जमीन आरोग्यासाठी हिरवळीचे खत पोषक : हिंदूराव चव्हाण

जमीन आरोग्यासाठी हिरवळीचे खत पोषक : हिंदूराव चव्हाण
जमीन आरोग्यासाठी हिरवळीचे खत पोषक : हिंदूराव चव्हाण

भंडारा : ‘‘शेतीची उत्पादकता कमी होण्यासोबत जमिनीचा पोत खालावण्यामागे रासायनिक खतांचा असंतुलित वापर हे मुख्य कारण आहे. यावर नियंत्रणासाठी धान बांधावर गिरीपुष्प लागवड, हिरवळीच्या खतांचा वापर वाढवा,’’ असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदूराव चव्हाण यांनी केले. 

‘केव्हीके’ साकोलीच्या वतीने ‘खतांचा योग्य वापर’ या विषयावर आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. ‘केव्हीके’चे कार्यक्रम समन्वयक डॉ. एन. एस. वझिरे, वरिष्ठ भात पैदासकार डॉ. जी. आर. शामकुवर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ साबळे, जिल्हा गुणनियंत्रक पी. एन. म्हसकर, प्रयोगशील शेतकरी तानाजी गायधने उपस्थित होते.  डॉ. वझिरे यांनी धान पिकात संतुलित व शिफारशीत खतांचा वापर, जमिनीची आरोग्य पत्रिका, धानातील तुडतुड्याचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. 

‘‘चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या प्रतीचे बियाणे, खतांचे योग्य प्रमाण या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे या बाबींवर शेतकऱ्यांनी लक्ष्य केंद्रित केले पाहिजे, असा सल्ला डॉ. श्‍यामकुंवर यांनी दिला. जमिनीची संरचना, सुक्ष्म आवरण, खतांचे महत्त्व याविषयी म्हसकर यांनी माहिती दिली. वाय. आर. महल्ले यांनी सूत्रसंचालन केले. प्रियंका जांभोळे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com