मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात

आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गंत राज्यात हंगाम २०२०-२१ मध्ये हमीभावाने शेतकऱ्यांकडून मूग आणि उडदाच्या खरेदीसाठी कृषी विभागाच्या प्रथम अंदाजानुसार जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आलेली आहे .
मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात
मूग, उडीदाची उत्पादकता जाहीर; सर्वाधिक जालना जिल्ह्यात

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गंत राज्यात हंगाम २०२०-२१ मध्ये हमीभावाने शेतकऱ्यांकडून मूग आणि उडदाच्या खरेदीसाठी कृषी विभागाच्या प्रथम अंदाजानुसार जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकता निश्चित करण्यात आलेली आहे . राज्यात केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत मूग आणि उडदाची हमीभावाने (प्रतिक्विंटल अनुक्रमे ७१९६ रुपये आणि ६००० रुपये) खरेदी करण्यासाठी नाफेडतर्फे राज्य सहकारी पणन महासंघ, विदर्भ सहकारी पणन महासंघ, महाएफपीसीअंतर्गंत शेतकरी उत्पादक कंपन्यांतर्फे शेतकऱ्यांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. गुरुवार (ता.१) पासून मूग, उडदाची खरेदी सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या योजने अंतर्गत होणारी खरेदी व्यवस्थित व सुरळितपणे होण्यासाठी कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या पहिल्या अंदाजानुसार जिल्हानिहाय प्रतिहेक्टरी उत्पादकतेनुसार प्रतिशेतकरी मूग आणि उडदाची उत्पादकता निश्चित करण्यात आलेली आहे. राज्यातील ३२ जिल्ह्यांसाठी मूग आणि उडदाची उत्पादकता जाहीर करण्यात आलेली आहे.त्यानुसार खरेदी करण्याचे आदेश राज्य सहकार पणन महासंघाचे (मुंबई) व्यवस्थापकीय संचालक, दि विदर्भ सहकारी पणन महासंघाचे (नागपूर) कार्यकारी संचालक, महाएफपीसीचे (पुणे) व्यवस्थापकीय संचालक यांना सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या अवर सचिव सुनंदा घड्याळे यांनी दिले आहेत.  

उडीद -मूग प्रतिहेक्टरी उत्पादकता (क्विंटलमध्ये)
जिल्हा उडीद मूग
औंरगाबाद ७.५० ७.००
जालना १०.०० १०.००
परभणी ४.२० ४.५०
हिंगोली ६.५० ६.००
नांदेड ६.२५ ६.००
लातूर ५.७५ ५.५०
उस्मानाबाद ३.१० ३.००
बीड ४.५३ ६.४१
नाशिक ६.०० ७.२०
धुळे ४.५० ३.५०
नंदूरबार ५.४० ५.३०
जळगाव ५.७३ ५.६७
नगर ६.०० ४.००
अमरावती ६.०० २.००
अकोला ५.२७ ४.९५
बुलडाणा ६.२५ ६.००
वाशीम ६.७५ ६.५०
यवतमाळ ४.२० ३.९१
नागपूर ५.५० ४.५०
वर्धा २.१० २.१०
चंद्रपूर ४.५० ४.५०
गडचिरोली २.९७ २.९७
पुणे ५.३५ ३.५०
सोलापूर ४.६० ४.४०
सातारा ५.५५ ६.५३
सांगली ६.४० ६.७४
कोल्हापूर ८.७० ७.५०
ठाणे ७.६५ ३.५०
पालघर ३.५३ ४.०२
रायगड ४.६० ४.५०
रत्नागिरी ४.५० ४.९१
सिंधुदुर्ग ४.८० ५.९९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com