Agriculture news in marathi Groundnut varieties inferior, Take action against companies | Page 2 ||| Agrowon

भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर कारवाई करा

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 एप्रिल 2021

यवतमाळ जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. नुकसान झाल्याने त्याची दखल घेत तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली आहे. 

यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने त्याची दखल घेत तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली आहे. 

गेल्या हंगामात सोयाबीनचे बियाणे निकृष्ट निघाले. त्याच्या परिणामी शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करावी लागली.  त्या हंगामात संततधार पाऊस व कीड रोगामुळे पिकाचा उत्पादन खर्च ही भरून निघाला नाही. सध्या तेलबिया वर्गीय पिकांना चांगले दर मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांनी भुईमूग लागवडी खालील क्षेत्रात वाढ केली. मात्र याच वेळी बियाणे कंपन्यांच्या दगाबाजीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भुईमुगाला शेंगधारणाच झाली नाही. शेतकऱ्यांचा उन्हाळी हंगाम देखील यामुळे निष्फळ गेला आहे. या नुकसानीची दखल घेत शेतकऱ्यांना भरपाई मिळावी याकरिता तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण व पंचनाम्याची प्रक्रिया करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केली आहे. या प्रकरणात बियाणे कंपन्यांचा दोष आढळल्यास संबंधितांकडून भरपाई घेत त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

येत्या खरीप हंगामात फसवणुकीचे प्रकार घडणार नाही, या बाबत कृषी विद्यापीठासह कृषी विभागाने दक्ष राहून उपाययोजनांवर भर दिला पाहिजे. त्या करता आतापासूनच कृतिशील राहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

 कृषी विद्यापीठाची निष्क्रियता
टीएजे- २४ एकच वाण सध्या लोकप्रिय आहे गेल्या अनेक वर्षांत नवे भुईमूग वाण देण्यात कृषी विद्यापीठ अपयशी ठरले आहे. कृषी विद्यापीठाची निष्क्रियता देखील शेतकऱ्यांच्या मागासलेपणास कारणीभूत असल्याचा आरोप शिवाजीराव मोघे यांनी केला आहे. भुईमूगच नाही तर या भागातील मुख्य पीक असलेल्या कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे देखील नवे वाण देण्याचा विसर कृषी विद्यापीठाला पडल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. वाण संशोधनाबरोबरच पूरक शिफारशी देण्याबाबतही अकोला कृषी विद्यापीठ माघारले आहे, असा आरोपही त्यांनी केला.


इतर ताज्या घडामोडी
नगरमध्ये साडेपाच हजार हेक्टरवर फळबाग... नगर : नगर जिल्ह्यात गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही...
मराठवाड्यात पीककर्ज वाटप धीम्या गतीनेच औरंगाबाद : मराठवाड्यात यंदाच्या खरीप हंगामासाठी...
कोल्हापुरात पाऊस सुरूच; नद्यांच्या...कोल्हापूर : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाच्या...
साखर कारखान्यांच्या कर्जांची चौकशी करानगर : शेतकऱ्यांना पीककर्ज द्यायचे झाल्यास अत्यंत...
राष्ट्रीयीकृत बँकांच्या मदतीने...नाशिक : नाशिक जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून कर्ज...
‘किसानपुत्र आंदोलन’कडून काळ्या...औरंगाबाद : किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने शुक्रवारी...
द्राक्ष सल्ला : प्रतिकूल ढगाळ हवामानात...यावर्षी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ढगाळ...
थायलंडचे शेतमजूर अन् मध्यम मार्गावरील...शेती म्हटली की सर्वत्र कमी जास्त प्रमाणात त्याच...
विदर्भात अडीच कोटींचा ‘एचटीबीटी’ साठा...नागपूर : गेल्या हंगामात अनधिकृत कापूस बियाण्याचे...
वैयक्तिक वनदाव्यांचा जलदगतीने निपटारा...नाशिक : जिल्ह्यातील वैयक्तिक वनदाव्यांचा वनसमिती...
कोल्हापुरातील शिवारे जलमयकोल्हापूर : जिल्ह्याला बुधवारी (ता. १६)...
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरीजळगाव ः खानदेशात बुधवारी (ता. १६) अनेक भागांत...
दूध दरवाढीसाठी पुणे जिल्ह्यात निदर्शनेपुणे : लॉकडाउनच्या काळात मागणी घटल्याचे कारण देत...
खतांची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर...वाशीम : जिल्ह्यातील चार महसूल मंडळांचा अपवाद...
शेतकरी कंपन्यांसाठी अर्थसंकल्पाची गरजशेतकरी कंपनी सुरू करण्यापूर्वी जसे व्यवसायाची...
खतांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी...माती परीक्षणाच्या आधारावर पिकांना द्यावयाची...
सोयाबीन पिकावरील खोडमाशीचे एकात्मिक...खोडमाशीच्या अळ्या प्रथम पाने पोखरून पानांच्या...
तंत्र तीळ लागवडीचेतीळ पीक आपत्कालीन पीक, आंतरपीक व मिश्र पीक म्हणून...
खानदेशात कांदा दरात सुधारणाजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या चार-...
नऊ कृषी सहायकांकडे १०४ गावांची जबाबदारीबुलडाणा ः राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या...