agriculture news in Marathi group farming over 25 acre Maharashtra | Agrowon

चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५ एकरवर सामुहीक शेती

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020

चांदोली धरणग्रस्तामधील नांदोली वसाहत, हादरेवाडी, शेंडेवाडी तीनही वसाहतील सत्तर उंबरा आहे. यामधील बहुतेक लोक शेतीवर गुजराण करतात. परंतू धरणात शेती गेली. 

मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील नांदोली वसाहत, हादरेवाडी, शेंडेवाडी तीनही वसाहतील सत्तर उंबरा आहे. यामधील बहुतेक लोक शेतीवर गुजराण करतात. परंतू धरणात शेती गेली. त्यामुळे शेती करण्याची इच्छा असून करता येत नाही. परंतू मांगले गावात आम्ही २५ एकर क्षेत्र कराराने भात पिकवण्यास घेतले आणि आमचे शेती करण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, अ असा आनंद शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

शिराळा तालुका भात पिकवणारा असा प्रसिध्द आहे. कालांतराने चांदोली धरणाच्या निर्मिती नंतर वारणा नदी बारमाही वाहू लागली. अर्थात चांदोली धरण बांधताना अनेक कुटूंबाना दुसऱ्या गावात विस्थापित करण्यात आले. मांगले (ता. शिराळा) या गावात नांदोली वसाहत, हादरेवाडी, शेंडेवाडी ही विस्थापित गावे आहेत. या तीनही वसाहतीत मिळून ७० घरे असून लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. गेल्या दोन चार वर्षांपासून विस्थापित चांदोली धरणग्रस्त खंडाने शेती कसण्यासाठी घेवू लागले आहेत. आता सामुहिक रित्या कसण्यासाठी शेतकरी शेती खंडाने घेत आहेत. 

चांदोली विस्थापित धरणग्रस्तांच्याकडे शेती कसण्यासाठी बाहेरील मजुरांशिवाय घरातील लोकांची मदत, कष्ट करण्याची तयारी, यामुळे त्यांनी आपली स्वःताची शेती बघत खंडाच्या शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवून संबधित शेतकऱ्याला वर्षभर पुरेल एवढे भाताचे उत्पन्न मिळवून देत आहेत. या वसाहतीतील विस्थापित धरणग्रस्त खंडाने शेती करताना आपल्या शेतीतही ऊसाचे चांगले उत्पन्न घेत आहेत. कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द यामुळे आपले मूळ गाव सोडल्यानंतर विस्थापित होवून राहायला घरे मिळेपर्यंत भटके जीवन जगणारे विस्थापित धरणग्रस्त आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

प्रतिक्रिया
वसाहतीतील इतर लोकांची समुहाने मशागत करण्याची तयारी आहे. यामुळे आम्हाला भात शेती करणे सोपे वाटते. यावर्षी आम्ही तीनही वसाहतीतील मिळून वीस लोकांनी २५ एकराच्यावर खंडाने शेती केली आहे. यामधून चांगले उत्पन्न काढून आम्हालाही आणि शेतकऱ्यालाही फायदा करून देत आहोत . 
- दगडू लाखन, शेतकरी.


इतर अॅग्रो विशेष
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...