agriculture news in Marathi ground nut producers in trouble Maharashtra | Agrowon

भुईमूग खर्चालाही महाग

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 मे 2021

उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या भुईमूग उत्पादकांना शेंगा लागलेल्या नसल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे.

अकोला ः उन्हाळी हंगामात यंदा लागवड केलेल्या भुईमूग उत्पादकांना शेंगा लागलेल्या नसल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे. जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील भुईमुगाला कुठे चार-पाच, तर कुठे एकही शेंग लागलेली नसल्याच्या तक्रारी समोर येऊ लागलेल्या आहेत. बहुतांश शेतात हा प्रकार झालेला असल्याने लावलेला खर्चही निघण्याची शक्यता दिसत नाही. 

जानेवारीत लागवड केलेल्या भुईमुगाच्या शेंगा परिपक्व होण्याच्या स्थितीत आहेत. काही शेतकऱ्यांनी सुरुवातीच्या टप्प्यात लागवड केल्याने काढणी सुरू केली. भुईमुगाचे झाड उपटून बघितले असता अत्यंत त्रोटक संख्येने शेंगा लागलेल्या असल्याने बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. 

अकोला तालुक्यातील माझोड शिवारात भेट दिली असता गोपाल शिवराम काळे या शेतकऱ्याने सांगितले, की त्यांनी यंदा सहा बॅग भुईमूग लावलेला आहे. साधारणतः दोन एकर एवढे हे क्षेत्र आहे. बियाणे महामंडळाचे हे बियाणे १७०० रुपये बॅग प्रमाणे विकत घेतले होते. शेतात पेरणी, मशागत, खत, पाणी, पिकाची राखण असा मोठा खर्च झाला. कुठे चार-पाच, तर कुठे एकही शेंग दिसत नसल्याने आता पीक काढण्यासाठी पैसे कसे जुळवायचे, असा प्रश्‍न निर्माण झाल्याचे काळे म्हणाले. 

याच गावातील संतोष समाधान टाले यांनी महामंडळाचे ८ बॅग भुईमूग पेरला आहे. पिकात बहुतांश ठिकाणी बुरशी लागलेली आहे. उपाययोजना करूनही फरक पडला नाही. एकरी दोन पोते खत दिले. ट्रॅक्टरने पेरणी केली होती. आता उपटण्यासाठी एकरी पाच ते सहा हजार रुपये खर्च लागणार आहे. दुसरीकडे अवघ्या चार ते पाच शेंगा लागलेल्या असल्याने उत्पादन खर्च निघण्याची शक्यता वाटत नाही. आपण मागील अनेक वर्षांपासून भुईमुगाचे पीक घेतो. यंदासारखी परिस्थिती यापूर्वी कधीच निर्माण झाली नव्हती, असेही ते म्हणाले. यंदा भुईमुगाची काढणी सुरू झालेली असून काळे, टाले यांच्यासारखाच इतरही शेतकऱ्यांना अनुभव येत आहे. 

वन्यजीवांपासून पीक वाचविण्याची कसरत 
उन्हाळ्यात इतर पिके नसल्याने वन्यजीवांना खाण्यासाठी पर्याय नसतो. अशा वेळी ज्या शेतकऱ्यांनी भुईमूग लागवड केली, त्यांना हे पीक वाचविण्यासाठी दिवसरात्र शेतातच घालवावे लागत आहेत. माकड, रानडुकरांपासून पीक वाचविण्यासाठी मागील महिनाभरापासून मोठी कसरत सुरू आहे. सर्व कामे सोडून पिकाचे संरक्षण करीत शेतकरी शेतातच थांबलेले पाहायला मिळतात. पिकाकडे थोडे जरी दुर्लक्ष झाले, तर माकड, रानडुकरे मोठे नुकसान करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. 

प्रतिक्रिया 
मागील अनेक वर्षांपासून उन्हाळी भुईमूग घेत आहे. पहिल्यांदाच भुईमुगाला चार ते पाच शेंगा लागल्याचे अनुभवत आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला असताना पिकाची अशी स्थिती झाल्याने पिकाचा खर्च निघणेही शक्य नाही. मी १७०० रुपये दराने ८ बॅग भुईमूग बियाणे अनुदानावर खरेदी केले होते. आता उत्पादन किती मिळेल, माहिती नाही. 
- संतोष समाधान टाले, भुईमूग उत्पादक, माझोड, ता. जि. अकोला 
 


इतर अॅग्रो विशेष
तुरळक ठिकाणी मुसळधार शक्य पुणे : कोकणसह राज्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस...
हा तर मत्स्य दुष्काळाच! जगातील आघाडीच्या ‘ब्लू इकॉनॉमी’मध्ये भारताचा...
कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची हजेरी पुणे : राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला...
पेरणीची घाई नको : कृषी आयुक्तालयपुणेः राज्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर...
मॉन्सूनला पोषक वातावरण पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने प्रवास...
दूध दरातील कापतीने शेतकऱ्यांची परवड औरंगाबाद: महिनाभरातच दुधाच्या दरात तब्बल ११...
पीककर्ज व्याज सवलत योजनेचे पालकत्व...पुणेः शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने तीन...
राज्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २१ टक्के...पुणे ः मे आणि जून महिन्यात पाण्याची मागणी...
कमी दराने कांदा खरेदी सुरूच नाशिक : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सोयाबीन लागवड क्षेत्रात दहा टक्के...नागपूर : देशात सोयाबीन लागवड क्षेत्र आणि...
दूध दरासाठी गुरुवारी आंदोलन नगर : लॉकडाउनचा गैरफायदा घेत दूध उत्पादक...
विद्यापीठाच्या वाणांमुळे शेतकऱ्यांना ९५...नगर ः महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित...
गांडुळखताचा लोकप्रिय केला शुभम ‘ब्रॅण्ड’सोलापूर जिल्हयातील उपळाई बुद्रूक येथील महादेव...
सिंधुदुर्गमध्ये मुसळधारसिंधुदुर्गनगरी : जिल्ह्याच्या काही भागात मुसळधार...
प्रयोगशील, अभ्यासपूर्ण शेतीचा आदर्शतिडका (जि. औरंगाबाद) येथील युवा शेतकरी ईश्‍वर...
शेतकऱ्यांचे धान बोनसचे १७ कोटी रुपये...चंद्रपूर : गेल्या खरीप हंगामात विक्री केलेल्या...
मॉन्सून उद्या दिल्लीत पुणे : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) वेगाने उत्तरेत...
समुद्रातील माशांचा साठा केवळ ६६ टक्के...रत्नागिरी ः समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून...
दीडपट हमीभावाचा केंद्राचा दावा फसवा पुणेः किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) माध्यमातून...
नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाण्याची ...नाशिक : अनेक शेतकऱ्यांनी यंदा सोयाबीन पेरणीला...