिंबाचे सरासरी दर ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. १२ क्विंटल आवक झालेल्या अंजीरला सरासरी ३ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. संत्र्याची आवक २३ क्विंटल तर सरासरी दर १६०० रुपये प्रति क्विंटल राहिला. २५ क्विंटल आवक झालेल्या पेरूचे सरासरी दर ५०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ८ क्विंटल आवक झालेल्या बोराला सरासरी ९०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

पपईची आवक ३५ क्विंटल, तर सरासरी दर ४५० रुपये प्रति क्‍विंटल दर राहिले. ११ क्विंटल आवक झालेल्या सीताफळाला सरासरी २ हजार १०० रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. खरबुजाची आवक १७ क्विंटल, तर सरासरी दर १ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल राहिले. ६ हजार ७०० जुड्यांची आवक झालेल्या मेथला सरासरी ४०० रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाला. पालकाची आवक ५८०० जुड्या तर  सरासरी दर ३०० रुपये प्रति शेकडा राहिले. १३००० जुड्यांची आवक झालेल्या कोथिंबिरीला सरासरी १८५ रुपये प्रति शेकड्याचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.


इतर ताज्या घडामोडी
युवकांनी ग्रामीण विकासाचे शिलेदार... नाशिक : ‘‘आधुनिक काळातील युवकांनी उच्च...
पदोन्नतीतील कृषिसहसंचालकात सोलापूरच्या...सोलापूर ः राज्याच्या कृषी विभागाने वर्ग एकमधील...
‘पांडुरंग’चे भालेकर यांना सर्वोत्कृष्ट ...सोलापूर ः मांजरीच्या वसंतदादा शुगर...
नाशिक : डांगसौंदाणे येथे उपबाजार आवार...नाशिक : सटाणा बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील...
पाइप कालव्याद्वारे ६० टक्के पाणी बचत...मालेगाव, जि. नाशिक : दहिकुटे लघू पाटबंधारे...
जळगाव ः भरडधान्य खरेदी खानदेशात रखडतच जळगाव ः  खानदेशात भरडधान्य खरेदी मागील २०...
नांदेडमध्ये खरेदीदारांविरोधात अडत्यांचा...नांदेड : हळद खरेदीदार अडत्यांना दोन...
रब्बीसाठी खानदेशात आवर्तन सुटले गिरणा,...जळगाव ः  खानदेशात विविध प्रकल्पांमधून मागील...
उसाच्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचा...चोपडा, जि.जळगाव : चोपडा शेतकरी सहकारी साखर...
परभणी जिल्ह्यात ‘पोकरा’अंतर्गत योजनांचा...परभणी ः जिल्ह्यात नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
कोल्हापूर बाजार समितीत शिवसेनेतर्फे...कोल्हापूर : ‘‘शेतकऱ्यांना बंदुकीची भाषा...
पीकविमा न मिळाल्यास अन्नत्याग आंदोलनऔरंगाबाद: ‘‘आमचा फळपीक विमा  व इतर पिकांचा...
रयत क्रांतीचा बडोदा बँकेवर आक्रोश मोर्चानांदेड : बँक ऑफ बडोदा शाखेकडून मुखेड तालुक्यातील...
सांगली जिल्हा बँकेच्या थकबाकी वसुलीसाठी...सांगली : जिल्हा बँकेची थकबाकी सुमारे ६५० कोटीहून...
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
पुणे जिल्हा बँकेवर राष्ट्रवादीचे वर्चस्वपुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...
शेतकऱ्यांनाही थंडी जाणवते भाऊ!जलालखेडा, जि. नागपूर ः नरखेड तालुक्यात रब्बी...
‘मँगोनेट’ अंतर्गत सात वर्षांत ४, ५६६... रत्नागिरी : हापूसची परदेशात निर्यात होऊन येथील...
‘जलजीवन मिशन’च्या कामात सातारा अग्रेसरसातारा : जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २३७...
नाशिकमधील उन्हाळ कांद्याचा साठा अखेरीकडेनाशिक : फेब्रुवारी २०२१पासून उन्हाळ कांद्याची...