Agriculture news in Marathi Greens, soybean crop likely to sprout | Page 3 ||| Agrowon

मूग, सोयाबीन पिकाला कोंब फुटण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 सप्टेंबर 2021

पावसाने उडीद, मूग, सोयाबीन पिकाचा ऐन काढणी हंगाम सुरू असताना मोठा फटका दिला आहे. पावसात भिजल्यामुळे पिकांना कोंब फुटण्याची शक्यता आहे. 

पुणे : राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, मराठवाड्याच्या जालना जिल्ह्यातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे. पावसाने उडीद, मूग, सोयाबीन पिकाचा ऐन काढणी हंगाम सुरू असताना मोठा फटका दिला आहे. पावसात भिजल्यामुळे पिकांना कोंब फुटण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यासह विदर्भात ही पावसाने धुमाकूळ घातला असून राज्यात सर्वाधिक पाऊस नागपूर जिल्ह्यातील भिवापूर येथे पडला आहे. त्यामुळे कपाशी पिकाला ही मोठा फटका बसला असून कपाशी भिजल्याने नुकसान होणार आहे.

गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका वाढला होता. दुपारनंतर होणाऱ्या ढगाळ हवामानामुळे उकाड्यातही वाढ झाली. पावसाला पोषक वातावरण झाल्याने सोमवारी (ता. २०) सायंकाळनंतर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाच्या अनेक भागांत जोरदार पावसाला सुरुवात झाली.

पूर्व विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरसह यवतमाळ, वर्धा, वाशीम जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक होता. मराठवाड्यातील जालना जिल्ह्याच्या घनसांगवी ७७ मिलिमीटर, मंथा ६६, पातूर ७७ मिलिमीटर तसेच परभणीतील सेलू येथे ९५ मिलिमीटर पावसाची नोंद होत अतिवृष्टी झाली. बीड, लातूर, नांदेड, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकणातील पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, उत्तर महाराष्ट्रातील नगर जळगाव जिल्ह्याच्या काही भागांत चांगला पाऊस पडला.  

मंगळवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग)
कोकण : पालघर : जव्हार ५४, विक्रमगड ४६, रायगड : माथेरान ४२, पनवेल ८१, सिंधुदुर्ग : कुडाळ ४४, मुलदे (कृषी) ९९, ठाणे : शहापूर ५८, उल्हासनगर ६२.
मध्य महाराष्ट्र : नगर : चास ३४, पाथर्डी ३१, जळगाव : अंमळनेर ३९, भाडगाव ४४, पाचोरा ४०.
मराठवाडा : बीड : माजलगाव ३१, जालना : आंबड ३१, घनसांगवी ७७, मंथा ६६, पातूर ७७, लातूर : रेणापूर ४७, शिरूर अनंतपाळ ३०, नांदेड : हिमायतनगर ३४, उस्मानाबाद : उस्मानाबाद ४२, परभणी : मानवत ५४, परभणी ३१, पाथरी ३९, सेलू ९५.
विदर्भ : भंडारा : भंडारा ५२, लाखणी ५२, पवनी ६१, चंद्रपूर : भद्रावती ३१, गोंडपिंपरी ३८, सिंदेवाही ४३, वरोरा ४२, गडचिरोली : अहेरी ३१, भामरागड ४३, मुलचेरा ४१, सिरोंचा ३१, नागपूर : भिवापूर १२४, कुही ३६, पारशिवणी ३८, रामटेक ६३, उमरेड ४०, वर्धा : समुद्रपूर ३९, वाशीम : रिसोड ४१, यवतमाळ : पांढरकवडा ४७, राळेगाव ३०, वणी ८५, झारी झामणी ५२.

 मराठवाड्यात शेतकरी धास्तावले
मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढतो आहे. अंदाजाप्रमाणे बरसणारा पाऊस मराठवाड्यातील जालना परभणी व बीड या तीन जिल्ह्यांतील १९ मंडळांत अतिवृष्टी झाली. या मंडळांत जालना जिल्ह्यातील १५, बीडमधील एक, तर परभणीतील ३ मंडळांचा समावेश आहे. तर नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनंतर पावसाने काही दिवस उघडीप दिली होती. तसेच परभणी जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी (ता. २०) सायंकाळी विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस सुरू झाला. ५२ मंडळांमध्ये सरासरी २५.८ मिलिमीटर पाऊस  झाला. सेलू तालुक्यातील ३ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. या काळात शेतकरी काढणीला आलेल्या उडीद, मुगासह सोयाबीनची कापणी करण्याची कामे सुरू आहेत. तोच दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा धास्तावले आहे.


इतर बातम्या
मॉन्सूनोत्तर पावसामुळे पुण्यात पशूधन,...पुणे ः जिल्ह्यात बुधवारी (ता.१) झालेल्या अवकाळी...
नगरमध्ये दोन दिवस  कांदा लिलाव बंद...पुणे नगर ः बाजारात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात...
विजबिलाविरुद्ध शेतकऱ्यांनी  एकत्र यावे...अकोला ः वीज कंपनीकडून सातत्याने चुकीचे देयके देऊन...
राजुरातील हिरव्या मिरचीची बाजारपेठ...अमरावती ः बांगलादेशला होणारी निर्यात थांबल्याच्या...
बारामती परिमंडलात कृषिपंपांचे  ५०२...पुणे : राज्य शासनाच्या ‘कृषिपंप धोरण-२०२०’ च्या...
  रब्बी हंगामाला बसला  बदलत्या...रिसोड, जि. वाशीम ः मागील दहा ते पंधरा दिवसांपासून...
नाशिक: मॉन्सूनोत्तरचा ३८ हजार हेक्टरला...नाशिक: जिल्ह्यात झालेल्या दोन दिवसांच्या अवकाळी...
पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसामुळे दारणा...नाशिक: शहर आणि जिल्ह्यात बुधवार (ता.१) पासून...
सोयाबीनचे विक्रमी बीजोत्पादनअंबाजोगाई, जि. बीड : गत ५० वर्षांत पहिल्यांदा...
लातूर जिल्ह्यात कांदा करपला; तूर, हरभरा...औसा, जि. लातूर : गेल्या काही महिन्यांपासून पडत...
खानदेशात कांदा रोपवाटिकांचे विषम...जळगाव ः खानदेशात बुधवारी (ता.१) रात्री अनेक भागात...
परभणी जिल्ह्याती पीकविमा २९ हजार...परभणी ः ‘‘पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरिपातील...
सोलापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी...
रत्नागिरीत हापूसच्या कलमांची कणी...रत्नागिरी ः मुसळधार मॉन्सूनोत्तर पावसाने पहिल्या...
सांगली जिल्ह्यात वीजबिल थकबाकीमुक्तीतून...सांगली : शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२०...
परभणी जिल्हा बॅंकेतर्फे १३४ कोटींची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
सांगली जिल्ह्यात पावसाचा द्राक्ष,...सांगली ः जिल्ह्यात बुधवारी (ता. १) रात्री...
परभणी, हिंगोली जिल्ह्यांत कापूस वेचणीची...परभणी ः परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक भागात...
दहा दिवसांत जालन्यातील शेतकऱ्यांना...जालना : पुढील १० दिवसांत राज्य व केंद्र...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबाच्या...