Agriculture news in Marathi Greens, soybean crop likely to sprout | Page 2 ||| Agrowon

मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

पावसाने उडीद, मूग, सोयाबीन पिकाचा ऐन काढणी हंगाम सुरू असताना मोठा फटका दिला आहे. पावसात भिजल्यामुळे पिकांना कोंब फुटण्याची शक्यता आहे. 

पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाने उडीद, मूग, सोयाबीन पिकाचा ऐन काढणी हंगाम सुरू असताना मोठा फटका दिला आहे. पावसात भिजल्यामुळे पिकांना कोंब फुटण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यासह विदर्भात ही पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यात सर्वाधिक पाऊस नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे पडला आहे. त्यामुळे कपाशी पिकाला ही मोठा फटका बसला असून कपाशी भिजल्याने नुकसान होणार आहे.

गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला होता. दुपारनंतर होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली. पावसाला पोषक वातावरण झाल्याने सोमवारी (ता. २०) सायंकाळनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरसह यवतमाळ, वर्धा, वाशीम जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या घनसांगवी ७७ मिलिमीटर, मंथा ६६, पातूर ७७ मिलिमीटर तसेच परभणीतील सेलू येथे ९५ मिलिमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, उत्तर महाराष्ट्रातील नगर जळगाव जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस पडला.  

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)
कोकण : पालघर : जव्हार ५४, विक्रमगड ४६, रायगड : माथेरान ४२, पनवेल ८१, सिंधुदुर्ग : कुडाळ ४४, मुलदे (कृषी) ९९, ठाणे : शहापूर ५८, उल्हासनगर ६२.
मध्य महाराष्ट्र : नगर : चास ३४, पाथर्डी ३१, जळगाव : अंमळनेर ३९, भाडगाव ४४, पाचोरा ४०.
मराठवाडा : बीड : माजलगाव ३१, जालना : आंबड ३१, घनसांगवी ७७, मंथा ६६, पातूर ७७, लातूर : रेणापूर ४७, शिरूर अनंतपाळ ३०, नांदेड : हिमायतनगर ३४, उस्मानाबाद : उस्मानाबाद ४२, परभणी : मानवत ५४, परभणी ३१, पाथरी ३९, सेलू ९५.
विदर्भ : भंडारा : भंडारा ५२, लाखणी ५२, पवनी ६१, चंद्रपूर : भद्रावती ३१, गोंडपिंपरी ३८, सिंदेवाही ४३, वरोरा ४२, गडचिरोली : अहेरी ३१, भामरागड ४३, मुलचेरा ४१, सिरोंचा ३१, नागपूर : भिवापूर १२४, कुही ३६, पारशिवणी ३८, रामटेक ६३, उमरेड ४०, वर्धा : समुद्रपूर ३९, वाशीम : रिसोड ४१, यवतमाळ : पांढरकवडा ४७, राळेगाव ३०, वणी ८५, झारी झामणी ५२.

 मराठवाड्यात शेतकरी धास्तावले
मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतो आहे. अंदाजाप्रमाणे बरसणारा पाऊस मराठवाड्यातील जालना परभणी व बीड या तीन जिल्ह्यांतील १९ मंडळांत अतिवृष्टी झाली. या मंडळांत जालना जिल्ह्यातील १५, बीडमधील एक, तर परभणीतील ३ मंडळांचा समावेश आहे. तर नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर पावसाने काही दिवस उघडीप दिली होती. तसेच परभणी जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी (ता. २०) सायंकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. ५२ मंडळांमध्ये सरासरी २५.८ मिलिमीटर पाऊस  झाला. सेलू तालुक्यातील ३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या काळात शेतकरी काढणीला आलेल्या उडीद, मुगासह सोयाबीनची कापणी करण्याची कामे सुरू आहेत. तोच दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा धास्तावले आहे.


इतर बातम्या
जालन्यात ३९९५ खातेदारांचे आधार...जालना : जिल्ह्यात कर्जमाफी योजनेअंतर्गत एकूण १...
जळगाव जिल्ह्यात फळपीक विमा योजनेतून...जळगाव  : पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत...
कोल्हापूर :महावितरणच्या थकबाकीमुक्तीत ...कोल्हापूर : कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
नाशिक : शेतकरी सोसायटीकडून सभासदांना १५...नाशिक : निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत परिसरात...
कृषिपंप वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीत...सोलापूर ः कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
‘दूधगंगा वेदगंगा’ एकरकमी ३०५६ रुपये...कोल्हापूर : ‘‘बिद्री (ता. कागल) येथील श्री...
वऱ्हाडात सोयाबीनची बाजारात हजारो...अकोला ः वऱ्हाडातील सर्वच बाजार समित्यांमध्ये...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
उसाच्या तोडणीला कोल्हापुरात सुरुवातकोल्हापूर: जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
नांदेडमध्ये ‘रयत क्रांती’कडून शासन...नांदेड : रयत क्रांती संघटनेच्या वतीने आमदार...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
हिरापुरात कापसाची पाण्यातच वेचणीपारोळा, जि. जळगाव : खरीप हंगामाच्या वेळी पावसाने...
मालेगाव तालुक्यात ऊस जळून खाककळवाडी, ता. मालेगाव : तालुक्यातील नरडाणे...
पुणे जिल्ह्यात रब्बीचे अडीच लाख हेक्टर...पुणे  ः ‘‘सध्या रब्बी हंगाम सुरू झाला आहे....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी...वाशीम : जिल्ह्यात २६ व २७ सप्टेंबर आणि २ व १७...
नांदेड जिल्ह्यात पीकविमा भरपाईची...नांदेड : अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्‌भवून सहा लाख...