Agriculture news in Marathi Green gram costs Rs 4,000 to Rs 8,500 per quintal in the state | Page 2 ||| Agrowon

राज्यात मूग ४००० ते ८५०० रुपये क्विंटल

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 3 सप्टेंबर 2021

राज्यात सध्या कमी-अधिक प्रमाणात बाजारात मुगाची आवक होत असून मुगाला प्रतिक्विंटल ४००० ते ८५०० रुपये दर मिळत आहे.

लातुरात सरासरी ६५०० ते ६८२० रुपये 
लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत आठवडाभरात दरदिवशी मुगाची आवक वाढती राहिली आहे. आठवडाभरात आवक झालेल्या मुगाला सरासरी ६५०० ते ६८२० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली. लातूर बाजार समितीमध्ये २६ ऑगस्टला १३५१ क्‍विंटल आवक झालेल्या मुगाचे सरासरी दर ६७५० रुपये प्रतिक्‍विंटल राहिले. २७ ऑगस्टला ९७७ क्‍विंटल आवक झालेल्या मुगाला सरासरी ६८२० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. २८ ऑगस्टला मुगाची आवक ११३६ क्‍विंटल तर सरासरी दर ६६७० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला. ३१ ऑगस्टला १४३४ क्‍विंटल आवक झालेल्या मुगाला सरासरी ६६०० रुपये प्रतिक्‍विंटलचा दर मिळाला. १ सप्टेंबरला मुगाची आवक २२२३ क्‍विंटल तर सरासरी दर ६५०० रुपये प्रतिक्‍विंटल राहिला.

नगरमध्ये सरासरी ६२५० रुपये दर
नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मुगाची दररोज दोन ते चार हजार क्विंटलची आवक होत आहे. मुगाला प्रतिक्विंटल ५५०० रुपये ते ७००० रुपयाचा व सरासरी ६२५० रुपये दर मिळत आहे. नगर जिल्ह्यात या वर्षी मुगाचे मोठे उत्पादन घेतले असल्यामुळे मुगाची आवक सुरू आहे. सध्या दर दिवसाला दोन ते चार हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. २८ ऑगस्ट रोजी ३१४८ क्विंटलचे आवक होऊन ४५०० ते ७१०१  सरासरी ५८०० रुपये दर मिळाला. २४ ऑगस्ट रोजी ४९९२ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते ७१०० रुपये व सरासरी ६०५१ रुपये दर मिळाला. २१ ऑगस्ट रोजी ४१०७ क्विंटलची आवक होऊन सरासरी ५८०० रुपये दर मिळाला.

लासलगावी मूग ४००० ते ७६४३ रुपये
नाशिक : लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. १) मुगाची आवक ४८५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४००० ते ७६४३ रुपये असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७३४० रुपये होते, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंगळवारी (ता. ३१) आवक ३२१ क्विंटल झाली. त्यास ३५०० ते ७५७६ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७३८२ राहिला. सोमवारी (ता. ३०) आवक ४१० क्विंटल झाली. त्यास ३५०० ते ७६०१ प्रतिक्विंटल दर मिळाला. सर्वसाधारण दर ७३६० मिळाला. शुक्रवारी (ता. २७) आवक ३२९ क्विंटल झाली. तिला ४००१ ते ७६५१ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७३४० मिळाला. गुरुवारी (ता. २६) आवक ३८८ क्विंटल झाली. तिला ५००० ते ७४०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ७२६० राहिला. आवक कमी जास्त होत असल्याने त्यानुसार दरात चढउतार होत असल्याचे दिसून आले. रविवारी (ता. २९) व शनिवारी (ता. २८) बाजार बंद असल्याने आवक झाली नाही. मागणीला वर्षीच्या तुलनेत आवक कमी असून दरात तेजी आहे.

जळगावात ७२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर
जळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये या आठवड्यात मुगाची आवक स्थिर राहिली. शेतकऱ्यांकडून आवक कमी होत असून, व्यापारी ते व्यापारी असे व्यवहार होत आहेत. शेतकऱ्यांकडील आवक किरकोळ आहे. प्रतिक्विंटल ७२०० ते ७५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर बाजारात आहे. या आठवड्यात प्रतिदिन १०० क्विंटल एवढी आवक झाली आहे. यंदा पाऊसमान ऐन पेरणीला कमी होते. मध्यंतरी पाऊस लांबला. यामुळे अनेक शेतकरी मूग पेरणीच करू शकले नाहीत. यामुळेच उत्पादनही कमी आहे. जळगाव जिल्ह्यात फक्त पाचोरा, चाळीसगाव, जामनेर, एरंडोल, रावेर, भुसावळ आदी भागात मूग पिकाची स्थिती बरी होती. याच भागात काही व्यापारी खरेदी करून जळगावात मोठ्या खरेदीदारांना मुगाची विक्री करीत आहेत. काही खरेदीदार खेडा खरेदीदेखील यंदा करीत आहेत. कारण बाजारात आवक अत्यल्प आहे. दर स्थिर आहेत. आवक पुढेही फारशी वाढणार नाही, असे जाणकारांनी सांगितले.

परभणीत प्रतिक्विंटल सरासरी ६२५० रुपये
परभणी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २) मुगाची ३० क्विंटल आवक होती. मुगाला प्रतिक्विंटल किमान ६००० ते कमाल ६५०० रुपये, तर सरासरी ६२५० रुपये दर मिळाले, अशी माहिती बाजार समित्याच्या सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्यापासून येथील बाजार समितीत यंदाच्या हंगामातील नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात दररोज सरासरी १० ते ४० क्विंटल मुगाची आवक झाली. बुधवारी (ता. १) २५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ६२०० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ३१) १५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ६३५० रुपये दर मिळाले.

नागपूर ५२०० ते ५४०० रुपये क्विंटल
नागपूर : हंगामातील नव्या मुगाची आवक झाली नसल्याने कळमना बाजार समितीत गेल्या काही महिन्यांपासून मुगाची अवघी तीन क्विंटल होती. गेल्या दोन दिवसांपासून ती ४० क्विंटलवर पोचली आहे. बाजारात मुगाचे दर ५२०० ते ५४०० रुपये क्विंटल असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. कळंबा बाजार समितीत मुगाची आवक कमी होण्यामागे या भागात या पिकाचा पेरादेखील कमी असल्याचे सांगितले जाते. सोयाबीन, कपाशी, तर पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन घेतले जाते. मुगाचे पीक पावसात सापडल्यास नुकसान सोसावे लागते. परिणामी, शेतकरी मूग लागवडीला नकार देतात. याच कारणामुळे या भागात क्षेत्र आणि बाजार समित्यांमध्ये आवक कमी होते. येत्या काळात नव्या मुगाची आवक झाली तरी ती देखील जास्त असणार नाही असे सूत्रांनी सांगितले. पश्‍चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये मुगाचे क्षेत्र पूर्व विदर्भाच्या तुलनेत अधिक आहे.

पुण्यात प्रतिक्विंटल ७८०० ते ८५०० रुपये
पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागात गुरुवारी (ता. २) मुगाची सुमारे १० टन आवक झाली होती. या वेळी क्विंटलला ७ हजार ८०० ते ८ हजार ५०० रुपये दर होता. बाजार समितीमध्ये राजस्थान येथील कोटा आणि बिकानेर येथून ब्रॅण्डेड ३० किलोच्या पॅकिंगमध्ये आवक होत असून, शेतकरी सुटा माल येत नसल्याचे व्यापारी नितीन नहार यांनी सांगितले. यंदा राजस्थानमध्ये पावसाने दडी मारल्याने उत्पादनाला फटका बसला. परिणामी, आवक कमी असून दर देखील प्रति किलोला १० रुपयांनी वाढले आहेत. मूगडाळीचेही दर वाढले असून, डाळींचे दर प्रतिक्विंटल ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० असल्याचे नहार यांनी सांगितले.

सोलापुरात सर्वाधिक ६५०० रुपये दर
सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मुगाला चांगला उठाव मिळाला. मुगाला प्रतिक्विंटलला सर्वाधिक ६५०० रुपये इतका दर मिळाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात मुगाची आवक तशी जेमतेम होती. पण त्या आधीच्या आठवड्यात बऱ्यापैकी राहिली. शिवाय मागणीही होती. या सप्ताहात आवक तुलनेने कमी राहिली. प्रतिदिन २० ते ३० क्विंटल अशी राहिली. त्यामुळे उठावही साधारणच राहिला. पण दर चांगले राहिले. मुगाला प्रतिक्विंटलला किमान ५१०० रुपये, सरासरी ६००० रुपये आणि सर्वाधिक ६५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहात आवकेचे प्रमाण रोज ३० ते ४० क्विंटलपर्यंत आवक होती. पण मागणी असल्याने दरही काहीसे असेच होते. प्रतिक्विंटलला किमान ५००० रुपये, सरासरी ६००० रुपये तर सर्वाधिक ६७०० रुपये असा दर मिळाल्याचे सांगण्यात आले.

नांदेडमध्ये प्रतिक्विंटल ४५०० ते ७००० रुपये
नांदेड : जिल्ह्यात मुगाची लागवड होणाऱ्या देगलूर, मुखेड तालुक्यातील बाजारात सध्या पावसामुळे मुगाची आवक सर्वसाधारण आहे. मंगळवारी ३०० ते ४०० क्विंटल मुगाची आवक देगलूर बाजारात झाली. यास ४५०० ते ७५०० हजार रुपये दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीकडून मिळाली. जिल्ह्यात देगलूर, धर्माबाद, बिलोली, नायगाव, मुखेड तालुक्यांत मुगाची लागवड केली जाते. यंदा पावसाचा खंड असल्यामुळे मुगाचे क्षेत्र घटले आहे. सध्या बाजारात नव्या मुगाची आवक सुरू झाली. परंतु मागील दोन दिवसांपासून पाऊस असल्यामुळे आवक मंदावली आहे. मंगळवारी बाजारात ३०० ते ४०० क्विंटल मुगाची आवक झाली. यास सात हजार रुपये दर मिळाल्याची माहिती गणेश कोडगिरे यांनी दिली.कर्नाटक राज्यात बिदर बाजारात मुगाची आवक वाढली आहे. दररोज तीन हजार ते चार हजार क्विंटल मूग या बाजारात येत आहे. या ठिकाणी मुगाला प्रतिक्विंटल ६००० ते ७००० रुपये दर मिळत असल्याची माहिती व्यापारी बंडेप्पा यांनी दिली.


इतर बाजारभाव बातम्या
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीची आवक, दर...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात कोथिंबीर, मेथीचे दर पुन्हा...सोलापूर ः  सोलापूर कृषी उत्पन्न बाजार...
नगरमध्ये वांगी, घोसाळ्यासह मेथी,...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी...
पुण्यात भाजीपाल्यांच्या दरात वाढ पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात कोथिंबिरीच्या दरात तेजी कायमनाशिकात क्विंटलला ७००० ते १८१०० रुपये नाशिक :...
नगरला दोडका, भेंडीच्या दरात सुधारणानगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
औरंगाबादमध्ये कोबी, वांगी, आले दर स्थिरऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये घेवड्याच्या आवकेत वाढ; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी...नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात हिरव्या मिरची, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरुकोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या...
पुण्यात टोमॅटो, वांगी, शेवगा तेजीत पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये...
नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणापुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार...