हरभऱ्यावर घाटे अळी, मर रोग

ढगाळ वातावरण, अंधूक सूर्यप्रकाश, तापमानातील चढ-उतार, यामुळे फुलोरा, घाटे भरण्याच्या अवस्थेतील हरभऱ्यावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. आर्थिक नुकसान पातळी ओळखून शिफारशीत कीटकनाशकांची फवारणी करावी. - डॉ. संजीव बंटेवाड, कृषी कीटकशास्त्र विभागप्रमुख, वनामकृवि. चार एकरवरील हरभऱ्याचे घाटे अळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. मर लागल्याने पीक विरळ झाले आहे. - ज्ञानेश्वर माटे,शेतकरी, अर्धापूर, जि. नांदेड. बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया न केलेल्या हरभरा पिकांवर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. शिफारशीत बुरशीनाशकांची ड्रेचिंग करावी - डॉ. कल्याण आपेट,वनस्पती विकृतिशास्त्र विभाग,वनामकृवि, परभणी.
Green gram causes aloe, die disease In Nanded, Parbhani and Hingoli districts
Green gram causes aloe, die disease In Nanded, Parbhani and Hingoli districts

नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील हरभरा पिकावर घाटे अळी आणि मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. या तीन जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून त्यासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे कीड, रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. रब्बीतील प्रमुख नगदी पीक असलेल्या हरभरा पिकाचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांपुढील अडचणी वाढल्या आहेत.

यंदा रब्बीत या तीन जिल्ह्यांत हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ८८ हजार २६९ हेक्टर आहे. प्रत्यक्षात ३ लाख ५८ हजार ८६१ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. त्यात नांदेड जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १०३ हेक्टर, परभणी जिल्ह्यातील ८० हजार १५८ हेक्टर, हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ६ हजार ६०० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

हरभरा पीक फुलोरा तसेच घाटे लागण्याच्या अवस्थेत आहे. मागील काही दिवसांपासून या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे. अनेक तालुक्यांत गारपीट, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. घाटे अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. मर रोगामुळे पीक वाळून नष्ट होत असल्याने एकरी झाडांची संख्या विरळ होत आहे. खरिपातील सोयाबीन, कपाशी या प्रमुख पिकांचे मोठे नुकसान झाले. 

सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यामुळे यंदा रब्बीतील प्रमुख नगदी पीक असलेल्या हरभऱ्याला या तीन जिल्ह्यांत सर्वाधिक पसंती मिळाली. परंतु, रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com