दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’चे मैदान

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २०) विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदींच्या उपस्थितीत झाली.
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’चे मैदान The ground of 'Gokul' will be painted among the veterans
दिग्गज प्रस्थापितांमध्ये रंगणार ‘गोकुळ’चे मैदान The ground of 'Gokul' will be painted among the veterans

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीसाठी मंगळवारी (ता. २०) विरोधी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवारांची घोषणा पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आदींच्या उपस्थितीत झाली.

गेल्या निवडणुकीत उमेदवारी दिलेल्या बिनीच्या शिलेदारांना डावलून या वेळी मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नाविद, खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र, आमदार राजेश पाटील यांच्या पत्नी व खासदार मंडलिक यांच्या भगिनी सौ. सुश्‍मिता, माजी आमदार के. पी. पाटील यांचे पुत्र रणजित पाटील, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड यांचे पुत्र कर्णसिंह, माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील यांचे पुत्र अमरसिंह यांना उमेदवारी देऊन घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. 

दरम्यान, पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीसह गेली पाच वर्षे ‘गोकुळ’च्या सत्ताधाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरून लढणाऱ्या शेतकरी कामगार पक्षासह बाळासाहेब कुपेकर, विजयसिंह मोरे, किरणसिंह पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी सदस्य मधुकर देसाई, किशोर पाटील आदींना ठेंगा दाखवण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीत विरोधी आघाडीचे उमेदवार असलेल्या तब्बल १२ जणांना या वेळी उमेदवारी नाकारण्यात आली. गेल्या वेळी महिला गटातून उमेदवार असलेल्या श्रीमती संजीवनीदेवी गायकवाड यांच्याऐवजी त्यांचे पुत्र कर्णसिंह यांना उमेदवारी देण्यात आली. माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनाही अनसूचित जाती प्रवर्गातून उमेदवारी देण्यात आली आहे.

  पॅनेल असे... 

  • सर्वसाधारण गट ः विश्‍वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, बाबासाहेब श्रीपती चौगले, अजित नरके, नावेद मुश्रीफ, करणसिंह गायकवाड, वीरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, प्रकाश रामचंद्र पाटील, रणजित के. पी. पाटील, विद्याधर गुरबे, एस. आर. ऊर्फ संभाजी रंगराव पाटील, महाबळेश्‍वर शंकर चौगले, किसन बापुसो चौगले. 
  • इतर मागासवर्ग ः अमरसिंह यशवंत पाटील. 
  • अनुसूचित जाती, जमाती ः डॉ. सुजित मिणचेकर, 
  • भटक्‍या विमुक्‍त ः बयाजी देवू शेळके 
  • महिला प्रतिनिधी ः सुश्‍मिता राजेश पाटील, अंजना रेडेकर.
  • बारा विद्यमान संचालकांना पुन्हा उमेदवारी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत (गोकुळ) सत्तारूढ गटातून विद्यमान अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्यासह तब्बल १२ विद्यमान संचालकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.  माजी आमदार महादेवराव महाडीक यांच्या स्नूषा व अमल महाडीक यांच्या पत्नी शौमिका, माजी मंत्री भरमू पाटील यांचे पुत्र व विद्यमान संचालक दीपक पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील यांच्या मातोश्री व विद्यमान संचालिका सौ. अनुराधा पाटील-सरूडकर, माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र विद्यमान संचालक अंबरिश घाटगे, ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांचे पुत्र चेतन अशा राजकीय पार्श्‍वभूमी असलेल्या घराण्यातील व्यक्तींना उमदेवारी देत सत्तारूढ गटानेही काही प्रमाणात का असेना घराणेशाहीला प्राधान्य दिले आहे. 

    सत्तारूढ गटाने तब्बल ६ नव्या चेहऱ्यांना संधी देताना गडहिंग्लज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रकाश चव्हाण, धनाजी देसाई, रवीश उदयसिंह पाटील-कौलवकर, प्रताप पाटील-कावणेकर, राजाराम भाटले, रणजित बाजीराव पाटील या सहा नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. गेल्या निवडणुकीत कमी मतांनी पराभूत झालेले माजी अध्यक्ष कै. राजकुमार हत्तरकी यांचे पुत्र सदानंद यांना पुन्हा एकदा नशीब अजमावण्याची संधी सत्तारूढ गटाने दिली आहे.  सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडीक, अरूण नरके, माजी खासदार धनंजय महाडीक, माजी आमदार अमल महाडीक यांच्यासह उमेदवारांच्या उपस्थितीत या नावांची घोषणा करण्यात आली.

    सत्तारूढ पॅनेल असे 

  • सर्वसाधारण गट ः अध्यक्ष रवींद्र आपटे, संचालक रणजितसिंह पाटील, धैर्यशील देसाई, वसंत खाडे, उदय पाटील, दीपक पाटील, सत्यजित पाटील, अंबरिश घाटगे, चेतन नरके, सदानंद हत्तरकी, धनाजीराव देसाई, रवीश पाटील-कौलवकर, प्रताप पाटील-कावणेकर, प्रकाश चव्हाण, राजाराम भाटले, रणजित बाजीराव पाटील.
  • इतर मागासवर्गीय गट ः संचालक पी. डी. धुंदरे 
  • भटक्‍या विमुक्त गट ः संचालक विश्‍वास जाधव 
  • अनुसूचित जाती ः संचालक विलास कांबळे 
  • महिला प्रतिनिधी ः संचालिका अनुराधा पाटील-सरूडकर, शौमिका अमल महाडीक
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com