भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर कारवाई करा

यवतमाळ जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. नुकसान झाल्याने त्याची दखल घेत तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली आहे.
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर कारवाई करा Groundnut varieties inferior, Take action against companies
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर कारवाई करा Groundnut varieties inferior, Take action against companies

यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्याची दखल घेत तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली आहे. 

गेल्या हंगामात सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाले. त्याच्या परिणामी शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली.  त्या हंगामात संततधार पाऊस व कीड रोगामुळे पिकाचा उत्पादन खर्च ही भरून निघाला नाही. सध्या तेलबिया वर्गीय पिकांना चांगले दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडी खालील क्षेत्रात वाढ केली. मात्र याच वेळी बियाणे कंपन्यांच्या दगाबाजीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भुईमुगाला शेंगधारणाच झाली नाही. शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम देखील यामुळे निष्फळ गेला आहे. या नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी याकरिता तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली आहे. या प्रकरणात बियाणे कंपन्यांचा दोष आढळल्यास संबंधितांकडून भरपाई घेत त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

येत्या खरीप हंगामात फसवणुकीचे प्रकार घडणार नाही, या बाबत कृषी विद्यापीठासह कृषी विभागाने दक्ष राहून उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. त्या करता आतापासूनच कृतिशील राहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

 कृषी विद्यापीठाची निष्क्रियता टीएजे- २४ एकच वाण सध्या लोकप्रिय आहे गेल्या अनेक वर्षांत नवे भुईमूग वाण देण्यात कृषी विद्यापीठ अपयशी ठरले आहे. कृषी विद्यापीठाची निष्क्रियता देखील शेतकऱ्यांच्या मागासलेपणास कारणीभूत असल्याचा आरोप शिवाजीराव मोघे यांनी केला आहे. भुईमूगच नाही तर या भागातील मुख्य पीक असलेल्या कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे देखील नवे वाण देण्याचा विसर कृषी विद्यापीठाला पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वाण संशोधनाबरोबरच पूरक शिफारशी देण्याबाबतही अकोला कृषी विद्यापीठ माघारले आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com