`ग्रीन होम`मध्ये सेकंड होम, फार्म हाउस, बंगलो प्लॉट्‌सना पसंती

ग्रीन होम एक्स्पो सिझन २१ चे उदघाटन झाले
ग्रीन होम एक्स्पो सिझन २१ चे उदघाटन झाले

पुणे : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या ‘ग्रीन होम एक्स्पो सिझन २१’ला पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कौटुंबिक ग्राहकांसह विविध व्यावसायिक, उद्योगपती आणि नोकरदारांचा यात समावेश होता. सेकंड होम, फार्म हाउसचे स्वप्न साकार करण्यासाठी शनिवारी (ता.२४) नागरिकांनी सहकुटुंब गर्दी केली होती. आज रविवारी (ता.२५) एक्स्पोचा शेवटचा दिवस आहे.

कोथरूड येथील हर्षल हॉल येथे आयोजित एक्स्पोचे उद्घाटन क्लॉलीकॉन शेल्टरचे केदार बोरकर, वास्तूपूर्वीचे संचालक स्टिवन क्रिस्टी, भूमी इस्टेटच्या तसनीन शेख, वरद सेल्सचे महेश कुंटे, अथर्व डेव्हलपर्सचे सुधीर देशपांडे आणि ग्रीन लॅन्ड कॉर्पोरेशनचे विजय पारख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

निसर्गाच्या सानिध्यात स्वतःचे टुमदार घरकुल असावे, हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या वतीने ग्रीन होम एक्‍स्पोचे आयोजन करण्यात येते. एक ते ११ गुंठे, फार्म हाउस, शेती, बंगला आदी विविध पर्याय विविध लोकेशन्ससह एक्स्पोमध्ये उपलब्ध आहेत. शनिवारच्या सुटीची संधी साधत अनेक कुटुंबीयांनी एक्स्पोला भेट देऊन नोंदणी केली. एक्स्पो आज (रविवार) सायंकाळी ८ पर्यंत सुरू आहे. 

एक्‍स्पोमध्ये सहभागी झालेल्या वरद सेल्सच्या वतीने प्लॉट, फ्लॅट खरेदीवर दुचाकी, फर्निचर भेट देण्यात येणार असल्याचे वरदचे संचालक महेश कुंटे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com