पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी शनिवारी (ता. १४) मुलाखती होणार आहे.
ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यात भूजल पातळी ५८ सेंटिमीटरने वाढली
सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा उच्चांकी पाऊस झाला. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये ५८ सेंटिमीटरने वाढली आहे. दहापैकी आठ तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. वाळव्यात ती केवळ दोन सेंटिमीटरने वाढली, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सांगली : जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपेक्षा यंदा उच्चांकी पाऊस झाला. यामुळे भूजल पातळीत वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये ५८ सेंटिमीटरने वाढली आहे. दहापैकी आठ तालुक्यांत भूजल पातळी वाढली आहे. वाळव्यात ती केवळ दोन सेंटिमीटरने वाढली, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील भूजल पातळीच्या नोंदींसाठी ८६ निरीक्षण विहिरी निश्चित केल्या आहेत. ऑक्टोबर २०१९ मधील निरीक्षण विहिरीतील पातळीचा पाच वर्षांतील ऑक्टोबरमधील सरासरी भूजल पातळीशी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यात ऑक्टोबर २०१९ अखेर प्रत्यक्षात झालेल्या तालुकानिहाय पर्जन्यमानाचा ऑक्टोबर अखेरीस तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमानासोबत तुलना करण्यात आली. सरासरीच्या तुलनेत सर्वच १० तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त पर्जन्यमान झाले आहे.
पर्जन्यमान व निरीक्षण विहिरीतील स्थिर भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास केला असता अवर्षण प्रवण व शाश्वत पर्जन्यमान असलेल्या तालुक्यांत सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यंदा वाढ दिसून येते. जिल्ह्यात सन २०१९-२० साठी संभाव्य टंचाई असलेल्या गावे नाही, असे सांगण्यात आले आहे.
ऑक्टोबर ते मार्चदरम्यान जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता नाही. तथापि, स्थानिक स्थितीचा विचार करून टंचाईची शक्यता असलेल्या तीन तालुक्यांत समावेश एप्रिल २०२० ते जून २०२० कालावधीत करून त्यानुसार जिल्ह्याचा टंचाई अहवाल तयार करण्यात आल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यांनी म्हटले आहे.
कवठेमहांकाळ, जत तालुक्यात भूजपातळीत घट
जत आणि कवठेमहांकाळ तालुक्यात गेल्या पाच वर्षात पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे या तालुक्यातील पाण्याची पातळी कमी झाली होती. कवठेमहांकाळ ४.९५ मीटर होती. ती सध्या ४.९९ म्हणजे ०.०४ मीटरने कमी झाली आहे. तर जत तालुक्यातील पाणीपातळी ५.४३ वरुन ६.४४ मीटर इतकी झाली आहे. अर्थात जत तालुक्यातील भूजल पातळीत १.०१ मीटरने कमी झाली आहे. परिमाणी, जत तालुक्यात भविष्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
तालुकानिहाय भूजल पातळी (मीटरमध्ये)
खानापूर | ३.३० मीटर |
कडेगाव | ४.४० |
तासगाव | ५.९७ |
पलूस | २.१० |
मिरज | २.२२ |
शिराळा | ०.६७ |
कवठेमहांकाळ | ४.९९ |
जत | ६.४४ |
वाळवा | २.०३ |
आटपाडी | ४.८३ |