नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये 

नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये 
नाशिकमध्ये भुईमूग शेंगा प्रतिक्विंटल ३००० ते ४००० रुपये 

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू सप्ताहात भुईमुगाच्या शेंगांची आवक १९७५ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ३००० ते ४००० असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.

सप्ताहात काही फळभाज्यांची आवक कमी तर काहींची आवक जास्त झाल्याने बाजारभावसुद्धा कमी जास्त मिळाले. मागील सप्ताहाच्या तुलनेत आवकेत वाढ झाली तसेच परपेठेत मागणी वाढत असल्याने बाजारभावात वाढ झाली. हिरव्या मिरचीची आवक ३७९४ क्विंटल झाली. लवंगी मिरचीला ४०००  ते ५००० तर ज्वाला मिरचीला ४५०० ते ५५०० प्रतिक्विंटल दर मिळाला. परपेठेत मागणी वाढल्याने मिरचीच्या बाजारभावात वाढ झाली. वालपापडी घेवड्याची आवक ३९२ क्विंटल झाली. वालपापडीला प्रतिक्विंटल ७००० ते ८००० दर मिळाला तर घेवड्याला ६००० ते  ७००० प्रतिक्विंटल दर मिळाला. या सप्ताहात वाळपापडी घेवड्याची आवक मंदावली. गाजराची आवक २१९१ क्विंटल झाली. त्यास २७०० ते ४०००  प्रतिक्विंटल दर मिळाला. 

उन्हाळ कांद्याची आवक ११५६३ क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते १४०० प्रतिक्विंटल होते. परपेठेत मागणी कमी असल्याने बाजारभाव कमी होते. बटाट्याची आवक ८०५२ क्विंटल झाली. बाजारभाव ५२५ ते १२०० प्रतिक्विंटल होते. लसणाची आवक ३०१ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ११००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

टोमॅटोला १०० ते ३००, वांगी ३०० ते ५००, फ्लॉवर ९० ते १७० असे प्रती १४ किलोस दर मिळाले. तर कोबी ११० ते २१० असा प्रती २० किलोस दर मिळाला. ढोबळी मिरची २२० ते ३०० असा प्रती ९ किलोस दर मिळाला. भोपळा ५० ते २००, कारले ३९० ते ५५०, गिलके २५० ते ४५०, भेंडी १८० ते ३६० असे प्रती १२ किलोस दर मिळाले तर काकडीला २७०  ते ४५०, लिंबू ३०० ते ६००, दोडका ४८० ते ९०० असे प्रती २० किलोस दर मिळाले. 

पालेभाज्यांमध्ये कोथिंबीर ३१०० ते १३०००, मेथी १६०० ते ३६००, शेपू १५६० ते ३०००, कांदापात ११०० ते २५००, पालक १८० ते ३६०, पुदिना १२० ते १६० असे प्रति १०० जुड्यांना दर मिळाले. फळांमध्ये चालू सप्ताहात डाळिंबाची आवक ४३८० क्विंटल झाली. आवक कमी झाली असून परपेठेत मागणी सर्वसाधारण असल्याने बाजारभाव स्थिर होते. आरक्ता वाणास प्रतिक्विंटल ४०० ते ३००० व मृदुला वाणास ५०० ते ५७३० प्रतिक्विंटल दर मिळाला.

आंब्याची आवक ९५२ क्विंटल झाली. दशहरी ३००० ते ४५०० प्रतिक्विंटल, तर केशर आंब्यास ४००० ते ६००० प्रतिक्विंटल दर मिळाला. टरबुजाची आवक २०० क्विंटल झाली. बाजारभाव ४०० ते ८०० प्रतिक्विंटल मिळाला असून आवक कमी झाली आहे. मोसंबीची आवक १७० क्विंटल झाली. बाजारभाव २००० ते ५५०० प्रतिक्विंटल मिळाला. केळीची आवक २३० क्विंटल झाली. बाजारभाव ५०० ते ११०० प्रतिक्विंटल मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com