Agriculture news in marathi, Green chillies in the state from Rs 1800 to 4000 | Agrowon

राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४००० रुपये

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

सध्या येथील मार्केटमध्ये स्थानिक परिसरातील सिंगणापूर, गोविंदपूरवाडी, शहापूर तसेच बीड जिल्हा आणि तेलंगणातील सिध्दीपेठ येथून हिरव्या मिरचीची आवक होत आहे. गेल्या महिनाभरातील प्रत्येक गुरुवारी हिरव्या मिरचीची ४५ ते ७० क्विंटल आवक झाली. त्या वेळी प्रतिक्विंटल सरासरी १८०० ते ४००० रुपये दर मिळाले. गुरुवारी हिरव्या मिरचीची ६५ क्विंटल आवक झाली. त्या वेळी घाऊक विक्रीचे दर प्रतिक्विंटल २००० ते ३२०० रुपये होते. किरकोळ विक्री प्रतिकिलो ४० ते ६० रुपये दराने सुरू होती, असे व्यापारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले.

.नाशिकमध्ये प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये
नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २१) हिरव्या मिरचीची आवक १५३ क्विंटल झाली. तिला प्रतिक्विंटल किमान २५०० ते कमाल ४००० रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३३०० रुपये आहे, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

मंगळवारी (ता.२०) हिरव्या मिरचीची आवक १२७ क्विंटल झाली. तिला ३००० ते ४५०० असा प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ३९५० रूपये होता. सोमवारी (ता. १९) हीच आवक ३३९ क्विंटल झाली. त्या वेळी ३५०० ते ४५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० राहिला.

रविवारी (ता. १८) हिरव्या मिरचीची आवक ३१९ क्विंटल झाली. तिला ३५०० ते ४५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ४००० होता. 

शनिवारी (ता. १७) आवक ६५ क्विंटल, तर दर ३२०० ते ४००० असा राहिला. सर्वसाधारण दर ३४०० रुपये होता. शुक्रवारी (ता. १६) हिरव्या मिरचीची आवक १३० क्विंटल झाली. तिला ३२०० ते ४००० असा दर मिळाला. सर्वसाधारण ३८०० दर राहिला. मागील आठवड्यापासून बाजार समितीत हिरव्या मिरचीची 
आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे. चालू महिन्यात मिरची आवक कमी झाली असून दरात सुधारणा झाली आहे.

पुण्यात प्रतिदहा किलोस २०० ते ४०० रुपये

गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 
हिरव्या मिरचीची सुमारे १० ते १२ टेम्पो आवक झाली झाली. 
या वेळी दहा किलोला २०० ते ४०० रुपये दर मिळाला. हिरव्या मिरचीची आवक ही प्रामुख्याने आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि गुजरात राज्यांतून होत आहे. स्थानिक आवक अत्यल्प राहिली. सध्या पूरपरिस्थितीमुळे स्थानिक मिरचीची आवक कमी झाल्याने दर वाढलेले आहेत,’’ अशी माहिती बाजार समितीतील सूत्रांनी सांगितली.

सोलापुरात सर्वाधिक २५०० रुपये

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात हिरव्या मिरचीला चांगली मागणी राहिली. तिला प्रतिक्विंटलला सर्वाधिक २५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात या सप्ताहात हिरव्या मिरचीची आवक रोज ३० ते ६० क्विंटलपर्यंत झाली. दर प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा मिळाला. या आधीच्या सप्ताहात हाच दर प्रतिक्विंटलला किमान ९०० रुपये, सरासरी १८०० रुपये आणि सर्वाधिक २८०० रुपयांवर होता. आवक रोज २० ते ४० क्विंटलपर्यंत होती. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातही आवक एकदमच कमी १० ते १५ क्विंटलपर्यंत झाली. पण मागणी असल्याने दर टिकून राहिले. दर प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि  सर्वाधिक  ३००० रुपये इतका मिळाला. पण एकूणच दरातील किरकोळ चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे दिसून आले.

नागपूर  स्थानिक कळमणा बाजार समितीत हिरव्या मिरचीची नियमित आवक असून ती सरासरी २३० क्‍विंटलच्या घरात असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. 

बाजारात महिन्याच्या सुरवातीला २२०० ते २५०० रुपये क्‍विंटलचे दर मिरचीला होते. त्यानंतर १९ ऑगस्टपासून दरात काहीशी सुधारणा झाली. २८०० ते ३२०० रुपये क्‍विंटलचा दर त्यानंतरच्या काळात शेतकऱ्यांना मिळाला. सद्यस्थितीत मिरचीचे दर २५०० ते ३००० रुपयांवर स्थिरावल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. यापुढील काळात काही दिवसांपर्यंत दर स्थिर राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. 

किरकोळ बाजारात मिरची ४० रुपये किलोने मिरचीचे व्यवहार होत आहेत. नागपूरलगतच्या भिवापूर परिसरात तसेच मध्यप्रदेशातील छिंदवाडा भागात मिरचीची लागवड शेतकऱ्यांव्दारे होते. त्यांच्याकडूनच कळमणा मार्केटमध्ये मिरचीचा पुरवठा होतो, असे सांगण्यात आले. सद्यस्थितीत मिरचीची आवक २३० ते २३५ क्‍विंटलवर पोचली आहे. सुरवातीला १४५ ते १५० क्‍विंटल इतकीच मिरचीची आवक होती.

औरंगाबाद येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी(ता. २२) हिरव्या मिरचीची १३० क्‍विंटल आवक झाली. तिला २१०० ते २४०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये १० ऑगस्टला हिरव्या मिरचीची २४७ क्‍विंटल आवक झाली. तिला १३०० ते १७०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १३ ऑगस्ट रोजी १०९ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीचे दर २००० ते २५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. १५ ऑगस्टला तिची १९९ क्‍विंटल आवक झाली. तिला ३००० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १७ ऑगस्ट रोजी मिरचीची आवक ५८ क्‍विंटल, तर दर ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. 

रविवारी (ता. १९) १५४ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला २५०० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. सोमवारी (ता. २०)तिची १५० क्‍विंटल आवक झाली. तिला २५०० ते ४००० रुपये प्रतिक्‍विंटल दर मिळाला. मंगळवारी (ता. २१) १५४ क्‍विंटल आवक झालेल्या हिरव्या मिरचीला ३००० ते ३५०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

अकोल्यात प्रतिक्विंटल १८०० ते ३५०० रुपये 

अकोला  येथील जनता भाजी बाजारात गुरुवारी (ता. २२) हिरव्या मिरचीची १८०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटल दराने विक्री झाली.  मिरचीची आवक सध्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे, अशी माहिती व्यापारी सूत्रांकडून देण्यात 
आली. 

सध्या येथील बाजारात मिरचीचे दर गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहेत. मिरचीची आवक प्रामुख्याने अकोला जिल्हा वगळता इतर जिल्ह्यांमधून होऊ लागली आहे. गुरुवारी मिरची कमीत कमी १८०० रुपये आणि सर्वाधिक ३५०० रुपयांपर्यंत विकली गेली. गुरुवारी २ टनांपेक्षा अधिक मिरचीची आवक झाली. घाऊक विक्रीचा दर प्रतिकिलो ४० ते ६० रुपयांदरम्यान राहिला. मिरचीची आवक आणखी वाढल्यास दरांमध्ये काही अंशी घट होईल, अशी शक्यता व्यापारी सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली.


इतर बाजारभाव बातम्या
औरंगाबादेत कांदा १००० ते ४४०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गाजर ८०० ते १५०० रुपये...परभणी  : येथील पाथरी रस्त्यावरील फळे...
राज्यात द्राक्ष प्रतिक्विंटल १५०० ते...परभणीत ५४०० ते ७००० रुपये परभणी येथील पाथरी...
जळगावात आले २४०० ते ४८०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १५...
सांगलीत गूळ ३२०० ते ४०४५ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. १४...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबांचे दर पुन्हा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
नागपूरला सोयाबीन दरात सुधारण्याचा अंदाजनागपूर : बाजारात उशिरा येणाऱ्या सोयाबीनची प्रत...
पुण्यात भेंडी, बटाट्याच्या आवकेत घट;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
औरंगाबादमध्ये अंजीर ३००० ते ४५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
परभणीत वाटाण्याला २००० ते ३००० रुपये परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
खानदेशात लाल कांद्याची आवक वाढलीजळगाव : खानदेशातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात डाळिंब प्रतिक्विंटल १५० ते ६०००...नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत...
सांगलीत बटाट्यास १५०० ते २२०० रुपये सांगली : विष्णूअण्णा पाटील दुय्यम बाजार आवारात...
जळगावात भरताची वांगी १६०० ते २००० रुपये जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (ता. १...
नगरमध्ये शेवग्याच्या दरांत सुधारणा कायम नगर : नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठ...
नाशिकमध्ये लसणाच्या आवकेत घट; दरात वाढनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
नगर जिल्ह्यात कांदा साडेपाच हजारांवर...नगर ः गेल्या दोन महिन्यांपासून वाढलेले कांद्याचे...
पुण्यात बटाटा, भेंडी, टोमॅटो आवक कमी;...पुणे ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
खानदेशात कापूस दर ५१०० रुपये...जळगाव  ः शासकीय खरेदी बऱ्यापैकी सुरू...
औरंगाबादमध्ये वाटाणा १३०० ते २५०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...