सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वाढतेय हिरवाई

The greenery is rising on the cusp of the Satpuda Mountains
The greenery is rising on the cusp of the Satpuda Mountains

वडपाणी जि. बुलडाणा ः सातपुडा पर्वतरांगांमध्ये वर्षानुवर्षे पसरलेले जंगल तोडल्याने हा प्रदेश उजाड बनत चालला आहे. प्रयत्न करूनही वृक्षतोडीला थांबविता न आल्याने मोठे संकट या ठिकाणी तयार होत असतानाच त्याचा परिणाम वन्यजीव सृष्टीवरही पडू लागला. आशेचा किरण उगवावा तसा प्रयत्न मागील चार वर्षांत सुरू झाला आणि त्याचे चांगले परिणाम आता समोर येऊ लागले. तरुण पिढीने ठरविले तर काहीही होऊ शकते, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. चार वर्षांत जवळपास एक लाख झाडांचे रोपण जळगाव जामोद (जि. बुलडाणा) तालुक्यात असलेल्या या वडपाणी परिसरात झाले आणि तब्बल ७५ टक्क्यांपेक्षा रोपे आज जिवंत असून दरदिवशी वाढत आहेत. 

सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या या भागात आदिवासी वर्षानुवर्षे राहत आहेत. सुविधा नसल्या तरी त्यांनी या प्रदेशाला आपलेसे मानलेले आहे. याच भागात विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीची सुमारे ७२ एकर शेती आहे. आता हा परिसर सालइबन नावाने ओळखला जात आहे. महात्मा गांधी लोकसेवा संघाकडे असलेली ही जमीन पूर्णतः पडीक होती. त्यावर केवळ गवत उगवत होते. कुणीही देखरेखीला नसल्याने वृक्षतोड, जनावरांचे चराई क्षेत्र तेथे बनले होते. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त बोडके डोंगरच दिसायचे. 

चार वर्षांपूर्वी या ठिकाणी खामगावच्या तरुणाई फाउंडेशनने कामाला सुरुवात केली. मंजितसिंग शिख, नारायण पिठोरे, राजू कोल्हे, उमाकांत कांडेकर आदी तरुणांचा सहभाग असलेल्या या फाउंडेशनने वृक्षारोपण व संवर्धनाचे काम हातात घेतले. केवळ वृक्ष लावून मोकळे न होता गेल्या चार वर्षांत लागवड झालेल्या वृक्षांपैकी ७५ टक्क्यांवर रोपे जगविण्यात यश मिळवले. जलसंधारणाच्या कामांना निसर्गाची साथ या डोंगरांवर कुठेही पाण्याचा शाश्‍वत व कायमस्वरूपी स्रोत नसल्याने ७२ एकरात ठिकठिकाणी जलसंधारणाचे उपचार करण्यात आले. 

परिसरात नाला खोलीकरण, खोलगट भागात तळेनिर्मिती अशी विविधकामे केली.  भूदान चळवळीतील ७२ एकर वगळता आजूबाजूला असलेली वनजमीन, ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ईक्लास जमिनीवरही गेल्या दोन वर्षांत तरुणाच्या कार्यकर्त्यांनी वृक्षारोपण केले. वनविभागाच्या जागेवर २५ हजार आणि ग्रामपंचायतीच्या ताब्यातील ईक्लास जमिनीवर ग्रामस्थांच्या सहकार्याने सुमारे ५५ हजार रोपांची लागवड केली. ही रोपे जगविण्यातही यश आलेले आहे.

लागवड केलेले वृक्ष  डोंगराळ भाग असल्याने तेथे जगू शकतील अशाच वृक्षांची लागवड करण्यात आली. प्रामुख्याने चिंच, वड, पिंपळ, आवळा, अंजन, बिहाडा, मोह, बांबू, सालई, पेरू, संत्रा, लिंबू, कडूनिंब, अशा वृक्षांना प्राधान्य दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com