यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही खालावली भूजलपातळी

यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही खालावली भूजलपातळी
यवतमाळ जिल्ह्यात ओल्या दुष्काळानंतरही खालावली भूजलपातळी

यवतमाळ  ः भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या तपासणीत तब्बल सहा तालुक्‍यांत भूजल पातळीत घट नोंदविण्यात आली. त्यामध्ये दारव्हा, दिग्रस, महागाव, उमरखेड, पुसद व यवतमाळ या तालुक्‍यांचा समावेश आहे.  जिल्ह्यात यंदा सरासरीच्च्या ८७ टक्‍के पाऊस झाला. मध्यंतरी संततधार पावसाने पिकांचे नुकसान झाले. जास्त पाऊस झाल्याचे दिसत असले तरी भूजल सर्व्हेक्षण विभागाने केलेल्या सर्व्हेक्षणात मात्र पातळीत घट नोंदविली गेली. पडणारा पाऊस जमिनीत मुरलाच नाही तर वाहून गेला. त्यामुळे हे घडल्याचे सांगितले जाते. भूजल सर्व्हेक्षण विभागाकडून सप्टेंबर महिन्यात सर्व्हेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील १०९ मंडळांमध्ये पडलेला पाऊस ‘महारेन’कडून आलेली माहिती व भूजल सर्व्हेक्षण विभागाने नोंदविलेले निरीक्षण याआधारे भूजल पातळीविषयक अंतिम अहवाल तयार केला जातो.  पाहणीत दारव्हा, दिग्रस, महागाव, उमरखेड, पुसद व यवतमाळ या सहा तालुक्‍यांतील भूजल पातळीत काही प्रमाणात घट दिसून आली आहे. या र्षी जिल्ह्यात ८७ टक्‍के पाऊस झाला होता. वार्षिक सरासरीच्या तो ७९१ मिलिमीटर होता. गेल्या र्षी वार्षिक सरासरीच्या ७०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याची टक्‍केवारी ७८.१२ होती. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com