यवतमाळ जिल्ह्यातील भूजल पातळी समाधानकारक 

यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे उन्हाळी पिकांचे घटलेले क्षेत्र, जलयुक्त शिवार योजनेची झालेली कामे यामुळे यंदा जिल्ह्यातील भूजल पातळी समाधानकारक आहे. केवळ चार तालुक्‍यांत अत्यल्प घट असल्याने भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या मॉन्सूनपूर्व निरीक्षणात समोर आले आहे.
Ground water level in Yavatmal district is satisfactory
Ground water level in Yavatmal district is satisfactory

यवतमाळ : गेल्यावर्षी झालेला पाऊस, कोरोनामुळे उन्हाळी पिकांचे घटलेले क्षेत्र, जलयुक्त शिवार योजनेची झालेली कामे यामुळे यंदा जिल्ह्यातील भूजल पातळी समाधानकारक आहे. केवळ चार तालुक्‍यांत अत्यल्प घट असल्याने भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या मॉन्सूनपूर्व निरीक्षणात समोर आले आहे. 

दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना टंचाईशी दोन हात करावे लागते. यंदा कोरोनाच्या संकटात नागरिकांवर तशी वेळ आली नाही. ही निश्‍चित समाधानाची बाब आहे. त्यामुळेच मे महिन्याच्या शेवटीही जिल्ह्यातील भूजल पातळी समाधानकारक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा उन्हाळी पीक लागवडीत मोठी घट झाली. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला. शिवाय, गेल्यावर्षभर पाऊस येत होता. पावसाची टक्केवारी ८९ टक्‍यांवर पोहोचली होती. समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यात मुबलक जलसाठा होता. त्यातच जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा चांगला परिणाम दिसून आला आहे. 

अनेक ठिकाणी आजही पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळेच यंदा जिल्ह्यातील सरासरी भूजल पातळी अत्यंत समाधानकारक आहे. यांचा फायदा शेतकरी तसेच नागरिकांना होत आहे. जिल्ह्यातील १६ तालुक्‍यांपैकी दिग्रस, कळंब, यवतमाळ तसेच झरीजामणी या चार तालुक्‍यात अत्यल्प घट आहे. उर्वरित सर्वच तालुक्‍यातील भूजल पातळी समाधानकारक आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांची स्थिती पाण्याबाबत नाजूक होती. अनेक भागात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागला. त्यामुळे जिल्हावासींसाठी सध्यातरी ‘नो टेन्शन’ आहे. 

तालुकानिहाय स्थिती  भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात आर्णी तालुक्‍याची भूजल पातळी ०.६७, बाभूळगाव ०.८३, दारव्हा ०.४१, दिग्रस ०.२५, घाटंजी ०.४३, कळंब-०.०३, महागाव ०.०५, मारेगाव ०.११, नेर ०.९८, केळापूर ०.२३, पुसद ०.७४, राळेगाव ०.६९, उमरखेड ०.२५, वणी ०.२८, यवतमाळ ०.२२, झरीजामणी-०.१६ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com