मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची शक्यता

पावसाने उडीद, मूग, सोयाबीन पिकाचा ऐन काढणी हंगाम सुरू असताना मोठा फटका दिला आहे. पावसात भिजल्यामुळे पिकांना कोंब फुटण्याची शक्यता आहे.
Greens, soybean crop likely to sprout
Greens, soybean crop likely to sprout

पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाने उडीद, मूग, सोयाबीन पिकाचा ऐन काढणी हंगाम सुरू असताना मोठा फटका दिला आहे. पावसात भिजल्यामुळे पिकांना कोंब फुटण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यासह विदर्भात ही पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यात सर्वाधिक पाऊस नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे पडला आहे. त्यामुळे कपाशी पिकाला ही मोठा फटका बसला असून कपाशी भिजल्याने नुकसान होणार आहे.

गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला होता. दुपारनंतर होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली. पावसाला पोषक वातावरण झाल्याने सोमवारी (ता. २०) सायंकाळनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरसह यवतमाळ, वर्धा, वाशीम जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या घनसांगवी ७७ मिलिमीटर, मंथा ६६, पातूर ७७ मिलिमीटर तसेच परभणीतील सेलू येथे ९५ मिलिमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, उत्तर महाराष्ट्रातील नगर जळगाव जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस पडला.  

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) कोकण : पालघर : जव्हार ५४, विक्रमगड ४६, रायगड : माथेरान ४२, पनवेल ८१, सिंधुदुर्ग : कुडाळ ४४, मुलदे (कृषी) ९९, ठाणे : शहापूर ५८, उल्हासनगर ६२. मध्य महाराष्ट्र : नगर : चास ३४, पाथर्डी ३१, जळगाव : अंमळनेर ३९, भाडगाव ४४, पाचोरा ४०. मराठवाडा : बीड : माजलगाव ३१, जालना : आंबड ३१, घनसांगवी ७७, मंथा ६६, पातूर ७७, लातूर : रेणापूर ४७, शिरूर अनंतपाळ ३०, नांदेड : हिमायतनगर ३४, उस्मानाबाद : उस्मानाबाद ४२, परभणी : मानवत ५४, परभणी ३१, पाथरी ३९, सेलू ९५. विदर्भ : भंडारा : भंडारा ५२, लाखणी ५२, पवनी ६१, चंद्रपूर : भद्रावती ३१, गोंडपिंपरी ३८, सिंदेवाही ४३, वरोरा ४२, गडचिरोली : अहेरी ३१, भामरागड ४३, मुलचेरा ४१, सिरोंचा ३१, नागपूर : भिवापूर १२४, कुही ३६, पारशिवणी ३८, रामटेक ६३, उमरेड ४०, वर्धा : समुद्रपूर ३९, वाशीम : रिसोड ४१, यवतमाळ : पांढरकवडा ४७, राळेगाव ३०, वणी ८५, झारी झामणी ५२.

 मराठवाड्यात शेतकरी धास्तावले मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतो आहे. अंदाजाप्रमाणे बरसणारा पाऊस मराठवाड्यातील जालना परभणी व बीड या तीन जिल्ह्यांतील १९ मंडळांत अतिवृष्टी झाली. या मंडळांत जालना जिल्ह्यातील १५, बीडमधील एक, तर परभणीतील ३ मंडळांचा समावेश आहे. तर नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर पावसाने काही दिवस उघडीप दिली होती. तसेच परभणी जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी (ता. २०) सायंकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. ५२ मंडळांमध्ये सरासरी २५.८ मिलिमीटर पाऊस  झाला. सेलू तालुक्यातील ३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या काळात शेतकरी काढणीला आलेल्या उडीद, मुगासह सोयाबीनची कापणी करण्याची कामे सुरू आहेत. तोच दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा धास्तावले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com