नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक वाढली

नाशिकः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात टोमॅटो, हिरव्या मिरचीची आवक वाढली होती. भाजीपाल्याच्या दरात मात्र सतत चढउतार सुरुच होते. भुसारची जेमतेम आवक सुरु असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले.
Green pepper in town, The inflow of tomatoes increased
Green pepper in town, The inflow of tomatoes increased

नगर    ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात टोमॅटो, हिरव्या मिरचीची आवक वाढली होती. भाजीपाल्याच्या दरात मात्र सतत चढउतार सुरुच होते. भुसारची जेमतेम आवक सुरु असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

नगर बाजार समितीत आठवडाभरात दररोज टोमॅटोची २०९ क्विंटलची आवक झाली. दर २०० ते ९०० रुपये मिळाले. हिरव्या मिरचीची १०३ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २००० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळाला. वांग्यांची १५ ते ३० क्विंटलची आवक होऊन १००० ते २०००, कोबीची ८९ ते ९५ क्विंटलची आवक होऊन ४०० ते ५००, काकडीची ३१ ते ४० क्विंटलची आवक होऊन १२०० ते १३००, गवारची ८ ते १५ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते ७ हजार, घोसाळ्याची १ ते ३ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २ हजार ५००, दोडक्याची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, भेंडीची २३ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १८००, घेवड्याची ९ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार रुपये दर मिळाले.

बटाट्याची २०४ ते ते २१० क्विंटलची आवक होऊन ८०० ते १२००,शेवग्याची १५ ते १७ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार, शिमला मिरचीची ५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार रुपयाचा दर मिळाला. मका कणसाचीही आवक चांगली होत आहे. मागील आठवड्याला दर दिवसाला पंधरा क्विंटलपर्यंत आवक होऊन ४०० ते ५०० रुपयाचा दर मिळाला. 

भुसारची आवक स्थिर

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार मालाची आवक आठवडाभर स्थिर होती. गावरान ज्वारीला १८०० ते २२५०, बाजरीला १४५० ते १९००, करडईला १४५० ते १९००, वाळलेल्या भुईमूग शेंगाला ४७००, तुरीला ५००० ते ६५००, हरभऱ्याला ४३०० ते ४८००, मुगाला ५५०० ते ७ हजार, उडीदाला ६३०० ते ७०००, गव्हाला १७५१ ते २०५०, सोयाबीनला ७७०० ते८२०० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com