Agriculture news in marathi Green chillies, guar and okra flourish in Solapur | Agrowon

सोलापुरात हिरवी मिरची, गवार, भेंडी तेजीत 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 एप्रिल 2021

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, भेंडीला पुन्हा एकदा चांगला उठाव मिळाला. त्यामुळे त्यांचे दर या सप्ताहात पुन्हा तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरवी मिरची, गवार, भेंडीला पुन्हा एकदा चांगला उठाव मिळाला. त्यामुळे त्यांचे दर या सप्ताहात पुन्हा तेजीत राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गत सप्ताहात गवार आणि भेंडीची प्रत्येकी ५ ते १० क्विंटल अशी आवक राहिली. तर हिरव्या मिरचीची २० ते ४० क्विंटलपर्यंत आवक झाली. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या आवकेत आणि मागणीत सातत्याने चढ-उतार होतो आहे. या सप्ताहात मात्र त्यात सातत्याने मागणी होत राहिल्याने दर मात्र तेजीत राहिले. गवारला प्रतिक्विंटलला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ४००० रुपये, हिरव्या मिरचीला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये तर भेंडीला किमान १००० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३००० हजार रुपये असा दर मिळाला.

त्याशिवाय वांगी, टोमॅटो, बटाटा यांचे दर पुन्हा स्थिरच राहिले. त्यांच्या आवकेत वाढ असली, तरी मागणी जेमतेम असल्याने फारसा उठाव मिळाला नाही. त्यांची आवक प्रत्येकी ३० ते १०० क्विंटलपर्यंत राहिली. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ६०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक ११०० रुपये, टोमॅटोला किमान २०० रुपये, सरासरी ६०० रुपये आणि सर्वाधिक १००० रुपये तर बटाट्याला किमान १०० रुपये, सरासरी ७०० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याच्या दरात चढ-उतार 
गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये कांद्याची आवक प्रतिदिन १०० ते १५० गाड्यांपर्यंत होते आहे. कांद्याची आवक स्थानिक भागातूनच आहे. मागणी असूनही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच लॅाकडाउनच्या भीतीमुळे कांद्याची आवक वाढते आहे. परिणामी, मागणीही घटत असून, दर पडले आहेत. पंधरवड्यापूर्वी १८०० रुपयांच्याही पुढे असणारा कांदा आता ४०० ते ५०० रुपयांनी उतरला आहे. या सप्ताहात कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रुपये, सरासरी ५०० रुपये आणि सर्वाधिक १४०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे सांगण्यात आले. 
 


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...