Agriculture news in marathi Green pepper in town, The inflow of tomatoes increased | Agrowon

नगरमध्ये हिरवी मिरची, टोमॅटोची आवक वाढली

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 सप्टेंबर 2021

नाशिक  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात टोमॅटो, हिरव्या मिरचीची आवक वाढली होती. भाजीपाल्याच्या दरात मात्र सतत चढउतार सुरुच होते. भुसारची जेमतेम आवक सुरु असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

नगर  ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील आठवडाभरात टोमॅटो, हिरव्या मिरचीची आवक वाढली होती. भाजीपाल्याच्या दरात मात्र सतत चढउतार सुरुच होते. भुसारची जेमतेम आवक सुरु असल्याचे बाजार समितीतून सांगण्यात आले. 

नगर बाजार समितीत आठवडाभरात दररोज टोमॅटोची २०९ क्विंटलची आवक झाली. दर २०० ते ९०० रुपये मिळाले. हिरव्या मिरचीची १०३ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २००० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळाला. वांग्यांची १५ ते ३० क्विंटलची आवक होऊन १००० ते २०००, कोबीची ८९ ते ९५ क्विंटलची आवक होऊन ४०० ते ५००, काकडीची ३१ ते ४० क्विंटलची आवक होऊन १२०० ते १३००, गवारची ८ ते १५ क्विंटलची आवक होऊन ५ हजार ते ७ हजार, घोसाळ्याची १ ते ३ क्विंटलची आवक होऊन १५०० ते २ हजार ५००, दोडक्याची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते २ हजार, भेंडीची २३ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते १८००, घेवड्याची ९ ते १५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार रुपये दर मिळाले.

बटाट्याची २०४ ते ते २१० क्विंटलची आवक होऊन ८०० ते १२००,शेवग्याची १५ ते १७ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार, शिमला मिरचीची ५० क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ५ हजार रुपयाचा दर मिळाला. मका कणसाचीही आवक चांगली होत आहे. मागील आठवड्याला दर दिवसाला पंधरा क्विंटलपर्यंत आवक होऊन ४०० ते ५०० रुपयाचा दर मिळाला. 

भुसारची आवक स्थिर

नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत भुसार मालाची आवक आठवडाभर स्थिर होती. गावरान ज्वारीला १८०० ते २२५०, बाजरीला १४५० ते १९००, करडईला १४५० ते १९००, वाळलेल्या भुईमूग शेंगाला ४७००, तुरीला ५००० ते ६५००, हरभऱ्याला ४३०० ते ४८००, मुगाला ५५०० ते ७ हजार, उडीदाला ६३०० ते ७०००, गव्हाला १७५१ ते २०५०, सोयाबीनला ७७०० ते८२०० रुपयाचा प्रती क्विंटल दर मिळाला आहे.


इतर बाजारभाव बातम्या
पुण्यात भाजीपाल्याचे दर तेजीत पुणे : गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात टोमॅटो ५०० ते ५००० रुपये क्विंटलनांदेडमध्ये क्विंटलला ३००० ते ५००० रुपये...
झेंडू, शेवंतीच्या फुलांना पुण्यात मागणी...पुणे ः फुलांना विशेष मागणी असणारा दसरा सण अवघ्या...
गूळ सौदे बंदचे विघ्न कोल्हापुरात कायमकोल्हापूर : गुळाच्या बॉक्सचे वजन सौद्यात धरले...
नाशिकमध्ये उन्हाळ कांद्याची मागणी...नाशिक: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
सोलापुरात हिरव्या मिरची, काकडीला उठावसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात रताळे, गुळाची आवक सुरुकोल्हापूर : येथील बाजार समितीत नवरात्रीच्या...
पुण्यात टोमॅटो, वांगी, शेवगा तेजीत पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
राज्यात मोसंबी ८०० ते ४६०० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला १२०० ते ३००० रुपये...
नाशिकमध्ये लवंगी मिरची सरासरी २१५०नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
तूर दरात ५० ते १०० रुपयांची सुधारणापुणे : मागणी वाढल्याने देशभरातील बाजार...
केळीला १२२० रुपये प्रतिक्विंटल दरजळगाव : केळी दरात गेल्या दोन दिवसात किरकोळ घसरण...
पुण्यात पालेभाज्यांची आवक स्थिर पुणे : गुलेटकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार...
बऱ्हाणपूरला केळीला हंगामातील सर्वाधिक दरजळगाव :  खानदेशात केळीचे दर टिकून आहेत. मध्य...
राज्यात सीताफळ १००० ते १४००० रुपये...सोलापुरात प्रतिक्विंटलला २००० ते ५००० रुपये...
नगरमध्ये हिरवी मिरची, भेंडी, दोडक्याला...नगर : नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
पुण्यात पालेभाज्यांच्या दरात वाढ पुणे : खरीप हंगामानंतर भाजीपाल्याचे रब्बीचा हंगाम...
राज्यात सोयाबीन ३००० ते ६७०० रुपये...अकोल्यात प्रतिक्विंटलला ४५०० ते ५५०० रुपये...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
दोन आठवडे अगोदरच खरीप कांदा बाजारातनाशिक : जिल्ह्यातील चांदवड,देवळा, मालेगाव, येवला...