Agriculture news in marathi Grinding licenses to 24 factories in the district | Page 4 ||| Agrowon

सोलापूर जिल्ह्यातील २४ कारखान्यांना गाळप परवाना

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 4 नोव्हेंबर 2021

सोलापूर जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांना एक नोव्हेंबरअखेर यंदाच्या हंगामात ऊस गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडून परवाना मिळाला असून, आठ साखर कारखान्यांना गाळप परवान्याची अद्याप प्रतीक्षा आहे. 

माळीनगर, जि. सोलापूर  : जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांना एक नोव्हेंबरअखेर यंदाच्या हंगामात ऊस गाळपासाठी साखर आयुक्तालयाकडून परवाना मिळाला असून, आठ साखर कारखान्यांना गाळप परवान्याची अद्याप प्रतीक्षा आहे. दरम्यान, एक नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील आठ कारखान्यांनीच गाळप सुरू केले आहे. 

यंदाचा गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती. मात्र,गाळप हंगामाच्या तोंडावर झालेला पाऊस, ऊस वाहतुकदारांनी उगारलेला संपाचा बडगा यामुळे कारखान्यांना प्रत्यक्ष गाळप सुरू करण्यास विलंब झाला. गाळप परवाना मिळालेल्या जिल्ह्यातील २४ पैकी सात कारखानेच सुरू झाल्याचे आकडेवारी सांगते. गाळप परवाना मिळालेल्या बहुतांश साखर कारखान्यांनी मोळी पूजन केले 
आहे. पण गाळपास अद्याप सुरवात व्हायची आहे. 

गाळप परवाना मिळालेले कारखाने 
भैरवनाथ शुगर-३, लोकमंगल ॲग्रो, लोकमंगल शुगर, भैरवनाथ शुगर-३, सासवड माळी, कूर्मदास, विठ्ठलराव शिंदे, बबनराव शिंदे शुगर्स, युटोपियन शुगर्स, विठ्ठल कार्पोरेशन, श्री पांडुरंग, सहकार महर्षी, भैरवनाथ-५ (आलेगाव), सिद्धेश्‍वर, जकाराया शुगर, जयहिंद, गोकूळ शुगर्स, शेतकरी चांदापुरी (ओंकार शुगर्स), सीताराम महाराज खर्डी, गोकूळ माउली, लोकनेते बाबूराव पाटील ॲग्रो इंडस्ट्रीज अनगर, विठ्ठलराव शिंदे युनिट-२ करकंब, औदुंबररावजी पाटील, सांगोला साखर कारखाना.


इतर ताज्या घडामोडी
मोदी म्हणाले, शेतकरी माझ्यासाठी मेलेत...चंडीगड ः मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे...
रब्बी पीक हानीबाबत पूर्वसूचना दाखल करापुणे ः राज्यात खरिपानंतर आता रब्बी हंगामातील...
थंडी कमी, तापमानात वाढपुणे : राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
सिंधुदुर्गात ऊसतोड रखडलीसिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील ऊसशेती तोडणी अभावी...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
‘महाबीज’च्या बीजोत्पादकांना मिळणार एकच...अकोला ः राज्यातील शेतकऱ्यांना वर्षानुवर्षे...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
चोपडा साखर कारखाना कर्मचाऱ्यांचे धरणे...चोपडा, जि.जळगाव : चोपडा साखर कारखान्याचे काही...
पुष्प संशोधन संचालनालयाचे कार्यालय,...पुणे ः भारतीय कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या...
हुलगे हुलगे-पावन पुलगे..! वेळा...नांदेड : सोलापूर, मराठवाडा, कर्नाटकच्या सीमेवरील...
पशुरोगांच्या निदान, उपचारात नव...अकोला ः कोरोनासारख्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍...
कापडावर वाढीव जिएसटीला तुर्तास स्थगिती...कापडावरचा जीएसटी (GST) वाढवण्याचा निर्णय...
सोयाबीन बाजार सुधारलागेल्या आठवड्यात सरकारने तीन महत्त्वाचे निर्णय...
मी विजबील माफीची घोषणा केलीच नव्हती :...मुंबई : आज विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन (...
कागलच्या जनावरांच्या बाजाराला मिळतोय...कागल  : कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार...
Big Breaking - बैलगाडा शर्यतींना...नवी दिल्ली :  महाराष्ट्रातील बैलगाडा...
इजिप्त, इराण, तुर्कस्तान अन पाकच्या...नाशिक  : लाल कांद्याची (Red Onion) आवक...
शिर्डीत सहकार परिषद; केंद्रीय...शिर्डी : पहिला सहकारी साखर कारखाना, अशी ओळख...