बुलडाण्यातील १२१ गावांत भूजल अधिनियम लागू

बुलडाण्यातील १२१ गावांत भूजल अधिनियम लागू
बुलडाण्यातील १२१ गावांत भूजल अधिनियम लागू

बुलडाणा : पाणीटंचाईची संभाव्य स्थिती लक्षात घेऊन मलकापूर उपविभागातील मलकापूर, नांदुरा, मोताळा तालुक्यातील १२१ गावांमध्ये महाराष्ट्र भूजल अधिनियम २००९ लागू करण्यात आला आहे. मलकापुरातील १४, मोताळ्यातील ६१ व नांदुरातील ४६ गावांचा यामध्ये समावेश आहे.

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माहितीनुसार, अधिनियमाद्वारे या गावांमध्ये अधिसूचित सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांच्या ५०० मीटरच्या अंतरात विहिरींच्या खोदकामास प्रतिबंध झाला आहे. अशा स्रोतांपासून एक किलोमीटर अंतराच्या क्षेत्रातील विहीर तात्पुरत्या बंद होतील. पाण्याचे स्रोत दूषित होतील, अशी कृती करता येणार नाही. अधिनियमनातील तरतुदींचा भंग झाल्यास दंड व शिक्षेची तरतूद आहे. 

या गावांमध्ये अधिनियम लागू (तालुकानिहाय) मलकापूर : वाघूड, वजिराबाद, खामखेड, खडकी, पिंपळखुटा महादेव, गौलखेड, वरखेड, सावळी, निमखेड, लासुरा, पिंपळखुटा बुद्रुक, बहापुरा, दाताळा, मोरखेड मोताळा : कोल्ही गोलर, गुगळी, लपाली, चावर्दा, सिंदखेड, रिधोरा खंडोपंत, वाडी, लिहा बुद्रुक, कोल्ही गवळी, सारोळापीर, काबरखेड, हनवतखेड, पुन्हई, रिधोरा जहाँगीर, वडगाव खंडोपंत, पोफळी, मूर्ती, वाघजाळ, पिंपळगावनाथ, शिरवा, सहस्रमुळी, परडा, वारुळी, नेहरूनगर, जयपूर, अंत्री, तरोडा, धामणगाव देशमुख, तपोवन, काळेगाव, उबाळखेड, सोनबरड, कोऱ्हाळा बाजार, किन्होळा, पान्हेरा, ब्राम्हंदा, खांडवा, राहेरा, दाभा, नाईकनगर, नळकुंड, गुळभेली, गोतमारा, कुऱ्हा, मोहेगाव, दाभाडी, शेलगाव बाजार, उऱ्हा, दहीगाव, निपाणा, सावरगाव जहाँगीर, माळेगाव, चिंचखेड खुर्द, माकोडी, टेंभी, आव्हा, वरूड, आडविहीर, तालखेड, महालपिंप्री, भोरटेक. नांदुरा तालुका : सिरसोडी, नवे खेडगाव, मामुलवाडी, माळेगाव, लोणवडी, माटोडा (बुर्टी), विटाळी, नारायणपूर, अवधा बुद्रुक, निमगाव, दहीवडी, औरंगपूर, खंडाळा, बुर्टी (वडनेर), पिंपळखुटा धांडे, वडगाव डिघी, वडगाव डिघी (जुने), सावरगाव चाहू, अंबोडा, शेलगाव मुकुंद, नायगाव, नारखेड, बेलूरा, मुरंबा, बरफगाव, खेर्डा, खुमगाव, धानोरा बुद्रुक, धानोरा खुर्द, खडदगाव, वसाडी बु., वसाडी खुर्द, पोटळी, पिंपळगाव खुर्द, दहीगाव, भोरवड, वळती बुद्रुक, जिगाव, धाडी, धानोरा विटाळी, तांदुळवाडी, भुईशिंगा, तिकोडी, वळती खुर्द, महाळूंगी, फुली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com