नांदेड जिल्ह्यात उन्हाळी हंगामात भुईमुगाचा पेरा वाढला

Groundnut sowing increased during the summer season in Nanded district
Groundnut sowing increased during the summer season in Nanded district

नांदेड : ‘‘जिल्ह्यात यंदाच्या (२०२०) उन्हाळी हंगामात सोमवार (ता. १०) पर्यंत ५ हजार ४३५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र ४ हजार ५६९ हेक्टर आहे,’’ अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ६ हजार २४० हेक्टर आहे. या हंगामात भुईमूग, ज्वारी, मका ही पिके घेतली जातात. यंदा सिंचनासाठी पुरेशा प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामातील क्षेत्रात वाढ अपेक्षित आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना उन्हाळी मुगाचे बियाणेदेखील वाटप करण्यात आले.  

पेरणी क्षेत्रात सर्वाधिक ४ हजार ५६९ हेक्टरवर भुईमूग, ५९६ हेक्टरवर ज्वारी, २७० हेक्टरवर मक्याची पेरणी झाली आहे. उन्हाळ्यातील नगदी पीक असलेल्या भुईमुगाला शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे.

ज्वारी, मका या अन्नधान्य, चारा पिकांची पेरणी झाली आहे. कंधार तालुक्यात उन्हाळी पिकांच्या पेरणी क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com