मराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट

मराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट
मराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट

औरंगाबाद : दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच भूजल पातळीनेही जलसंकट ओढावण्याचे संकेत दिले आहेत. एकूण ७६ पैकी ५६ तालुक्‍यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत नोंदली गेलेली घट दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे. त्यामुळे भूगर्भातही उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचेच स्पष्ट होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भूजल पातळीत ७.३८ मीटरची घट नोंदली गेली आहे.  यंदा मराठवाड्यात जून ते सप्टेंबर २०१८ दरम्यान सरासरी ६६६.४ मिलिमिटर पावसाच्या तुलनेत ६०५.५ मिलिमिटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सरासरी ३३०.५३ मिलिमिटरच पाऊस पडला. अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत सरासरी २७५ मिलिमिटर पाऊस कमी पडला. सरासरी ४५.४ टक्‍के घट पावसात नोंदली गेली. याचा थेट परिणाम भूजलपातळीवर झाल्याचे दिसते आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेबरअखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ८७६ विहिरींचे निरीक्षण घेतले. या निरीक्षणाअंती औरंगाबाद जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.७३ मीटरची घट नोंदली गेली. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात २.०४ मीटर, बीड जिल्ह्यात २.०७ मीटर, लातूर जिल्ह्यात १.१५ मीटरपर्यंत तर उस्मनाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४.०१ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदली गेली आहे. नांदेड जिल्ह्यात ०.४१ मीटर, परभणीत ०.०९ मीटर तर हिंगोली जिल्ह्यात ०.२० मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदली गेली आहे. सर्वाधिक पावसाचे प्रमाण राहिलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्‍यातील भूजल पातळीत १.७९ मीटरची घट नोंदली गेली आहे. नांदेडमधीलच धर्माबाद तालुक्‍यातील भूजल पातळीतही १.१६ मीटर तर मुखेड तालुक्‍यातील भूजल पातळीत २.३३ मीटरपर्यंत घट नोंदली गेली आहे.  निरीक्षणासाठी घेतलेल्या विहिरींची जिल्हानिहाय संख्या  औरंगाबाद -१४१  जालना-११०  परभणी-८७  हिंगोली-५५  नांदेड-१३४  लातूर-१०९  उस्मानाबाद-११४  बीड-१२६  तालुकानिहाय पाणीपातळीतील घट  पातळी - तालुके ० ते १ मीटर - १६  १ ते २ मीटर - २२  २ ते ३ मीटर - ७  ३ मीटरपेक्षा जास्त -११  सरासरी पातळी - २० अशी आहे तालुकानिहाय अपेक्षित पावसाच्या तुटीची अवस्था   पातळी - तालुके २० टक्‍के तूट ः ११  २० ते ३० टक्‍के तूटः १४  ३० ते ५० टक्‍के तूटः ३८ ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तूटः ८ सरासरी पेक्षा जास्त पाऊस ः ५  

  या तालुक्यात नोंदली घट भूजल पातळीत वाढ नोंदल्या गेलेल्या तालुक्‍यात परभणी जिल्ह्यातील पालम, पूर्णा, परभणी, पाथ्री, जिंतूर, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, हिमायतनगर, नांदेड, अर्धापूर, भोकर, कंधार, लोहा, मुदखेड, उमरी, माहूर व लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍याचा समावेश आहे.  ० ते १ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदलेले तालुके  सोयगाव, मंठा, सोनपेठ, गंगाखेड, मानवत, कळमनुरी, सेनगाव, बिलोली, नायगाव, अहमदपूर, चाकूर, देवणी, निलंगा, बीड, आष्टी, परळी  १ ते २ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदलेले तालुके  औरंगाबाद, पैठण, खुलताबाद, कन्नड फुलंब्री, जालना, बदनापूर, जाफ्राबाद, घनसावंगी, सेलू, देगलूर, धर्माबाद, शिरूर, लातूर, उदगीर, रेणापूर, औसा, भूम, पाटोदा, वडवणी, केज अंबाजोगाई.  २ ते ३ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदलेले तालुके  सिल्लोड, वैजापूर, गंगापूर, परतूर, मुखेड, कळंब, गेवराई.  ३ मीटरपेक्षा जास्त भूजल पातळीत घट नोंदलेले तालुके  भोकरदन, अंबड, उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, वाशी, परंडा, शिरूर कासार, धारूर, माजलगाव.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com