Agriculture news in marathi green pepper price improvement | Agrowon

नगरमध्ये कारले, हिरव्या मिरचीच्या दरात सुधारणा 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 एप्रिल 2021

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार-पाच दिवसांत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कारले, टोमॅटो, कोथिंबिरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे. 

नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार-पाच दिवसांत भाजीपाल्याची आवक वाढली आहे. कारले, हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबिरीच्या दरात काहीशी सुधारणा झाली आहे. भुसारमध्ये काहीशी ज्वारीची आवक सुरू झाली असून, प्रती क्विंटलला साडेतीन हजारांपर्यंतच दर मिळत आहे. 

कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याने लॉकडाउन होण्याची शक्यता दिसत असल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात भाजीपाल्याची आवक वाढली आहे. त्यामुळे दररोज सुमारे आठशे ते साडेआठशे क्विंटल भाजीपाला बाजार समितीत येत आहे. 

बाजार समितीत दर दिवसाला टोमॅटोची १०१ क्विंटलची आवक होऊन १००० ते १५००, वांगीची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन ५०० ते १५००, फ्लॉवरची ८० ते ९० क्विंटलची आवक होऊन १००० ते १५००, कोबीची ९० ते १०० क्विंटलची आवक होऊन २०० ते ३००, काकडीची १५ ते २५ क्विंटलची आवक होऊन १००० ते १५००, गवारची ५ ते १० क्विंटल आवक होऊन ६००० ते ७०००, घोसाळेची २ ते ३ क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते अडीच हजार, दोडक्याची १९ ते २२ क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार, हिरव्या कैरीची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन २००० ते ३०००, भेंडीची १० ते १२ क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते साडेतीन हजार, वालाची ७ ते १० क्विंटलची आवक होऊन दोन हजार ते तीन हजार, घेवड्याची २ ते ३ क्विंटलची आवक होऊन तीन हजार ते साडेतीन हजार, वाटाण्याची १९ ते २० क्विंटलची आवक होऊन ५००० ते ६०००, बटाट्याची २१० क्विटंलची आवक होऊन ८०० ते १२००, लसणाची १५ ते १७ क्विंटलची आवक होऊन ६००० ते ७०००, हिरवी मिरचीची ९० क्विंटलची आवक होऊन ४००० ते ४५०० व सिमला मिरचीची १३ ते १५ क्विंटलची आवक होऊन २००० ते २ हजार ५०० रुपयाचा दर मिळाला. 

पालेभाज्या शंभर जुड्या मेथीला ५०० ते १२००, कोथिंबिरीला ५०० ते ११००, पालकाला ५०० ते १०००,करडईला ५०० ते ७००, शेपूला ५०० ते ७०० रुपयाचा दर मिळाला. 

ज्वारीची अल्प आवक 
बाजार समितीत भुसारमध्ये काहीशी ज्वारीची आवक सुरू झाली असली तरी दर वर्षीच्या तुलनेत अजूनही फारशी आवक नाही. ज्वारीला प्रती क्विंटलला दोन हजार ते साडेतीन हजारांपर्यंतच दर मिळत आहे. बाजरीला १२०० ते १४००, हरभऱ्याला ४५०० ते ४७००, गव्हाला १७०० ते २०००, चिंचेला ६००० ते १४०००, गूळ २५०० ते ३५०० रुपयाचा दर मिळत असल्याचे बाजार समितीचे सचिव अभय भिसे यांनी सांगितले.


इतर बाजारभाव बातम्या
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याचे दर स्थिरपुणे ः  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सोलापुरात गाजर, काकडी, लिंबाला उठाव;...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
राज्यात गवार १००० ते ४००० रुपये क्विंटलअकोल्यात क्विंटलला ३००० ते ३५०० रुपये...
औरंगाबादमध्ये बाजरी, हरभरा,  मका, तूर,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे बाजार समितीत भाज्यांचे दर स्थिर पुणे : कोरोना टाळेबंदीत चक्राकार पद्धतीने सुरू...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोलापुरात द्राक्ष, डाळिंबाचे दर स्थिर,...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात सिमला मिरची, हिरवी मिरचीच्या...पुणे ः शहरातील कोरोना टाळेबंदीमधील शनिवार,...
औरंगाबादमध्ये खरबुजाला सरासरी १०००...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
राज्यात डाळिंब ५०० ते १२००० रुपयेकोल्हापुरात क्विंटलला ३००० ते १२००० रुपये...
सांगलीत बेदाण्याचे सौदे पंधरा दिवस बंदच सांगली ः कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने सांगली...
उन्हाळ कांद्याच्या आवकेसह दरात हळूहळू...नाशिक : जिल्ह्यात गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब...
लवंगी, बेडगी, लाल मिरचीला नगरच्या...नगर ः नगर येथील बाजार समितीत गेल्या दोन ते अडीच...
काबुली हरभऱ्याच्या दरात किंचित सुधारणाजळगाव : खानदेशात काबुली हरभरा दर यंदा टिकून आहेत...
संभाव्य टाळेबंदीमुळे फूल बाजार कोमेजला पुणे : गुढीपाडव्या निमित्त फुलांची वाढलेली मागणी...
कोरोना संकटामुळे हापूसची आवक कमी, दर...पुणे : गुढीपाडव्यासाठी ग्राहकांची हापूसला मोठी...
सोयाबीनची गुढी सात हजारांपार !वाशीम /लातूर/ अकोला ः वाशीम बाजार समितीत सोमवारी...
सोलापुरात बेदाण्याला प्रतिकिलोला २६५...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नगर जिल्ह्यात कांद्याचे दर अस्थिरपुणे नगर : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या...
केळीला विक्रमी १६०० रुपये दरजळगाव ः  खानदेशात चांगल्या दर्जाच्या केळीला...